पाककृती - झटपट भ्रमणगाथा लेखन
राम राम मंडळी
आजपर्यंत आपण अनेक पाककृती वाचल्या असतील, करुन पाहिल्या असतील, सांगितल्या असतील वगैरे इत्यादी... असो.
आता आपण एक पाककृती पाहू या !
आजकाल असल्या पाककृतींना फार डिमांड आहे असे म्हणतात.
तर ही पाककृती आहे भ्रमणगाथेच्या लेखनाची. लोकांना आजकाल भ्रमण करण्यापेक्षा भ्रमणगाथा वाचण्यात जास्त विंट्रेस्ट असतो. बरोबर आहे हो.. कोण त्या वाटा तुडवत जाईल, पोटाला खड्डे पाडेल. उगा आचरट लोक मधेच भेटतात त्यांच्याबरोबर रहावे लागेल. त्यापेक्षा कुणाची तरी भ्रम ण गाथा.. माफ करा... भ्रमण गाथा वाचावी, तोंडाने चुक चुक करावे..
मिसळपाव