Skip to main content

कानसेन कोण? २०१२ क्र.४

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकांनो, गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन! तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
गाणे क्र विजेता
चिंतामणी
अन्या दातार
निखिल देशपांडे
अन्या दातार
अन्या दातार + निखिल देशपांडे

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी

कानसेन कोण? २०१२ क्र. १

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?' मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार!

पवार पॉवर प्ले

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 26/09/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रवादीचे धुरंधर, धडाडीचे नेते अजितदादा पवारांनी आपला राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे. आता हे करुन काकाला धोका दिला का झोका दिला आणि ह्यातले बाबाकरता किती आणि साहेबांकरता किती आणि अशाच सुरस आणि चमचमीत चर्चांनी टीव्ही व अन्य माध्यमे भरून गेली आहेत. पांढरे नामक एका अधिकार्‍याने पर्दाफाश करुन अजितरावजीदादासाहेब पवारांचे काळे धंदे उघडकीस आणले म्हणून नाईलाजाने दादांना हे करावे लागले असे म्हणतात. आता पांढर्‍यांचे काही काळेबेरे होते का बघायचे. पाटबंधारे खाते खायला चांगले असावे असे दिसते आहे.

ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं????

लेखक जिन्क्स यांनी बुधवार, 26/09/2012 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या निर्बुद्ध "सकाळ" चं काय करायचं???? देवकर, भुजबळ, तटकरे आणि आता अजितदादा...राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने किती हि मोठा घोटाळा केला तरी आमच्या दैनिक "सकाळ" मध्ये ती बातमी कुठेच नसते (जी बाकी वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन असते). "टीम अण्णा मध्ये फूट" ही बातमी फ्रंट पेज वर हेडलाईन देणारा सकाळ, ७०००० कोटी च्या सिंचन घोटाळ्याच्या बातमीकडे सपशेल दुर्लक्षं करतो. सकाळ मधल्या पत्रकार मित्रांनो निरपेक्षं पत्रकारिता जपा. कुणाचं मुखपत्र बनून राहू नका. नाहीतर तुमचा "सामना" व्हायला वेळ नाही लागायचा... सकाळचा नियमित वाचक - जिन्क्स