रस्ता
जन्मापासून खातो आहे , आजवरी खस्ता
असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता
कधी देखणा.. प्रशस्त होता, सांगते हो कोणी
दोन कडेला उभारली ही टप-यांची लेणी
ऐश्वर्याच्या गालाहूनी मऊ म्हणे होता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
टप-यांपुढे उभी राहते, रिक्षांची सेना
बसथांब्यावर कुत्रे बसते, उतारूंची दैना
उरली आणिक, जागा म्हणूनी, पथा-याही आल्या
सोय झाली, गं भाजीची, बायका म्हणाल्या
शिस्त बिस्त, कधी इथे, कुणी पाळीत होता
असह्य झाले, तरी वाहतो, आहे हा रस्ता
उरल्या सुरल्या.. जागेमधूनी, लागती शर्यती
पळा पळा हो, कोण पुढे ते, स्वार कसे धावती
पल्याड जाण्या, सज्ज होते, पिकलेले एक पान
खबरदार, जर जाल पुढे तर, चिरडतील हो छान
मातीचा होता, . तेव्हा हा सम़ंजस होता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
तिथेच भरते रस्त्याकडेला, चिमण्यांची शाळा
भेदरलेल्या नजरा, आणिक वाहनांच्या माळा
भयाण वेगे चाकरमानी, उडवितात गाड्या
वेगापुढती विवेक बुडे जो , आवरा हो नाड्या
वाहनांपेक्षा जीवन जेव्हां स्वस्त होत जाता
असह्य झाले तरी वाहतो आहे हा रस्ता
संध्या
01 Feb 2010
| लेखनविषय: |
|---|
वाचन संख्या
2780
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत आहे....
ही कविता पाहून मला तुमच्याच
In reply to मिपावर स्वागत आहे.... by लीलाधर
चतुर चाणक्य, आभार
अहो ताई, मी कुठे म्हणालोय फळा
In reply to चतुर चाणक्य, आभार by सांजसंध्या
हो हो.. ते आलेलं लक्षात. (
पर्वापासुन खातो आहे गरमगरम
_/\__/\__/\_ भटजी, तुमच्या
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
@भटजी, तुमच्या अफाट
In reply to _/\__/\__/\_ भटजी, तुमच्या by प्रचेतस
दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या
In reply to @भटजी, तुमच्या अफाट by अत्रुप्त आत्मा
--^-- आमचाही दंडवत घ्या
In reply to दंडवत हो भटजीबूवा. !!! त्या by धन्या
अरे या अत्रुप्त आत्माला आवरा
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to अरे या अत्रुप्त आत्माला आवरा by पियुशा
जबराट!!
In reply to पर्वापासुन खातो आहे गरमगरम by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या
@आपल्यासारख्या सिद्धहस्त
In reply to अत्रुप्त आत्मा आपल्यासारख्या by सांजसंध्या
कविता आणि विडंबन दोन्हीची
पुढील कवितेच्या प्रतिक्षेत!!
आपल्या सर्वांचे आभार
लय भारी
क्या बात है !