Skip to main content

विचित्र....

लेखक स्वतन्त्र यांनी सोमवार, 11/06/2012 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण महिन्यापूर्वी भावाचा गाडी स्किड होऊन अपघात झाला.जरा मानेला मार आणि खरचटणे या पलीकडे विशेष काही झाले नाही.अचानक त्याला १० दिवसानंतर जीभ जड होऊन बोलायला त्रास होऊ लागला. लगेच CT स्कॅन आणि MRI करण्यात आले.मानेतल्या शिरेवर दाब आल्याने जिब जड झाल्याचे निदान झाले.ह्या सर्व तपासण्यांसाठी त्याला हॉस्पिटलात Admit करावे लागले.कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी हि बातमी आमच्या नातेवाईकांच्या कानावर पडलीच. मग काय रोजच त्याला भेटण्यासाठी रीघ लागू लागली. प्राथमिक चौकश्या सुरु झाल्या. पहिले जेमतेम १० मिनटे,भावाची विचारपूस करण्यात जात होती.

मी आणि चित्रकला.

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/06/2012 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे वावडे. अशा ह्या अनाडी विद्यार्थ्याचे चित्रकले-बाबतीत काही प्रश्न आहेत.कूणी उत्तरे देवू शकतील काय? १. चित्रकलेचा कागद कसा निवडायचा? २. ब्रश कसे निवडायचे? ३. रंग कसे निवडायचे? ४. चित्रकला हे शास्त्र आहे की कला आहे? ५. माझ्या सारख्या "ढ" विद्यार्थ्याला पण ही कला आत्मसात करता येईल का? की मुळातच ही देवाची देणगी आहे? तसे असेल तर नादी न लागलेलेच उत्तम.

फोटोशॉपची किमया- फोटो धुरकटला ? नो प्रॉब्लेम !

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 11/06/2012 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रानो, आपल्या कॅमेर्‍यात मॅन्यूअल कंट्रोल असतात. पण बर्‍याच वेळा वेळे अभावी व बरेच वेळा आळसाने वा काही वेळा " त्यापेक्शा आटो बरा , आयला डोक्याला कटकट नाही ! या हिशेबाने मॅन्यूअल कंट्रोल वापरण्याचे आपण सर्व जण ( त्यात मी ही आलो) टाळतो. आपला फोटो भुरकट येणे व धुरकट येणे या वेगवेगळ्या समस्या आहेत. आपल्याला फोकस जमला नाही की फोटो भुरकट येतो. पण फोटोत वातावरणातील दोषांमुळे एक धुरकट रंगाचा पातळ थर फोटोवर येतो. बहुतेक वेळा उन्हाकडे तोंड करून स्नॅप घेतला तर हा प्रकार घडतो. असा फोटो आपल्या डोळ्याला त्रासदायक वाटतो.

तुकोबा .. कोणता झेंडा घेऊ हाती

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 11/06/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - तुकाराम पिच्चरवरील अनेक समीक्षा वाचून आमची झालेली कुंठितावस्था आणि एक सर्वाना परिचीत असलेले गाणे. निवेदन - उगा छंद, यमक, मात्रा, वगैरे चूका काढू नयेत. भावनाओंको समझो !! :) समिक्षेच्या वारीत मिळेना वाट हो... कुणी म्हणे छान कुणी पुचाट हो... आपली माणसं आपलीच नाती तरी लेखकाची वाचकास भीती तुकोबा.. कोणता झेंडा घेऊ हाती || आजवर ज्यांची वाचली समीक्षा भलताच त्यांचा चेव होता… पुरे झाली आता उगा माथेफोडी तुकोबात माझा जीव होता कळावा पिच्चर म्हणूनिया किती लेखकच्या झूंडी इथे येती वैरी कोण आहे इथे कोण साथी तुकोबा ..

चीजाळलेले अंडे (अर्थात झटपट वैदिक आम्लेट)

लेखक सुनील यांनी सोमवार, 11/06/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १) अंडे - एक २) चीज स्लाइसेस - दोन ३) झाकण असलेली मायक्रोवेव्-सेफ प्लेट वा बाऊल ४) मायक्रोवेव ओवन ५) मीठ आणि मीरपूड - चवीपुरते कृती - १) प्लेट वर एक चीजची स्लाइस घ्या. २) त्यावर अंडे फोडून घाला. ३) त्यावर चीजची दुसरी स्लाइस ठेवा. ४) प्लेटवर झाकण ठेवा. ५) प्लेट मायक्रोवेवमध्ये ठेऊन ४०-४५ सेकंद शिजवा. वितळलेल्या चीजमध्ये नखशिखांत भिजलेले अंडे तयार आहे. त्यावर चवीपुरते मीठ आणि मीरपूड भुरभुरवा आणि आस्वाद घ्या! टीपा - १) अंडे मायक्रोवेवमध्ये फुटते तेव्हा उघड्या प्लेट अथवा बाऊलमध्ये हा पदार्थ करू नये.

आपण सारे अर्जुन...

लेखक वेणू यांनी सोमवार, 11/06/2012 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
एक खळाळती नदी तिचे रम्य दोन्ही काठ, दोन तिरी दोन मन माना दोघांच्याही ताठ! ऐलतिरी पैलतिरी दोन्ही बाजू दोन मन, एक होकार भरितो दुजा नकार घोकून... वाटे निर्मळ वहावे अडता, मना पुसावे, त्याने संभ्रम सारावे आपणास सुखवावे! प्रत्यक्षात असे नाही मने धरी भिन्न तान एक मी, मी, मी म्हणे दुजा म्हणे मी महान..! संभ्रमाने गोंधळावे असा अजब प्रकार, इथे मत एक नाही म्हणे जगा निर्विकार!! मग सहजच वाटे सारे आपण अर्जुन, त्याचे प्रश्न मोठे होते आणि संभ्रम कठिण..!! इथे प्रश्न इवलाले करी आपणा अर्जुन, संभ्रमात जग म्हणे- नाही सुटका ह्यातून! त्यास कृष्ण तरी होता योग्य अयोग्य सांगाया, इथे आपणच खरे नसे कुणाचीच माया!

5 रायफल्स.. एक १००% हिंदी सिनेमा...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/06/2012 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी-कधी डोके अगदीच कामातून जाते.कुठलेही काम करावेसे वाटत नाही.अशावेळी मन परत शांत करायला , मी सडाफटिंग असतांना (म्हणजे भारतात रहात नसतांना) काही गोष्टी करतो.तसाही मी १००% डोंबिवलीकर असल्याने चित्रपट,नाटक. वाचन इ, बैठा विरंगुळा मला जास्त आवडतो.चेस खेळणे,ब्रिजचे २-४ डाव खेळणे,मोझार्ट्चे संगीत ऐकत पेपर वाचणे किंवा एखादा मस्त सिनेमा बघणे.

जांभुळ पिकल्या झाडाखाली (फोटो सहीत)

लेखक जागु यांनी सोमवार, 11/06/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याचे दिवस म्हणजे रानमेव्याचे दिवस. दर्‍या, डोंगरांवर, जंगलात रानमेवा तयार होत असतो. त्यातलाच एक रानमेवा म्हणजे जांभुळ. तसे जांभूळांचा आस्वाद घेण्यासाठी मला कधी दर्‍या डोंगरांत नाही जाव लागल. आमच्या वाडीतच ३-४ जांभुळांची झाडे होती. परी़क्षा आणि सुट्टीचा काळ ह्या दरम्यान जांभुळांचा बहर असायचा. मी अभ्यास नेहमी वाडीत जाऊन एखाद्या झाडाखालीच करायचे. अमुक एकच झाड असे काही ठरलेले नसायचे. सावली चांगली असेल, साफसुफ असेल अश्या झाडाखाली जाऊन अभ्यास करायचे. पण जांभुळांच्या सिझनमध्ये मात्र मुद्दाम स्वतः जांभुळ्याच्या झाडाखाली झाडलोट करून तिथे चटई टाकून अभ्यासाला बसायचे.

शोध तुकारामाचा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 11/06/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुकाराम बोल्होबा आंबिले हे नाव - निदान विशी उलटलेल्या - मराठी माणसाला नवीन नाही. लिखित माध्यम असो, ध्वनि माध्यम असो वा चित्रपट माध्यम असो, यातला कोणतंही माध्यम असं नाही ज्यातून आपण तुकोबाला पाहिलं, अनुभवलं नाही. तुकोबाचे आपले भावबंध इतके अलवार आहेत की तुकोबाचे नाव घेतले की आपण हळवे होतो. त्यामुळे तुकोबाच्या जीवनचरित्राशी आपण अगदी बांधले गेलेले आहोत.