Skip to main content

पफ आणि कस्टर्ड ड्रॅगन

लेखक शुचि यांनी सोमवार, 14/05/2012 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
पफ द मॅजिक ड्रॅगन नावाचे लहान मुलांचे धमाल सुश्राव्य गाणे मध्यंतरी ऐकले. गाणे खूप आवडले. लहान मुलांना तर खूपच आवडेल अशी चाल आणि शब्द आहेत. या गाण्यात पफ नावाचा अक्राळ-विक्राळ ड्रॅगन आहे ज्याचे हृदय मात्र लोण्याहूनही मऊ आहे :). मैत्रीमधील निष्ठा आणि कोमल हृदय हे गुण या शक्तीशाली ड्रॅगनमध्ये आहेत. ज्याला मोठे मोठे राजे महाराजे वाकून कुर्नीसात करतात, ज्याच्या गगनभेदी गर्जनेपुढे , थरथर कापून खुद्द समुद्री चाचे आपल्या जहाजाचा झेंडा उतरवतात अशा या ड्रॅगनचा एक लहान मुलगा जिगरी दोस्त आहे. त्याचे नाव "जॅकी पेपर". पफचे, जॅकीवर खूप प्रेम आहे.

कळकळीचे आवाहन

लेखक सृष्टीलावण्या यांनी रविवार, 13/05/2012 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी मातीवर आणि ह्या मातीच्या सन्मान्य इतिहासाचा अभिमान बाळगणार्‍या सर्व भारतीयांना कळकळीचे आवाहन. नुकताच आम्ही शिवशौर्य ट्रेकर्स द्वारे कुलाबा किल्ला - पद्मदूर्ग - जंजिरा - खांदेरी आणि कणकेश्वर मंदिर असा दौरा करून आलो. त्यात पद्मदूर्गाला भेट देणे हा अनुभव विशेष संस्मरणीय होता. कारण पद्मदूर्ग किल्ल्यावर सहजासहजी जाता येत नाही. मुरुड किनार्‍यावरील कोळीबांधवांशी काही दिवस अगोदर बोलून तिथे जाण्यासाठी बोट निश्चित करावी लागते. ती मिळतेच असे नाही.

एक वाचनानुभव

लेखक यकु यांनी रविवार, 13/05/2012 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
दि. 6 मे 2012 काल म्हणजे 5 मे चे सकाळचे काही तास वगळता पूर्ण दिवस झोपण्‍यात गेला. नेहमीची जागरणं. पण रात्री 10 वाजता जाग आली तेव्हा बाहेर पाऊस पडून गेला होता आणि वीज गेली होती. पाणी संपलं होतं म्हणून ते आणायला गेलो. आमच्या कॉलनीतल्या छोट्याशा झोपाळू स्टेशनसमोर पाण्‍याची सोय आहे. अपरात्री दुकाने बंद असताना तिथे कधीही पाणी मिळू शकतं. रेल्वेट्रॅकपलीकडे असलेल्या शेजारच्याच कॉलनीतमात्र वीज होती. त्यामुळं कुंद वातावरणात रस्त्यावरुन जाताना सकाळचे चार साडेचार वाजल्याचा भास होत होता. पाणी आणून थोडे जेवलो आणि नेहमीप्रमाणे मिपावर लॉगीन झालो.

अंगणात बाप, दारात माय,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 13/05/2012 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय