Skip to main content

फलश्रुती

लेखक चाफा यांनी सोमवार, 18/06/2012 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सतत मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे हल्लीच इलेक्ट्रॉनिक मिडीया अर्थात टेलीव्हीजन वर झी टि.व्ही. मराठीच्या डब्बा गुल या कार्यक्रमातुन पदार्पण केलं आहे. अद्याप जास्त प्रगती नसली तरी एव्हाना तीन स्किट प्रक्षेपीत झालेली आहेत. त्यांची लिंक देतोय अर्थातच श्रेय तुम्हा आश्रयदात्यांनाच जाते. http://www.youtube.com/watch?v=AC8bK97iJfE http://www.youtube.com/watch?v=qCng2uUD_go&feature=relmfu पुन्हा एकदा धन्यवाद :)

स्वप्नांचे..

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 18/06/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे - उपटसुंभ

सायोनारा s s

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी सोमवार, 18/06/2012 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
सायोनारा s s नोकरी निमित्त दहा वर्षे पैठणला होतो. (१९७९ ते १९८९). त्यावेळी आलेले हे दोन अनुभव. औरंगाबाधून फोन आला. विद्यापीठात एक आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि त्यासाठी आलेले एक जपानी प्रतिनिधी मला भेटू इच्छित होते. हे जपानी कनेक्शन माझ्या काही लक्षात येईना. निरोप अर्जंट होता. लगोलग मी गेलो. ते प्रतिनिधी कामात होते. पण त्यांनी निरोप ठेवला होता. मला गेस्ट हाऊस वर बोलावलं होतं. मी गेलो. ते प्रतिनिधी माझी वाटच पहात होते.

शेअर बाजाराची प्राथमिक माहिती

लेखक सदानंद ठाकूर यांनी सोमवार, 18/06/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी म्युच्युअल फंड मराठी डॉट कॉम या संकेतस्थळावर शेअर बाजारासंबंधी माहिती देणारी दिर्घ लेखमाला सुरु केली असून दर सोमवारी व गुरुवारी एक लेख या प्रमाणे पुढील सहा महिन्यात एकूण सुमारे ५० ते ५५ लेखातून शेअर बाजाराशी निगडीत – भांडवली बाजार, फ्युचर्स, ऑपशन्स व म्युच्युअल फंडाची माहिती देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

सायलेंट गाणी

लेखक मीनाक्षी देवरुखकर यांनी सोमवार, 18/06/2012 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सायलेंट गाणी सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का? बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात.. मला एक librari बनवायची आहे , मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे

"...कविता कविता कविता..."

लेखक विदेश यांनी सोमवार, 18/06/2012 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
इकडे कविता तिकडे कविता बघावे तिकडे कविताच कविता पेपरच्या पुरवणीत कविता मासिकाच्या गदारोळात कविता रद्दी कागदावर दिसते कविता कवितेच्या रद्दीवर कविता सुटका नाही बजावतात कविता संमेलनात सतावतात कविता ऑर्कुट कविता सर्किट कविता ब्लॉग कविता फेसबुक कविता चितेवर कविता चिंतेवर कविता उन्हावर कविता पावसावर कविता गारांसारख्या आदळतात कविता धबधब्यासारख्या कोसळतात कविता तहानभूक विसरून कविता उठता बसता पाडतात कविता शब्दांपुढती शब्द कविता वेळही जातो बनते कविता
काव्यरस

ते म्हणले

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 18/06/2012 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
ते म्हणले शोधा चर्च, मशिदी, नी देवळे दिसली फक्त प्रतिके आणि शोधकांचे थवे थवे, आत असताना डोळे मिटून बसणारे बाहेर तुझी शिकवण नजरेआड करणारे ते म्हणले भेटण्या देवा, गरीबांची कर सेवा. भेटले. भेटले अनेक सन्धीसाधू बगळे पुढ्यात वाढलेले झटक्यात मटकावर बाजुच्या भुकेल्यांचा घास हिरावणारे ते म्हणले, अरे देव म्हणजे निसर्ग!

किल्ले माहुली (कल्याण दरवाजाच्या खडतर वाटेने)

लेखक बज्जु यांनी रविवार, 17/06/2012 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
माहुली किल्याच्या विविध आठवणी आणि अनुभव लिहायचे म्हटले तर एक वेगळ पुस्तकच होईल. किती वेळा आणि कसा कसा गेलो असेन, कधी एकटाच, कधी कुण्या सवंगड्या बरोबर तर कधी ४०-५० जणांच्या टोळ्क्या बरोबर, कधी आषाढ घनातून बरसणा-या सहस्त्राधारा अंगावर झेलत, तर कधी ग्रीष्माच्या उन्हातले चटके खात, कधी कुडकुडणा-या थंडीतून चांदण्या रात्री पायाखालची वाट तुडवत, कधी पहाटेची पहिली कसारा लोकल पकडून, कधी बाईक वरून सुसाटत तर कधी कारमधून डुलत डुलत. इतके वेळा आणि इतके वर्ष माहुलीला भेट द्यायचे मुख्य कारण म्हणजे निसर्ग गिरीभ्रमण (नि.गी.) या आमच्या संस्थेतर्फे गेली काही वर्षे माहुली किल्ल्यावर नियमित गडसेवा केली जात असे.