कानसेन कोण? २०१२ स्पर्धेचा निकाल.
मित्रमैत्रिणींनो,
"कानसेन कोण?: २०१२" स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. अनेक मिपाकरांनी उत्साहाने भाग घेऊन ती यशस्वी केली याबद्दल सर्वांचे आभार. 'कानसेनच्या' निमित्ताने बर्याचजणांना आपापल्या आठवणीतील गाणी पुन्हा भेटली, आनंद देऊन गेली. सुरावट ओळखणे, चुकणे यांची धमाल अनुभवायला मिळाली. स्पर्धेत होणारी लुटुपुटीचे भांडणे, तात्पुरता जय, पराजय अनुभवताना पुन्हा लहान झाल्यासारखे वाटले.
मिसळपाव