Skip to main content

वेंकट

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 24/10/2012 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी वेंकटेशन अय्यर . हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो... लंचब्रेक मध्ये सगळेजण हास्यविनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता ...

चावडीवरच्या गप्पा – ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 24/10/2012 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
आवशीचा घों ह्या रांडेच्या मॅथ्यु हेडनच्या!”, घारुअण्णा भयंकर चिडून आणि लालबुंद होऊन कट्ट्यावर हजेरी लावत. “काय झाले घारुअण्णा आज अचानक!”, नारुतात्या. “अहो शिंचा मॅथ्यु हेडन म्हणतोय सचिनला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ने सन्मानित करू नका”, घारुअण्णा रागाने थरथरत. “अहो घारुअण्णा का शिळ्या कढीला ऊत आणताय?”, इति भुजबळकाका. “नाहीतर काय! काय हो घारुअण्णा रद्दी काढलीत की काय वाचायला? आणि हो, तो तुमचा संध्यानंद सोडून ह्या कसल्या क्रीडा विश्वाच्या बातम्या वाचताय? खी खी खी...”, शामराव बारामतीकरांनी भुजबळकाकांची री ओढली. “हे बघा, अस्मितेचा प्रश्न आहे हा, बातमी जुनी असो की नवी!

बुद्धिभेद

लेखक तिमा यांनी बुधवार, 24/10/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी सकाळी, मटा वाचून तोंड कडू झाले. त्याला कारण हा प्रताप आसबे, यांचा बुद्धिभेद करणारा ही लेख! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16934058.cms#write आज भ्रष्टाचाराविरुद्ध सगळ्या समाजाची एकजूट करण्याची गरज असताना असे जातीय लेख लिहून हे नवपत्रकार आपल्या अकलेचे तारे तोडत आहेत. (किंवा त्यांचा बोलविता धनी ते करवतो आहे, चार तुकडे फेकून). या लेखात बहुजन नेत्यांची बाजू घेऊन अभिजन कसे त्यांचे चारित्र्यहनन करत आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

अवतार

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 24/10/2012 05:43 या दिवशी प्रकाशित केले.
महानता त्याच्या रोमारोमात भिनलेली आहे... अशक्य असं काही नाहीच....खरंतर जगाचे सगळे रेकॉर्ड्स त्याच्या नावावर व्हावे.... पण त्याचे त्याला काहीही अप्रुप नाही.......डेक्कन क्वीन फ़ुल स्पीडने डोंबिविली स्टेशनवर येत असते....त्याच दिशेच्या टोकाला हा उभा असतो....गाडी आली तेव्हाच हा रेस सुरु करतो....आणि पळत सुटतो....गाडी स्टेशन पार करण्याच्या आधी ह्याने दुसऱ्या टोकाचा ब्रिज चढुन....दुसऱ्या प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन तिथुन धावत डेक्कन क्वीनच्या आधी प्लॅटफ़ॉर्म पार करुन....खाली रुळावर उतरतो आणि डेक्कन क्वीन जाण्याच्या आधी तिला क्रॉस करतो.... सांगा आता हा मनुष्य जगातला सर्वात वेगवान माणुस नाही का?

“ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला

लेखक सारथी यांनी बुधवार, 24/10/2012 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 तिसरा दिवस : ०५ जानेवारी २०१२ सिंदखेड राजा – मलकापूर मार्गे बुलढाणा – मुक्ताईनगर आज देखील सकाळी ६ वाजता उठलो, आज चक्क अंघोळ केली. सर्व काही आवरून ७ वाजता गुरुद्वारा मध्ये जाऊन आलो. आज गाडीमध्ये सामान चढवण्यासाठी ५ जण गेलो. २०० जणांचे सामान चढवताना अक्षरशः घाम निघतो. लोक पण अगदी मुंबई-न्यूयॉर्क प्रवास करत असल्यासारखे सामान घेऊन आले होते. अर्थात सर्वजण नाही पण बरेचजण. नाश्ता म्हणून फोडणीचा भात होता, एकदम मस्त झाला होता.

इतकच!

लेखक जेनी... यांनी बुधवार, 24/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
भावनांच्या आधारे केलेले वार सगळेच रिकामे नव्हते, जखमा भरुन यायला वेळ लागला इतकच ! 'हळव्या' शब्दालाहि हसण्यामागे अर्थहिन बनवलं, हसरि म्हणुन मिरवलं इतकच! मनात का कोण जाणे, बरच दडलं होतं ,लाव्हाच थोडक्यात, कधीतरी आसवानी मदत केली इतकच! नातं काहिच नव्हतं, तरिहि आपल्यात बरच काहि, मी बहुतेक जपलं इतकच!
काव्यरस

बंदी आणि संशोधन

लेखक मंदार कात्रे यांनी मंगळवार, 23/10/2012 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
cannabis for peace या संस्थेचे एक पत्रक नुकतेच वाचनात आले. त्यात cannabis च्या औषधी गुणधर्मा बाबत सखोल आणि शास्त्रशुद्ध माहिती दिली होती. मग उत्सुकता चाळवली म्हणून युट्युब वर cannabis सर्च केले ,तर एकापेक्षा एक नामवंत डॉक्टर cannabis च्या औषधी गुणधर्माची भलामण करताना दिसले. जगभरात अनेक देशात cannabis वर बंदी आहे. भारतात "भांग "नावाचा प्रकार उत्तर भारतात सर्रास सर्वत्र उपलब्ध असतो, त्याला कायद्याने परवानगी आहे,म्हणजे दारू दुकानांचे जसे परवाने दिले जातात तसे भांगेच्या ठेक्यांचे परवाने दिले जातात.

’तिच्यामुळे’

लेखक ह्रषिकेश चुरी यांनी मंगळवार, 23/10/2012 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
पेन होतं, कागद होता त्या रात्री तो जागत होता रात्र चढू लागली त्याला आशा वाटली चंद्र गोजिरा झाला गार वारा झाला मन कोरं होतं, कागदही कोरा होता तरी पेन कागदाला भिडला पाच मिनीटं तसाच राहीला, एक ठिपका करून वर आला रात्रभर हेच चालू राहीले श्वास चालू राहीले, आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते घड्याळाचे काटे सरकू लागले आज कविता होणार नाही हे कळू लागले रात्र संपू लागली पेनातली शाई सुकू लागली झोप येऊ लागली त्याने अखेर पेन उचलला आणि ’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला ह्रषिकेश चुरी
काव्यरस