गोंय (गोवा) - पाटणें बीच - २
गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! .......
दुसर्या दिवशी सकाळी लवकर जाग आली ती रिसोर्टमधील झाडांवर गुंजारव करणार्या पक्षांच्या किलबिलाटाने. त्या दिवशी धाकट्याचा वाढदिवस होता. मग तो झोपलेला असतानाच त्याच्यासाठी केक आणायला मोठ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो. रिसेप्शनवर केक कुठे मिळेल त्याची चौकशी केली आणि २-३ किमीवर असलेल्या एका गावात मॉंजिनीज आहे असे कळले. आनंदाने तिकडे निघालो. त्या गावात पोहोचल्यावर त्या गावाचे नाव कळले आणि आनंद द्विगुणित झाला. त्या गावाचे नाव होते चावडी.
मिसळपाव
सचिनने आज ए