Skip to main content

सुबक व सुंदर वळणदार (कॅलिग्राफिक-स्टायलाइज्ड) देवनागरी फाँट्स् कोठे मिळतील?

लेखक दिपोटी यांनी रविवार, 13/05/2012 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका पोस्टरवर काम करीत आहे. त्यातील सर्वच मजकूर मराठी असल्याने देवनागरी लिपी मध्ये आहे.

काही फोटो.....मी काढलेले.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 13/05/2012 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
भारद्वाज..... चला सगळ्यांना पैशाचा लाभ होऊ देत आज..... याच्या फोटोवर जाऊ नका... याचा आकार फक्त दोन इंच आहे.... :-) सातभाई...... दयाळ... जयंत कुलकर्णी.

निवांत

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/05/2012 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
क्षणामागूनी क्षण धावती, काट्यामागुनी काटा अंधारातुनी नित्य उजळती चहुबाजुनी वाटा सुवर्ण झगमग दूर दावते संधीप्रकाश खोटा मृगतृष्णेच्या पाठी व्याकूळ नीज हरविल्या खाटा शर्यतीतल्या बाजारातूनी माल विकाया सारा गुणवत्ता ना मोल ठरविते बोल वल्गना धारा कवडीमोल ती मोलमजूरी फोल डोईचा भारा शक्ती मिळवी घामच येथे तोल युक्तीचा न्यारा बुद्धीच्या राज्यात जिंकतो तर्कविचारी घोडा दौडत राही सतत धडाधड नाही उसंत थोडा रात्रंदिन जप मंत्र एकला झोडा तोडा जोडा मजल्यावरती मजले चढतो गगनचुंबी वाडा तरीही कुथती कर्मविरांच्या व्यस्त थकल्या रांगा भले शमविले परिवाराच्या पालन पोषण अंगा आम्हा जैसे फिरत रहा तू बद्ध घाणीच्

गार्लिक प्रॉन्स आणि प्रॉन्स करी

लेखक Mrunalini यांनी रविवार, 13/05/2012 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः प्रॉन्स - १ किलो कांदे - २ पेस्ट करुन टोमॅटो - १ प्युरी करुन मैदा - ३ चमचे नारळाचे दुध - १ वाटी लसुण - १०-१२ पाकळ्या बारीक चिरुन हिरवी मिरची - २ बारीक चिरलेल्या आले,लसुण, मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा हिंग - १ चमचा लाल तिखट - २ चमचे गरम मसाला - १ चमचा धणे पावडर - २ चमचे काळी मिरी पावडर - १/२ चमचा लिंबु - १/२ चिंच - १ चमचा पाण्यात १/२ तास भिजवलेली मिठ चवीनुसार तेल कृती: गार्लिक प्रॉन्स १. प्रॉन्स साफ करुन घ्यावे. प्रॉन्सचा फक्त तोंडाच्या बाजुचा भाग काढावा. प्रॉन्स साफ करुन स्वच्छ करुन घ्यावेत. २. ताटलीमधे ३ चमचे मैदा घ्यावा.

अजिंठा

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 12/05/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला... लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला... बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा.

अंड्यांची बॅचलर पाक-क्रुती (भाग १)

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 12/05/2012 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २/३ दिवस भरपूर कठीण कठीण पाक-क्रूती वाचुन एखादी सोपी पाक-क्रूती टाकावी असा विचार करत होतो.तर मग ती मिळाली. एकदम सोपी आहे खाली देत आहे. आधी साहित्य. १. अंडी एका वेळेस जितकी खावू शकाल तेव्हढी आणि जशी माणसे असतील त्या प्रमाणात आणि कबूतरा पासुन ते डायनॅसोर पर्यंत.आपली आपली आवड. मी आपला डायनॅसोरच्या बायकोची अंडी वापरतो.आमचा डायनॅसोर अंडी घालत नाही .तो फक्त समस्त पूरूष जातींसारखा कारणमात्र आहे.ही अंडी कूठे मिळतात ते विचारू नका. शोधा म्हणजे सापडेल.जरा गूगल वापरा.नाहीतर मला व्य.नी. करा.एका व्यं.नीचे २ जूने तांब्याचे पैसे.ते पुण्यात मिळतात. अत्रूप्त आत्मा ह्यांची जुन्या-बाजाराची लिंक बघा.

अशा फाईल्स इथे चिकटविता येतात का ? एक चौकशी

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 12/05/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आपण लेख लिहिताना आपल्याला काही चित्रांची फाईल इथे लिंक देऊन जोडता येते. जालावर मूळ जागी जोपर्यंत ती फाईल आहे तो पावेतो चित्र इथे दृग्गोचर होते. हे आपण सारे जाणतोच. मी इथे नवा असल्यानी एक चौकशी करीत आहे. आपल्याला इथे विडीओ चिकटवायचा असेल तर आपण इथे लि़क जोडतो. पण युट्यूब सारखे होस्ट असल्याने ते शक्य आहे .पण अ‍ॅनिमिटेड जी आय एफ वा तत्सम फाईल्स इथे जोडावयाच्या असतील. ( समजा दाखविणे शक्य नसेल तर ) तर असे कोणते होस्ट आहेत की जे अशा फाईल्स ला अप्लोड साठी परवानगी देतात. ? जालावर माहिती काढली असता असे समजले की युट्युब , फ्लिकर तसेच फेसबुक अशी परवानगी देत नाहीत.

कविता करताना...

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 12/05/2012 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
कविता करताना, चंद्र असावाच लागतो, कविमनाला कधी कधी किनारा ही भावतो. प्रेयसीच्या गालावर खळी असावीच लागते चालताना ही तिला हरिणीशी स्पर्धा करावी लागते कधी तिच्या अ‍ॅक्सेसरीज येतात कवितेंच्या ओळीमध्ये हास्य कवीला मात्र सॅन्डल च मिळते झोळीमध्ये जळजळीत कविंना मात्र करावे लागते राजकारण शिवी घालताना ही दाखवावे लागते सरण मुखी दाटते नव कवींच्या विचांराचे जुगाड शब्द सुचतात परी ना आघाड ना पिछाड वास्तव कवी परततो हाती घेवुन चिटोरा दम गेला परी दात वाजे कराकरा आजमितीला व्यक्त व्हा चला करू काव्य चारोळ्यांच्या रंगात वाश्या तुझाच व्यत्यय........
काव्यरस