Skip to main content

टोल वसुली योग्य की अयोग्य....

लेखक निश यांनी शुक्रवार, 15/06/2012 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस राज्य शासनाच्या टोल वसुली वरुन मनसे व राज्य सरकार ह्यांच्यात झगडा चालु आहे. रस्ता बांधणीसाठी लागलेली रक्कम सरकारने टोल वसुलिच्या रुपात वसुल करुन झाली असतानाही सरकार लोंकाच्या खिशातुन अजुनही टोल घेत आहे स्वताचे व ठेकेदारांचे हित संबंध सांभाळण्यासाठी. बर हे टोल वसुल करूनही रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. टोल रुपात घेतले जाणारे रुपये खुप आहेत. पुणा मुंबई एक्सप्रेस वेला टोल आहे रुपये १६५ खाजगी वाहनाना. ईतर वाहनांचा वेगळाच व तोही एका वेळचा.

वितंडगड (तिकोना) - भाग २

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 15/06/2012 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
तिकोना हा विसापूर-लोहगडच्या अगदी मागच्या बाजूला पवना धरणाच्या बाजूला वसलेला गड आहे. समोर तुंग उभा असून मध्ये पवनेचे अथांग पाणी व हिरवेगार खोरं असे मनोहरी रूप दिसतं. गडावरून पुर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेच्या टप्पात येतो. तिकोना जरी अवघड श्रेणीतील गड नसला व चढाई सोपी जरी असली तरी थोडी फार काळजी घेत गड चढणे आवश्यक आहे. तुम्ही लोहगड सारखे निर्धास्तपणे येथे वावरू शकत नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे निसर्गाच्या मार्‍यामुळे गडाची झालेली हानी.

" अजून आहे लहान मी... ! "

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 15/06/2012 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नवे कपडे नवे बूट पुन्हा तीच शाळा - आजपासून पुन्हा दप्तर करा गोळा ! छान होती सुट्टी कित्ती कित्ती आराम रोज भोवताली गोळा राजा राणी गुलाम ! मित्र मैत्रिणी घालत अवतीभवती पिंगा, आईस्क्रीमच्या पार्टीचा रोजचा धांगडधिंगा रात्री होई जागरण दुपारी खूप दंगा - अभ्यासाचा मुळीच पाठीशी नव्हता भुंगा अस्सू दे ना ग आई शाळेला कायम सुट्टी अजून आहे लहान मी... अस्सू दे थोडा हट्टी !
काव्यरस

देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/06/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
देव,धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार सामान्य जनातील अंधश्रद्धा नाहिशी करण्याचा प्रयत्न म. ज्योतिबा फुले यांच्यापासून श्री. दाभोळकर यांच्यापर्यंत अनेकांनी केला. "बुडती हे जन " हे न बघवून त्यांना वाचविण्याकरिता पोटतिडिकेने लिखाणही केले. त्यांचा वसा चालविणारे एक लेखक म्हणजे प्रा. य. ना. वालावलकर. उपक्रमसारख्या संस्थळावर व वर्तमानपत्रात नियमितपणे त्यांचे लेख-पत्रे प्रसिद्ध होत असतात. प्रा. वालावलकरांचे वरील नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ६२ लेख आहेत.

गोवा रंगीला रे...

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 14/06/2012 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

कमळ

लेखक जागु यांनी गुरुवार, 14/06/2012 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो. काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्‍या पाट्या दिसल्या.

बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट - 'बिग फिश'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 14/06/2012 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
मानवी जीवनशाळेमधला सर्वात जास्त कठीण विषय कोणता असेल तर तो आहे नात्यांचं व्यवस्थापन. कदाचित मी जे काही लिहितोय ते सगळं कुणाला पटेल की नाही याची मला कल्पना नाही पण मला स्वतःलाही, आपल्याला नात्यांचं योग्य व्यवस्थापन करता आलंय की नाही याची शंका सतत भेडसावत राहते. मूळात एकत्र कुटुंबात वाढलेल्याला नाती आणि त्यांच्या व्यवस्थापनामधलं ज्ञान मिळण्याची सोय घरातच मिळालेली असते. विभक्त कुटुंबामध्ये मात्र अशी परिस्थिती नसते. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गोष्टी-वेल्हाळ असेल तर त्याने सांगितलेल्या त्याच्या आयुष्यातल्या गोष्टींमधून त्याला ओळखण्याची वेळ आपल्यावर येते.