साहित्यः
याला कुठलाही बुटका गहु चालतो. लोकवन चालत नाही. पण कल्याण सोनाची बुटकी जात किंवा एच डी २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.
आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार!
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.
हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.
वाचने
10705
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अशा नेहमीच्या पाहण्यात
+१
In reply to अशा नेहमीच्या पाहण्यात by गवि
गव्हाचा चिवडा पहिल्यांदाच
In reply to +१ by गणपा
आता ग्रोसरी स्टोअर शोधणे आले.
In reply to गव्हाचा चिवडा पहिल्यांदाच by गवि
अरे व्वा पहीलांदाच पाहतीये हा
नविन पाकृ
>> यात काळजी एकच घ्यायचीये की
>>>कित्येक वेळा माझ्याकडून
In reply to >> यात काळजी एकच घ्यायचीये की by पिंगू
अरे देवा! वाचायला किती अवघड
In reply to >>>कित्येक वेळा माझ्याकडून by प्यारे१
तेक अ चिल पिल ग्रानी.....
In reply to अरे देवा! वाचायला किती अवघड by रेवती
गव्हाचा चिवडा
In reply to >> यात काळजी एकच घ्यायचीये की by पिंगू
छान...
जबरी पण बरीच वेळखाऊ पाकृ आहे.
मस्तच
वा मस्त चिवडा.
अप्रतिम !
हाइ ते गैर्हं भारी काम कर टाकं
>>>> घर जाइ बायकोले सांग्न
In reply to हाइ ते गैर्हं भारी काम कर टाकं by इरसाल
आता आम्ही कुठे जावे?? नुसती
धन्यवाद...
मीठः रुचेल तेवढे पापडखारः
गव्हाचा चिवडा
In reply to मीठः रुचेल तेवढे पापडखारः by सूड
आमच्यासाठी नविन प्रकार,पण
आभार
मस्त दिसतोय!
चिवडा भारी दिसतोय
पारंपारिक पाककृतींचे स्वागत.
अरे व्वा... एकदम हटके पदार्थ
केवळ
:)
व्वा..