राम .. राम .. राम ..
राम... राम... राम... राम ...
माळ घेऊन माझा जप चालू आहे
कानावर बातमी
पेट्रोल डिझेल महागले
राम .. राम .. राम ..
माळ घेऊन जप चालू
कानावर बातमी
कोळसा घोटाळा जलसिंचन घोटाळा
राम . राम.
जप चालू
राम .
सिलेंडरची टंचाई
मरा.. मरा.. मरा...
आजकाल माझा जप नीट का होत नाही, माझ्या रामालाच ठाऊक !
.
(बोध)कथा
3
विशेष
कताई शास्त्र ७
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले.
महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.
कानसेन २०१२ भाग क्र. ११
मंडळी नाराज नका होऊ....
भाग ११ येत आहे..
पीत वसन, कमल नयन
गणपतीचा उत्सव सुरु आहे.. घरी नसला तरी काकाकडे गणपती होता..
आपल्या हातून गणरायाची काहीतरी सेवा व्हावी असा उद्देश होता..
आज योग आला, घरी तसा लवकरच आल्याने एक गणपतीचं भजन म्हटलं
गणपती तसा कलेचा भोक्ता ,त्यामुळे माझे जे काही वेडे वाकडे स्वर असतील ते नक्की त्याने मनापासून ऐकले असतील..
मनापासून गायलं कि तो मनापासून ऐकणारच.. शेवटी भाव महत्वाचा :)
गणेश लेखमाला सुरु आहे मिपावर , हा लेख नाहीये..
कानसेन २०१२ भाग क्र. १०
चला मंडळी
गणपाच्या 'एक ही फिल्मसे' नंतर आज सगळी सोप्पी-सदाबहार गाणी घेऊन येत आहे..
| गाणे क्रमांक | विजेता |
| १ | मराठे |
| २ | मराठे |
| ३ | मराठे |
| ४ | चतुरंग, मराठे, स्नेहांकिता |
स्वर साम्राज्ञी !
स्वर सम्राज्ञी चा उद्या वाढ दिवस आहे. मला आठवते तेंव्हा पासून राणी गाते आहे. माझा एक काका “बाईंचा” मोठ्ठा पंखा होता. जाता जाता त्याने मला कोकिळेचा पंखा करून टांगले. रेडिओ मॉस्को वर “हवा में उडता जाये मेरा लाल दुपट्टा मलमल का” हे गाणे ऐकले आणि मी पुरता बिघडलो. पुढे जावून त्यामागच्या काळातील गाणी ऐकली आणि अनुशेष भरून काढला. शिरीष कणेकर वाचता झालो आणि हिरो वर्षीप सुरु झाली. भक्ती इतकी की कोणी मल्लिकेच्या गाण्याविषयी प्रतिकूल बोलले तर तो आयुष्यातून कटाप होत असे. पुढे वय वाढले आणि भक्ती कमी झाली आणि दिव्यत्वाची प्रचीती आली.
कानसेन कोण? २०१२, क्र.९
मी पुन्हा आलिये बरं का! जरा सोपी गाणी देते.
मिसळपाव