लेखकविदेशयांनी बुधवार, 09/05/2012 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो एक पदर मायेचा
आधार किती आईचा
वादळात सामर्थ्याचा
भयमुक्ती उपदेशाचा
नजराणा संस्काराचा
संदेश शांत जगण्याचा
रागास शांत करण्याचा
मस्तकास थापटण्याचा
तो दर्शक सन्मार्गाचा
तो रक्षक कल्याणाचा
तो पूजक सौंदर्याचा
प्रतिक्रिया