Skip to main content

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी..

लेखक प्राजु यांनी रविवार, 17/06/2012 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी दगडास अंतरीच्या जागव कधी कधी होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा वठल्या मनास होते पालव कधी कधी नुसत्या हताशतेला गोंजारसी किती? अंगार अंतरीचा पेटव कधी कधी का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी मी एरवी तशीही, असतेच शांत पण नसते विचार करती, तांडव कधी कधी! आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी! ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी -प्राजु

चीज मश्रुम्स

लेखक गणपा यांनी रविवार, 17/06/2012 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, एका छोट्याश्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा पाककृती विभागात हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तर पोटात घ्याल याची खात्री आहे.

रेशिमगाठी

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 17/06/2012 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला जायचा योग आला. वर वधु या दोन्ही कडची मंडळी सुशिक्षित व समंजस होती परंतु मला वाट्ते की काही छोट्या कारणांमुळे दोन्ही घरांमधील नारा़जी व रुसवे पणा दिसुन आला तर मग रेशिमगाठी म्हणजे काय हो ?

मिसळपावची चोरी

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 16/06/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावची चोरी बटाटेवड्यांची चोरी रबडी-फलुद्याची चोरी मनसोक्त भटकंतीची चोरी तण्णावून झोपंतीची चोरी मित्र-मैफिलींची चोरी डर्टी सिनेमांची चोरी... ह्याची चोरी त्याची चोरी... आता बोला, जगावं तरी कसं, नवरोबांनी... .....('सहज तुझी हालचाल' लिहिणार्‍या भा. रा. तांब्यांना श्रद्धांजली)...
काव्यरस

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

लेखक श्रीरंग_जोशी यांनी शनिवार, 16/06/2012 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते.

(एखाद्या नवोदित लेखकाचा टांगणीला लागतो जीव)

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 16/06/2012 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, अलीकडे आम्ही, मिपावर पुनरागमन केलेल्या नाना चेंगट यांचे दमदार लेख वाचतो. त्यात परासारख्या अनेक जुन्या खोंडांचे प्रत्येक धाग्यावरील प्रतिसाद पाहून अस्वथ व्हायला होते. आमच्या डोळ्यांसमोर मिपावरील त्या नवोदीत लेखकांची आकृती उभी राहते. जुन्या खोंडांच्या एका प्रतिसादासाठी त्यांच्या केविलवाण्या डोळ्यांत गोळा झालेले प्राण, त्यासाठी झालेली त्यांच्या जिवाची तगमग, त्यांच्या सृजनाला न जुमानता सं.मं. क्रूरपणे उडवलेले धागे हे सर्व आमच्या डोळ्यांसमोर उभे राहते. जुन्या मिपाकरांच्या लेखांवर तुम्ही अगदी मिटक्या मारून प्रतिसादावर प्रतिसाद देता, पण नवोदीत लेखकांना फाट्यावर मारता.

सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 16/06/2012 00:12 या दिवशी प्रकाशित केले.
अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी
काव्यरस

प्रणब दा - राष्ट्रपती पदावर ?

लेखक तर्री यांनी शुक्रवार, 15/06/2012 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रणब मुखर्जीं ना यु.पी.ए. ने आपले राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले आहे. प्रणबदा हया पदास योग्य आहेतच आणि म्हणूनच त्यांचे (उमेदवारीसाठी) अभिनंदन. आजवर मनमोहन सरकारवर आलेल्या पेच प्रसंगातून बाहेर काढण्यात प्रणवदानी आपले कौशल्य दाखवले आहे. अर्थमंत्री म्हणूनही त्याचे काम ( ईतर मंत्र्यांच्या तुलनेत) निश्चित उजवे आहे. प्रणबदा ना राष्ट्रपती करण्यात सोनियांनी मान्यता दिली हे ही जरा विशेषच आहे. कोणीतरी सैपाकी , पाणक्याला त्या पदावर सोनियाबाई बसवणार असा कयास होता. पण बाईनी शहाणपणा दाखवला. (अर्थात राहुल बाबा ला ही पुढे चाल -कारण आता मनमोहन बाद) परंतु आता अर्थमंत्री कोण ?