मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची काळजी घ्या!!

मराठमोळा · · काथ्याकूट
नमस्कार मंडळी, डिस्क्लेमरः प्रेषक किंवा त्याचे कुटुंब स्वतः कोणत्याही आजाराचा बळी नाही, उगाच कल्पनाविस्तार नको. आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनमानात आपले शरीर आणि मन सुदृढ रहाण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे वाटते. शरीरस्वास्थ्यासाठी हजारो औषधे असली तरी त्यापासून दूर कसे रहाता येईल हे जास्त महत्वाचे. मानसिक विकारांसाठी ईतरांची गरज लागते, आपल्या आजुबाजुच्या लोकांची काळजी घ्या. फार कमी संख्येने लोक हे करतात म्हणून हा प्रपंच. सुरुवात म्हणजे "मला काय होणार?, मला काहीही होणार नाही, मी निर्व्यसनी आहे किंवा मी जास्त घेत नाही/मी रोज जीमला जातो/१० किमी पळतो त्यामुळे मला काही होणार नाही" हा विचार मनातून काढून टाका. हजारो प्रकारची माणसे, आचार-विचार, राहणी, खाण्यापिण्याच्या पद्धती यामुळे कुणालाही कधीही कोणतीही व्याधी जडु शकते. रोग, अ‍ॅलर्जी तुम्ही कोण आहात हे पाहुन हल्ला करत नाहीत. आजकाल डॉक्टरांवर विश्वास ठेवणे अवघड असले तरी डॉक्टरच तुमचे निदान करु शकतो. काही लोक भितीपोटी डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात किंवा आजार अंगावर काढतात. आपले सुद्रुढ शरीर आणि मन हीच आपली खरी संपत्ती आहे हे विसरु नका. थोडक्यात मांडायचा प्रयत्न करीत आहे तरी अनुभवी/जाणत्या लोकांनी चुकांना दुरुस्त करावे. तपासण्या: १. स्त्रियांनी नेहमी थायरॉईड्/ब्रेस्ट कँसर यांच्या टेस्ट करुन घ्याव्यात. २. भरपूर गोड खाणार्‍यांनी रक्त व लघवी यांची साखर तपासणी करुन घ्यावी. ३. रेग्युलर पिणार्‍यांनी फॅटी लीवर, रक्त, लघवी यांची तपासणी करावी. ४. वेश्यागमन्/किंवा अनेक स्त्रियांशी संग ठेवणार्‍या पुरुषांनी लिंगसंबंधी आजाराशी निगडित तपासण्या वेळोवेळी कराव्यात. ५. सर्वांनीच "कंप्लीट बॉडी चेकअप वर्षा दोन वर्षामधुन करावे. ६. खुप जास्त मांसाहार्/तेलकट तुपकट खाणार्‍यांनी कोलेस्ट्रॉल तपासण्या कराव्या. आणखीन बरंच आहे, जाणते लोक्स, डॉक्टर (मिपाकर) सांगतीलच. रोजची काळजी. डॉ़क्टर किंवा आहारशास्त्र सांगते ते रोज पाळणे अवघड असले तरी काही गोष्टी करुच शकतो. १. भरपूर पाणी प्या (अतिरेक नको). हापिसात एखादी बाटली (पाण्याची ;) ) जवळ ठेवल्यास पाणी पिणे वाढते. २. दात, डोळे, कान यांची निगा राखा, घरात/शरीराची स्वच्छता ठेवा. ३. एखादं दुसरं फळ जवळ ठेवा, भुक लागल्यावर ते खा चिप्स नको. ४. शक्यतो चाला. लिफ्ट्/रिक्शा गाडी टाळा (हामेरीकन लोकांसाठी पेश्शल) ५. जमल्यास जॉगिंग्/योगा/ तत्सम व्यायाम करा. अगदीच काही नाही तर जेवणावर नियंत्रण ठेवा. वेळेत जेवण, झोप, आनंदी मन देखील रोगांना दूर ठेवू शकते. मानसिक रोगांविषयी जास्त माहिती नाही, पण चीडचीड, रागराग न करणे आपल्या हातात आहे. हापिसचे टेंशन शक्यतो हापिसातच ठेवा. सकाळी, संध्याकाळी एखादं भजन्/आवडतं गाणं ऐका. कुटुंबीयांबरोबर अधुन मधुन बाहेर फिरायला जा. वाचनाची आवड असेल तर कधी एकटेच ग्रंथायलात जाउन वाचन करा. सर्वांनी भरपूर हसा, आनंदी रहा सुदृढ रहा :) हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपला, मराठमोळा.

वाचने 15286 वाचनखूण प्रतिक्रिया 45

हितोपदेशकांच्या गर्दीत ममोची देखील भर पडलेली पाहून ड्वाले पाणावले. आता हा धागा तसेच ह्यावरती येणार्‍या प्रतिक्रियांपासून स्फुर्ती घेऊन येणार्‍या :- भरपूर पाणी कसे प्यावे... जॉगींग कसे करावे... दात डोळे कान ह्यांनी निगा कशी राखावी... एका वेश्यागमनीची व्यथा... कॅन्सरची हाक आणि मिपाचा भूतकाळ.. इ. इ. धाग्यांची वाट पहात आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मराठमोळा Fri, 06/22/2012 - 16:51
>>हितोपदेशकांच्या गर्दीत ममोची देखील भर पडलेली पाहून ड्वाले पाणावले. हितोपदेशक म्हणून काहुन शिव्या देऊन राह्यलाय बे.. अन ड्वाले बी पानी प्रसवून राहिलेत.. ;) तुझी एक बाटली माह्याकडं प्येंडींग हाय.. देऊन टाकंन दुसर्‍याला ब्वरं का... मंग बग...

सर्वसाक्षी Fri, 06/22/2012 - 17:11
२. भरपूर गोड खाणार्‍यांनी रक्त व लघवी यांची साखर तपासणी करुन घ्यावी> साहेब, गोड खाऊन मधुमेह होतो हे नविनच आहे! मधुमेहींना साखर निषिद्ध आहे, पण साखर खाऊन मधुमेह होतो हा प्रचंड गैरसमज आहे.

In reply to by सर्वसाक्षी

मराठमोळा Fri, 06/22/2012 - 17:15
>> गोड खाऊन मधुमेह होतो हे नविनच आहे! केवळ गैरसमज....हे मी कुठेही म्हंटलेले नाही. भरपूर गोड खाल्याने शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज प्रमाण वाढू शकते यासाठी ते वाक्य होते.

In reply to by अमितसांगली

मराठमोळा Fri, 06/22/2012 - 17:17
>>हे विचार अन्यत्र प्रकाशित केले तर चालतील का केलेत तर आनंदच आहे. एखाद्या व्यक्तीलाही फायदा झाला तरी चांगलच. :) ज्या लोकांना माहिती नाही त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

विकास Fri, 06/22/2012 - 17:18
लेखाच्या मथळ्या वरून उगाचच "मिपा पडीकांना" जास्त वेळ येथे राहीलात तर "मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची काळजी" घ्यावी लागते असे म्हणायचे होते का काय असे वाटले. ;)

माह्याकडं प्येंडींग हाय' ही भाषा? आणि : रेग्युलर पिणार्‍यांनी फॅटी लीवर, रक्त, लघवी यांची तपासणी करावी हा सल्ला, कामालाये!

सुनील Sat, 06/23/2012 - 03:07
सल्ले आवडले. आम्ही काळजी घेत आहोतच. तुम्हीदेखिल कल्जि घेणे ;)

पैसा Sat, 06/23/2012 - 09:15
गेल्या काही दिवसांत ममो सातत्याने काहीतरी चांगलं आणि उपयोगी पडेल असं लिहिताय. बाकी मंडळींनी यात भर घालून एक चांगला संग्राह्य धागा तयार केला तर उत्तम होईल. माझ्याकडून एक भर. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण|

श्रीरंग_जोशी Sat, 06/23/2012 - 10:23
फारच उपयुक्त माहिती हो. एक महत्त्वाची गोष्ट विसरलात की.
  • मानसिक स्वास्थ जपण्यासाठी मन प्रफुल्लित ठेवावे अन त्यासाठी मिपावर सकाळ संध्याकाळ पडीक राहावे...

In reply to by श्रीरंग_जोशी

मराठमोळा Sat, 06/23/2012 - 10:44
>>फारच उपयुक्त माहिती हो. हाहाहा.. हा उपरोध समजायचा का? नसला तरी माहिती कसली हो जोशीसाहेब,. ही माहिती जवळपास सर्वांनाच असते फक्त वेळोवेळी आठवण करत रहायची असते. बहुतेक वेळा आपण तब्येतीकडे दुर्लक्ष करतो किंवा टाळाटाळ करतो म्हणून एक जेंटल रिमाईंडर आहे तो. ;)

In reply to by मराठमोळा

श्रीरंग_जोशी Sat, 06/23/2012 - 10:52
ममो -एवढ्या साऱ्या महत्त्वाच्या सूचना कुठलाही क्लिष्टपणा न आणता, सोप्या भाषेत एवढ्या प्रेमाने सांगत आहात अन आम्ही उपरोध केला तर कुठे जाऊन फेडणार ते पाप, ताडोबाच्या जंगलात? ;-)

In reply to by नाना चेंगट

कुंदन Sat, 06/23/2012 - 12:03
म्हणजे मागे २००८ मधे तुम्ही २०१० मधे असे काहीसे होईल भाकीत केले होते त्याप्रमाणे का? भाकीत असो आर्थीक पडझड व जगबुडी भाकीते हे तुमच्यासारखे जाणकारच जाणे! काही दिवसांतच येणार्‍या आर्थिक पडझडी पासुन कसे वाचावे याचे पुन्हा एकदा मार्गदर्शन करावे ही विनंती विशेष.

शैलेन्द्र Sat, 06/23/2012 - 11:48
च्यायला!!!! हे आणी अशा प्रकारच लिखान वाचुन असं वाटत की हा मानवी देह जगायसाठी न बनवता मरायसाठीच बनवलाय.. थोडस निसर्गावर व स्वता:च्या शरीरावर विश्वास ठेवा हो.. रोज या शरिरात काहीतरी बिघडत असतं, आणी तितक्याच वेळा दुरुस्तही होत असतं, ज्या क्षणी ही दुरुस्त होण्याची ताकद संपते, त्याक्षणापासुन पुढे, कोणतीही औषध तुम्हाला खर्‍या अर्थाने बरं करु शकत नाहीत.. सजीवांची शरीर ही पुनरुत्पादनासाठी बनवली गेलीत, ते संपल की त्यांच नैसर्गीक प्रयोजन संपलं. पंचेचाळीशी- पन्नाशीनंतरचा प्रत्येक दिवस हा बोनस आहे ही मानसिकता आजपासुनच बनवायला हवी. रोज गोळ्यांची उसळ खात वेदनादायी आयुष्य जगायच की योग्य वेळी विमुक्त होवुन मानसीक वानप्रस्थ स्विकारायचा हे ज्याने-त्याने ठरवावे. व्यायाम्/आहर-विहार्/व्यसन-नियमन सगळे मान्य आहे, पण अती चाचण्या करुन फुकटचे भुंगे डोक्याला लावुन घेणे मला तरी पटत नाही. त्यापेक्षा खाण्यापिण्यावर नियंत्रण व शरिराला वारंवार आव्हान देणे मी पसंत करतो. शरिर तुम्हाला सगळ सांगत असत, तुम्ही फक्त ते ऐकल पाहीजे. "नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचनी, जिणे गंगौघाचे पाणी" अशी मानसिकता राहील असं वागु शकलो तर मानसीक तणावही बरेच कमी होतात.

In reply to by शैलेन्द्र

मराठमोळा Sat, 06/23/2012 - 12:08
मानवी देह जगायसाठीच बनवलाय.. गाडीची देखील वेळोवेळी सर्विसिंग केली तर तिचंही आयुष्य वाढतं, खिशाला भुर्दंड न पडता ती तुमची साथ देत रहाते. शरीराचंही असंच आहे. यात तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अतिरेक वाटला कळालं नाही. तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, आनी हे वेळीच कळालं तर वेळीच खाण्यावर नियंत्रण आणून पुढील गंभीर रोगांना टाळू शकता.. एवढंच म्हणणं आहे. मी लेखात अती चाचण्या करुन घ्या असे कुठेच म्हंटलेले नाही. सर्वसामान्य लोकांनी १-२ वर्षांनी चेकअप करावे असेच म्हंटले आहे. डाएटींग करा असेही म्हंटले नाही. थोडीफार काळजी घेणे म्हणजे शरीरावर, निसर्गावर विश्वास नाही असे नाही. आजकालच्या लाईफस्टाईल मधे हे गरजेचे आहे एवढेच.

In reply to by मराठमोळा

शैलेन्द्र Sat, 06/23/2012 - 12:23
:) जर्रा जोरात लिहील्याबद्दल सॉरी.. गाडी आणी शरीराची तुलना नाही हो. दोघांत खुप फरक आहे, मी तर म्हणतो कॉलेस्ट्रॉल वाढायचीही वाट पाहु नका, आधीच अनारोग्यकारी सवयी सोडुन द्याव्यात. दुसरं म्हणजे काहीही केलं तरी तुमच्या जणुकांमधली शक्ती किंवा कमतरता काहीना काही बर्/वाईट घडवतेच. आहार वगैरेच योगदान २५-३०% पेक्षा जास्त जात नाही. या विषयावर एक लेख लिहायचाय, पण ते राहुनच जातंय. माझा मुद्दा वेगळा होता, निसर्गाने प्रत्येक प्राण्याला एक आयुमर्यादा दीलीय, त्यावरचा प्रत्येक दिवस हा खरतर बोनस असतो, आपल्या दिर्घायुष्याची अती काळजी करणे सोडुन द्यावे व ४५-५० पर्यंतच सगळ आयुष्य जगुन होइल अस नियोजन करावे.. म्हणजे त्यापुढचा प्रत्येक क्षण हा कोणतेही लक्ष न ठेवता आनंदात घालवता येइल.

In reply to by शैलेन्द्र

श्रीरंग_जोशी Sat, 06/23/2012 - 12:33
शैलेन्द्र - आपण मांडलेले विचार आदर्श आहेत. प्रत्येकालाच ते जमू शकणे सोपे नाही. मग चाचण्या, निदान, उपचार आलेच ना.

In reply to by शैलेन्द्र

अर्धवटराव Sat, 06/30/2012 - 03:01
>> शरिर तुम्हाला सगळ सांगत असत, तुम्ही फक्त ते ऐकल पाहीजे. -- आयला... मला तर वाटायचं कि शरीराने जे जे सांगितलं ते सर्व ऐकल्याचा परिणाम म्हणजेच रोगराईला आमंत्रण... अर्धवटराव

In reply to by शैलेन्द्र

मराठी_माणूस Sat, 06/30/2012 - 07:21
सजीवांची शरीर ही पुनरुत्पादनासाठी बनवली गेलीत, ते संपल की त्यांच नैसर्गीक प्रयोजन संपलं. पंचेचाळीशी- पन्नाशीनंतरचा प्रत्येक दिवस हा बोनस आहे ही मानसिकता आजपासुनच बनवायला हवी
अवघे पाउणशे वयोमान हे नाट्यगीत विसरलात वाटते ?

आनंदी गोपाळ Sun, 06/24/2012 - 12:01
तपासण्या: १. स्त्रियांनी नेहमी थायरॉईड्/ब्रेस्ट कँसर यांच्या टेस्ट करुन घ्याव्यात. २. भरपूर गोड खाणार्‍यांनी रक्त व लघवी यांची साखर तपासणी करुन घ्यावी. ३. रेग्युलर पिणार्‍यांनी फॅटी लीवर, रक्त, लघवी यांची तपासणी करावी. ४. वेश्यागमन्/किंवा अनेक स्त्रियांशी संग ठेवणार्‍या पुरुषांनी लिंगसंबंधी आजाराशी निगडित तपासण्या वेळोवेळी कराव्यात. ५. सर्वांनीच "कंप्लीट बॉडी चेकअप वर्षा दोन वर्षामधुन करावे. ६. खुप जास्त मांसाहार्/तेलकट तुपकट खाणार्‍यांनी कोलेस्ट्रॉल तपासण्या कराव्या.
असल्या तपासण्या करण्याची अजिबात गरज नाही. कंप्लीट बॉडी चेकप म्हणजे नक्की काय करणार :)) ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी ३५+ वयानंतर करीत जावी. बाकी सगळे थोतांड / मार्केटिंग आहे. (क्र. ४ मधे दिलेल्या बाबीविषयी नो कॉमेन्ट्स.)

In reply to by आनंदी गोपाळ

मराठमोळा Sun, 06/24/2012 - 14:25
तपासण्या करण्याची गरज नाही ह्याला काही ठोस आधार? दोन समान शिक्षण असलेल्या डॉक्टरांच्या मतामधे देखील ईतका फरक असतो कधी कधी की बिचारा पेशंट गांगरुन जातो. काही डॉक्टर रेग्युलर चेकअप करुन घ्या असे सुचवतात तर काही नाही. आणि मार्केटींग्/थोतांड असेल तर मग आजारी पडल्यावर तरी कशाला टेस्ट करायच्या? तुम्ही माझा आधीचा हा लेख वाचा (डॉक्टरांवर विश्वास ठेवायचा की नाही इथपासून सुरुवात आहे.) माझ्या स्वतःच्या पाहण्यात अशा केसेस आहेत की वेळीच तपासण्या केल्या असत्या तर काहींचे जीव वाचले असते तर काहींचे बरेच पैसे. १. किडनी स्टोन हा प्रकार त्रास सुरु व्हायच्या आधी कळाला तर फायदा होतो (ज्यांना त्रास झालाय त्यांना विचारुन बघा. किती वेदनामय असतो तो प्रकार) २. हार्ट काँप्रेशन/ ब्लॉकेज हे वेळीच कळाले तर हार्ट अ‍ॅटॅक सारखे प्रकार टाळता येतात. (तरुण लोकंही आजकाल हार्ट अ‍ॅटॅकने गेल्याच्या बातम्या आपण ऐकतो). ३.एका ईसमाला कोणताही आजार नव्हता पण वेळोवेळी रेग्युलर चेकअप करायची सवय होती. त्यामुळे अल्सरची सुरुवात झाली आहे हे टेस्ट मधे वेळीच कळालं आणि उपचार पण झाले. काय गैर या सगळ्यात? आणखीन उदाहरणे बरीच आहेत. शासकीय वैद्यकीय ईस्पितळात २-३ हजार रुपयात महत्वाच्या तपासण्या होतात, मग वर्षा-दोन वर्षामधून करायला काय हरकत आहे म्हणतो मी. आनी कंप्लीट बॉडी चेकअप मधे कोणत्या तपासण्या करायच्या? ही घ्या एक साधारण लिस्ट. वय्/मेडीकल हिस्ट्री नुसार यात बदल होऊ शकतो. Male Female 2 D Echo with Color Doppler ECG CBC CBC RUA RUA S12 S12 HIV HIV AUS AUS USG ABD USG ABD USG KUB USG KUB TFT सांगायचं एवढच की निसर्गाला आव्हान देणारे आपण कोण? स्वतःवरुन उदाहरण घेऊन बाकीच्यांच शरीर तसच असेल असा निष्कर्ष कशाला काढायचा? डॉक्टर स्वतः देखील आयुष्यभर प्रॅक्टीस करत असतो. म्हणजे काय करतो?.. एखाद्याला काही आजार असेल तर लक्षणांवरुन गोळ्या, औषधं देतो, बरा नाही झाला तर दुसर्‍या आजाराच्या.. मग? समजा हा धागा वाचून एखाद्या व्यक्तीने टेस्ट करुन घेतल्या आणि त्याला किडनी स्टोनची सुरुवात आहे हे कळालं तर फायदाच होईल की नाही? आणि तुमचा प्रतिसाद ऐकुन एखादा न टेस्ट करता बसला, आणि उद्या हार्ट अ‍ॅटॅक ने गेला तर? असो..

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Fri, 06/29/2012 - 22:03
महोदय, माझी डिग्री सर्टीफिकिटे (युजी/पीजी) इथे डकवायची इच्छा नाही. गरजही नाही. वरील प्रतिसादात 'फुकट' वैद्यकिय सल्ला म्हटले आहे. पटला तर घ्यावा, न पटल्यास सोडून द्यावा. अधिकारी व्यक्तीने दिलेल्या फुकट सल्ल्याला किंमत नसते. फुकट सल्ल्या बाबतीत डॉक्टरपेक्षा केमिस्टाचे लोक जास्त ऐकतात.. आधीच डॉक्टर लोक 'विनाकारण' तपासण्या लिहून देतात म्हणून बोम्बाबोम्ब सुरू आहे. वरून हे झेंगट कशाला हवंय? (सुमारे २५ वर्षांपासून डॉक्टरकी करण्यात आनंदी) सर्जन, गोपाळ *** थोडे 'कंप्लीट बॉडी चेकप' बद्दल. फक्त डोळे, फक्त नाक/कान/घसा अशासाठी पूर्ण ३ वर्षांचा एम.एस. अभ्यासक्रम असतो. उदा. नुसत्या डोळ्याची 'कंप्लीट' चेकप करायला सुमारे ४८-५० तास (एकूण) + रु. १ लाखापर्यंत खर्च येईल. या 'कंप्लीट' चेकपने तुम्हाला 'फॉल्स सिक्युरिटी' येण्याशिवाय काहीही होत नाही. गाडीची कंपनीतून 'फुल सर्विसिंग' करून आणल्यावर पेट्रोल संपून्/पंक्चर होऊन/खड्ड्यात जाऊन इ.इ.इ. गाडी अपघातग्रस्त होऊच शकते, तसेच शरीराचेही आहे. शरीर गाडीपेक्षा १० लक्ष पटीने जास्त गुंतागुंतीचे आहे. सबब, कंबॉचे = थोतांड. आजारी पडलात तर नक्की डॉ.कडे जा. इन्शूरन्स चा हप्ता त्या कंबॉचे च्या खर्चातून निघतो. तो भरा. फुकट पैसे उडवू नका.

In reply to by आनंदी गोपाळ

कुंदन Fri, 06/29/2012 - 22:13
सहमत. मी दर ३ ते ६ महिन्याने करुन घेतो सार्‍या ब्लड टेस्ट्स ... त्यानुसार मग आहार अन व्यायाम ठरवता येतो. काही काळापुर्वी ट्रायग्लिसराईडस चा काउंट वाढला होता , योग्य आहार अन व्यायामामुळे तो नियंत्रिक करण्यास मदत झाली.

In reply to by आनंदी गोपाळ

मराठमोळा Fri, 06/29/2012 - 23:59
>>माझी डिग्री सर्टीफिकिटे (युजी/पीजी) इथे डकवायची इच्छा नाही. गरजही नाही. >>वरील प्रतिसादात 'फुकट' वैद्यकिय सल्ला म्हटले आहे >>सुमारे २५ वर्षांपासून डॉक्टरकी करण्यात आनंदी म्हणजे तुम्ही फार फार मोठे आणि मानवी शरीराबद्द्ल सगळं माहिती असलेले महान डॉ़क्टर आहत तर.. >>थोडे 'कंप्लीट बॉडी चेकप' बद्दल. तुम्ही मांडलेले विचार लेखाच्या अगदीच विरुद्ध आहेत. कंप्लीट बॉडी चेकअप म्हणजे रेग्युलर चेकअप हे आधीच म्हंटले आहे आणि तपासण्याही कोणत्या ते लिह्ल्या आहेत. अशा तपासण्या करणे म्हणजे त्यात गैर काहीच नाही. तुम्ही खोलात जाऊन करण्यासारख्या तपासण्यांविषयी लिहिले आहे. फुकट पैसे उडवा असे मीही कुठेही म्हंटलेले नाही :) सामान्य आरोग्यमान असलेल्या लोकांनी १-२ वर्षातून एकदा ब्लड सुगर सारख्या रेग्युलर तपासण्या करा असाच अनुरोध होता. >>गाडीची कंपनीतून 'फुल सर्विसिंग' करून आणल्यावर पेट्रोल संपून्/पंक्चर होऊन/खड्ड्यात जाऊन इ.इ.इ. गाडी अपघातग्रस्त होऊच शकते, तसेच शरीराचेही आहे याबद्दल कुठेही दुमत नाही लेखात.

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Sat, 06/30/2012 - 00:59
म्हणजे तुम्ही फार फार मोठे आणि मानवी शरीराबद्द्ल सगळं माहिती असलेले महान डॉ़क्टर आहत तर..
होय.
तुम्ही मांडलेले विचार लेखाच्या अगदीच विरुद्ध आहेत.
विरुद्ध विचार मांडू नयेत असे आपण आपल्या लेखात लिहिलेले नाही. लिहिले असतेत, तर फक्त हो शी हो केले असते.
कंप्लीट बॉडी चेकअप म्हणजे रेग्युलर चेकअप हे आधीच म्हंटले आहे आणि तपासण्याही कोणत्या ते लिह्ल्या आहेत. अशा तपासण्या करणे म्हणजे त्यात गैर काहीच नाही. तुम्ही खोलात जाऊन करण्यासारख्या तपासण्यांविषयी लिहिले आहे.
सामान्यत: अमुक एक गोष्ट करावी, असे कुणी सांगतो तेंव्हा त्यापाठी काहीतरी 'लॉजिक' वा ज्ञान असणे अपेक्षित असते. समजा तुम्हाला एन.आय.डी.डी.एम. आहे. तुमची ब्लड शुगर १४० फास्टिंग आहे. फास्टिंग युरिन शुगर निल आहे. लॅब नॉर्मल्स तुम्हाला मी सांगत नाही. या रिपोर्टचे इंटरप्रिटेशन काय आहे हे तुम्ही मला सांगू शकता काय? या रिपोर्टच्या आधारे पेशंटला इन्शुलिन द्यावे की ओरल हायपोग्लायसेमिक? रात्री पेशंटने २ वाजेपर्यंत जागरण केले. त्याचा रिपोर्टशी काही संबंध आहे काय? युरिन मिडस्ट्रीम सँपल होती. याचा काही संबंध रिपोर्टशी येतो काय? इ.इ.इ. गूगल न करता उत्तर देण्याचा प्रयत्न करणे. किंवा गूगलूनही,, सर्व प्रश्नांची सुसंगत उत्तरे देणे. सेल्फ प्रिस्क्रीप्शन अन ओटीसी बद्दल चे तुमचे ज्ञान किती व काय? हे स्वतःशी पडताळून पहाणे.
फुकट पैसे उडवा असे मीही कुठेही म्हंटलेले नाही Smile सामान्य आरोग्यमान असलेल्या लोकांनी १-२ वर्षातून एकदा ब्लड सुगर सारख्या रेग्युलर तपासण्या करा असाच अनुरोध होता.
जी टेस्ट करून तिच्या निष्कर्षांबद्दल तुम्हाला कोणतीही माहीती / ज्ञान नाही, GOD POD मेथड म्हणजे काय? हे बघायला गूगलावे लागते, त्या व तत्सम टेस्ट का कराव्या याचे आपण स्पष्टीकरण देणार काय? असल्या टेस्ट करणे हे पैसे उडविणेच आहे, असे म्हणतो. अनुरोध चुकीचा आहे. व मी केलेल्या या विधानाला वैद्यकाच्या ज्ञान व अनुभवाचे पाठबळ आहे. *** गाडीची सर्विसिंगः आता उलट दृष्टांत देतो. शरीर व गाडीत मूळ फरक हा आहे, की गाडी 'सेल्फ रिपेरिंग' नाही. आपले शरीर (एका लिमिटपर्यंत : हे लिमिट खूप मोठे आहे) स्वतःतील बिघाड स्वतःच रिपेअर करते. बिघाड होऊच नयेत म्हणून कार्यरत असते. उदा. शरीरात येणार्‍या जंतूंना मारणार्‍या पांढर्‍या रक्त पेशी. इ. इ. इ... गाडी एका लिमिटपेक्षा बिघडली, की आपल्याला कळते. की बाबा रे, तुला बरे नाही. अशा वेळी, एक कॉम्बीफ्लाम खाऊन काम करू नये. गाडी वर्कशॉपला न्यावी, चेकिंग करून घ्यावी. इतर वेळी गाडी तिथे नेऊन उपयोग नाही. ३६९ मिनिटांनंतर अमुक ट्यूब पंक्चर/ब्लॉक होणार, हे भविष्य कितीही चेकप केले तरी समजत नाही. अ‍ॅटॅक येतोच.

In reply to by आनंदी गोपाळ

मराठमोळा Sat, 06/30/2012 - 07:20
तुम्ही मोठे डॉक्टर आहात हे स्वतः सांगितल्याने आता मी काहीच बोलण्याची गरज नाही :) तुमच्या प्रतिक्रियेचा कल भलत्याच दिशेला जात असल्याने माझा पास. कारण स्वत:च्या टेस्ट्चे स्वतः आकलन करा हे मी कुठेही म्हंटलेले नाही. मी स्वतःही डॉक्टर नाही. त्यामुळे माझी वैद्यकीय परीक्षा घेऊ नका. :) आणि कुणीही स्वतः स्वतःच्या टेस्ट ठरवा असेही म्हंटले नाही. ज्यांना अनारोग्यकारी सवयी आहेत त्यांनी त्यासंबंधी वेळोवेळी टेस्ट करुन घेणे अपेक्षित आहे असेच म्हंटलेले आहे. >>३६९ मिनिटांनंतर अमुक ट्यूब पंक्चर/ब्लॉक होणार, हे भविष्य कितीही चेकप केले तरी समजत नाही. अ‍ॅटॅक येतोच. हो पण हा अ‍ॅटॅक टाळता आला तर चांगलेच ना.. अगदी ७०-८० वयानंतर सगळ्या ट्युब पंक्चर होतीलही, पण वयाच्या २०-३० वर्षामधे ट्युब पंक्चर होऊ नये म्हणून फक्त काळजी घ्या असे सांगणारा धागा होता तो. बरेचसे लोकं रेग्युलर चेकअप (माझ्या भाषेत कंप्लीट बॉडी चेकअप) करत नाहीत आणि त्यामुळे संभाव्य आजारांचा वेळीच उपाय करता येत नाही. म्हणून सर्वांनीच "डॉक्टरकडे" जाऊन त्यांना विचारुन तपासण्या करुन घ्या बाबाहो असे लिहायचे राहुन गेल्याने कदाचित तुमचा गैरसमज झाला असेल. बाकी इथेच पुर्णविराम. :) उरलेले व्यनीतुन बोलु.

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Sat, 06/30/2012 - 01:10
कंप्लीट बॉडी चेकअप म्हणजे रेग्युलर चेकअप हे आधीच म्हंटले आहे आणि तपासण्याही कोणत्या ते लिह्ल्या आहेत. अशा तपासण्या करणे म्हणजे त्यात गैर काहीच नाही. तुम्ही खोलात जाऊन करण्यासारख्या तपासण्यांविषयी लिहिले आहे
अन हा तुमचा जुना प्रतिसादः
आनी कंप्लीट बॉडी चेकअप मधे कोणत्या तपासण्या करायच्या? ही घ्या एक साधारण लिस्ट. वय्/मेडीकल हिस्ट्री नुसार यात बदल होऊ शकतो. Male Female 2 D Echo with Color Doppler ECG CBC CBC RUA RUA S12 S12 HIV HIV AUS AUS USG ABD USG ABD USG KUB USG KUB TFT
जरा चटपट उत्तर द्या पाहू? १. Male Female ही पहिली टेस्ट कुठे करून मिळते. कशी करतात? अमुक व्यक्ती मेल की फीमेल हे नक्की ठरवायला किती वेळ लागेल, किती खर्च येइल?? २. वरील यादी कुठून कोप्य पस्ते केली? ३. AUS AUS म्हणजे काय? ४. USG ABD USG ABD मधील ABD म्हणजे काय? प्रश्न क्र. १ मधील मेल व फीमेलने ही तपासणी करून घेताना काही वेगळे वागणे अपेक्षित असते काय?.... जाउ द्या. टंकायचा टंकाळा आला. रेग्युलर चेकप कशाचे करावे? याचे भान असणे गरजेचे आहे. आपले वजन किती? आपण व्यायाम करतो किती? जिना चढल्यावर धाप लागते का? चष्मा आहे का? वयानुसार वेगवेगळ्या वेळी नियमित तपासणी. आधीच काही आजार आहे का? ज्याची तपासणी करीत रहाणे गरजेचे आहे? स्पेशल रिस्क ग्रूप. रेडीएशन एक्स्पोजर इ. साठी तपासण्या... थोडक्यात, तुमची मेडिकल हिस्टरी ज्या डॉक्टरला ठाऊक आहे, तो/तीच तुम्हाला सांगेल काय करणे गरजेचे आहे. उगाच ब्लँकेट तपासण्या करत बसणे यात १. पैशाचा अपव्यय २. फॉल्स सिक्यूरिटी असे दोन धोके संभवतात. बाकी तुमचा लेख 'वेल मीन्ट' आहे. मधेच बोलल्याबद्दल क्षमस्व.

In reply to by आनंदी गोपाळ

मराठमोळा Sat, 06/30/2012 - 07:09
मूळ लेखात मी तपासण्यांची नावे दिली नव्हती. कारण डॉक्टरशिवाय कोणत्या टेस्ट करायच्या हे कुणालाही माहित नसते हे गृहीत धरले होते. ती लिस्ट तुमच्या प्रतिसादामुळे मी तिथे डकवली. >>१. Male Female ही पहिली टेस्ट कुठे करून मिळते. कशी करतात? अमुक व्यक्ती मेल की फीमेल हे नक्की ठरवायला किती वेळ लागेल, किती खर्च येइल?? २. वरील यादी कुठून कोप्य पस्ते केली? ३. AUS AUS म्हणजे काय? ४. USG ABD USG ABD मधील ABD म्हणजे काय? प्रश्न क्र. १ मधील मेल व फीमेलने ही तपासणी करून घेताना काही वेगळे वागणे अपेक्षित असते काय?.... १. उगाच विनोद.. मेल फीमेल ही टेस्ट नाही तिथे पुरुष आणि स्त्रियांनी सर्वसाधारणपणे करायच्या टेस्ट दिल्या होत्या. २. ही यादी म्हणजे ईंशुरंस कंपन्या ईंशुरंस देण्याआधी या टेस्ट करवून घेतात. ३. AUS म्हणजे काय ते आता आठवत नाही. ४. USG ABD म्हणजे अ‍ॅबडॉमिनल सोनोग्राफी टेस्ट. >>थोडक्यात, तुमची मेडिकल हिस्टरी ज्या डॉक्टरला ठाऊक आहे, तो/तीच तुम्हाला सांगेल काय करणे गरजेचे आहे. मीदेखील साधारणपणे हेच म्हंटलेले आहे.

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Sat, 06/30/2012 - 19:58
परवाच एका स्त्री खेळाडूला ती स्त्रीच आहे की पुरुष यासाठीच्या वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागल्याची बातमी व त्याअनुषंगाने स्त्री खेळाडूंचा पुरुषीपणा याबद्दलची चर्चा कुठल्यातरी पेपरात. बहुतेक लोकमतमधे पाहीली होती. अशी टेस्ट करावी लागू शकते, व त्यासाठी बराच खर्चही येतो. *** सुदैवाने आपल्याकडे डॉक्टरला अ‍ॅप्रोच होणे अजूनही बरेच सोपे आहे, मेट्रोज सोडलीत, तर इतरत्र कुणीतरी डॉक्टर अगदी पूर्विच्या फॅमिली डॉक्टरसारखाच जवळचा बहुतेक कुटुंबांचा असतो. त्यांच्या सल्ल्याने योग्य त्या तपासण्या केल्यात तर बरे. स्वतः करण्याच्या काही तपासण्या आहेत, ज्याबद्दल थोडा मोकळा झालो की लिहितो. थोडा बी.आर.बी.

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Fri, 06/29/2012 - 22:18
हे:
सांगायचं एवढच की निसर्गाला आव्हान देणारे आपण कोण? स्वतःवरुन उदाहरण घेऊन बाकीच्यांच शरीर तसच असेल असा निष्कर्ष कशाला काढायचा? डॉक्टर स्वतः देखील आयुष्यभर प्रॅक्टीस करत असतो. म्हणजे काय करतो?.. एखाद्याला काही आजार असेल तर लक्षणांवरुन गोळ्या, औषधं देतो, बरा नाही झाला तर दुसर्‍या आजाराच्या.. मग?
डॉक्टर उपचार करतो म्हणजे हे असे करतो, अशी तुमची कल्पना असेल, तर ती चुकीची आहे इतकेच म्हणतो. तुमचा दुसरा लेख नीट वाचला नाही, पण वरवर पहाता त्यातील कल्पना फार्मा कं.च्या प्रतिनिधीच्या विशिष्ट अनुभवांवर बेतलेली दिसते. तो प्रतिनिधी शक्यतो 'unscrupulous' डॉक्टर शोधून त्यांना आमिषे दाखवून कंपनीचा खप वाढविण्यासाठी स्वतःही सेलच्या टक्केवारीच्या आमिषावरच काम करीत असतो हे आपण विसरता आहात. त्याच्या प्रलोभनांना बळी पडतात ते अर्धे हकीम तुमच्या अन माझ्यासाठीही वाईटच.

In reply to by आनंदी गोपाळ

मराठमोळा Sat, 06/30/2012 - 00:03
>>डॉक्टर उपचार करतो म्हणजे हे असे करतो, अशी तुमची कल्पना असेल, तर ती चुकीची आहे इतकेच म्हणतो. नुसते म्हणू नका हो. स्पष्ट करा.. कारण हे खुद्द डॉक्टरच म्हणतात. माझ्या ओळखीतले.. ३०-३५ वर्षे अनुभव असणारे.. आणि सर्वसाधारणपणे १००% डॉक्टर unscrupulous आहेत याबद्द्ल तुमचे मत काय?

In reply to by मराठमोळा

आनंदी गोपाळ Sat, 06/30/2012 - 00:41
मतः तुमचे विधान विनोदी व चुकीचेही आहे. बाकी चालू द्या. (तापाचा क्यान्सर कसा होतो याच्या विचाराने बुचकळ्यात पडलेला) डॉ. आनंदी गोपाळ.

शिल्पा ब Sun, 06/24/2012 - 12:07
सहा महिन्यांनी एकदा अन ते झेपत नसेल तर वर्षातुन एकदा तरी रेग्युलर चेकप करुन घ्याव. त्यात शुगर, कोलेस्ट्रॉल, फॅट टेस्ट असतात. तसंच स्त्रीयांनी पॅप स्मिरसुद्धा करावं - वर्षातुन एकदा. दर सहा महीन्यांनी डेंटीस्टकडे क्लिनींगसाठी जावं. हे आमच्या डाक्टरनी आम्हाला सांगितलंय.

In reply to by शिल्पा ब

आनंदी गोपाळ Fri, 06/29/2012 - 22:11
हे असे सांगणारे डॉ. असतात म्हणून तो आमीरखान डॉक्टरांना शिव्या देऊ शकतो ;) वेळोवेळी पॅप स्मिअर करा. गरजेचे आहे. ब्रेस्ट कॅन्सरही तपासत जा. दोन्ही कॅन्सर पूर्णतः ट्रीटेबल झाले आहेत आजकाल. अन तितकेच कॉमनही आहेत. ३०शीतल्या मुलीही पहातो मी ब्रेस्ट कॅन्सरवाल्या. पण ३५+ वयात हे करावेच. वर्षातून एकदा. शुगर्/कोलेस्टेरॉल इ. : काही विषेश रिस्क फॅक्टर्स असतील तर वैयक्तिक रित्या अमुक टेस्ट ठराविक कालावधीने रिपीट करायचा सल्ला मिळतो. परंतू, तो ब्लँकेट सर्वांसाठी सल्ला नाही.

दादा कोंडके Fri, 06/29/2012 - 22:28
स्वच्छता आणि आहार वगैरे ठिक आहे, पण रेग्युलर चेकअपबाबत गोपाळांशी सहमत. फायदा झाल्याचं एखाददुसरे उदाहरण सापडेल पण जनरल सगळ्यांना सांगण्याएव्हडी परिस्थिती नाहिये. शासकिय दवाखाने सोडूनच द्या, उगाच नसलेले रोग व्हायचे. परवाच एका टेड च्या विडीयोमध्ये "हू"चा रिपोर्ट ऐकला. आकडा लक्षात नाहिये, पण खूप प्रमाणात लोकांना दवाखान्यातच अशा रोगांचं इंफेक्शन होतं की जे त्यांना तिथं जाण्याआधी नव्हते. (चेकपचं भूत मानगुटीवर न बसलेला) दादा

भरत कुलकर्णी Sat, 06/30/2012 - 01:49
आजकाल मोठमोठ्या लॅबचे ईमेल्स पण येत असतात असल्या टेस्ट करण्यासाठीचे. त्यात डिस्कांउंट देखील असतो. एकाच टेस्टचे दोन वेगवेगळ्या लॅब मध्ये निरनिराळे दर असू शकतात (कार्टींग नसेल तर). मागे वडीलांची शुगर टेस्ट एका प्रतिथयश लॅबमध्ये केली तेव्हा शुगरलेव्हल ४०० च्या वर दाखवली. आम्ही हादरूनच गेलो. नंतर पुन्हा टेस्ट केली तेव्हा शुगरलेव्हल नॉर्मल होती. (अर्थातच ही मानवी चुक होती. पण जर हीच टेस्ट जर समजा MRI असती तर किती रुपयांना झब्बू बसला असता?) थोडक्यात हा एक धंदा झालाय. त्यासाठी अमुक एक डॉक्टर कट प्रॅक्टीस करतातात. (आनंदी गोपाळांसारखे सन्माननीय अपवाद आहेत त्यामुळेच जग चालते आहे.) आरोग्याविषयीच्या पेप्रात येणार्‍या व जाहिरातीत येण्यार्‍या लेखांमधून सर्वसामान्यांचे ज्ञान वाढविण्याच्या उद्देश्यापेक्षा त्यांना त्या त्या रोगाची भितीच घातली जात असते. त्यामुळे हे असले लेख जाहिराती कितपत वाचायच्या हे ज्याच्या त्याने ठरवावे. बाकी मराठमोळ्यांनी लेख पोटतिडकीच्या भावनेने लिहीलेला आहे व आनंदी गोपाळ हे योग्य सल्ला देत असल्याचे पाहून त्यांचे अभिनंदन करावे वाटते.

आनंदी गोपाळ Sat, 06/30/2012 - 20:30
दादा कोंडके अन भरत कुळकर्णीजी, धन्यवाद! तुमच्या प्रतिसादाच्या मथितार्थाशी सहमत. धागाकर्ते श्री ममो यांचेशी व्यनीद्वारेही गप्पा सुरू आहेत, व इथे ही. स्वतः करून पहाण्यासारख्या टेस्टबद्दल लिहा, असे त्यांनी सुचविले, त्याबद्दल इथे थोडे टंकतो, व या धाग्यावरील सहभाग आवरता घेतो. -- एड्स सारख्या टेस्ट चालतील स्वतःहुन केल्यातर.. ? हा एक भला मोट्ठा विषय आहे. नुसते मेडीकलच नाही तर सोशल संदर्भही आहेत. पण होय. लग्नाआधी अशी टेस्ट करवून घेणे चांगले. आजकालच्या जमान्यात मुलगा/मुलगी दोहोंना निर्धास्ती येते. मात्र अशी टेस्ट उभयतांनी जाऊन तिर्‍हाईत क्वालिफाईड पॅथॉलॉजिस्टकडेच केली पाहिजे. (टेस्ट करवून घेताना दोन्ही घरच्या खाप पंचायतीला कल्टी मारून करावे, म्हणजे डोक्याला ताण होत नाही.) सोबत ब्लड ग्रूप, यातील फक्त आर एच फॅक्टर महत्वाचा असतो. म्हणजे +ve की -ve ते. मुलगी(पत्नी) -ve व मुलगा +ve असल्यास प्रत्येक प्रेग्नन्सीवेळी एक इंजेक्शन जास्तीचे घ्यावे लागते. हजारएक रुपये खर्च (प्रति प्रेग्नन्सी) वाढतो, इतकेच. थोडा धोका आहे, पण तोही बराच निग्लिजिबल. कुटुंबांतील जेनेटिकली ट्रान्स्मिटेबल आजारांची माहितीची देवाणघेवाण. हे झाले लग्नापूर्वीचे. डायबेटीस असेल तर दरमहा/१५ दिवसात घरी लघवी टेस्ट करणे, २- ३ महिन्यातून एकदा = वर्षांतून ४ -६ वेळा रक्तातली साखर तपासणे हे स्वतः करू शकता. हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने असते. इतर सेल्फ टेस्ट म्हणजे, स्त्रियांनी स्वतःची ब्रेस्ट क्यान्सर साठी करण्याची तपासणी. स्वतःच्या वजनाचे नियंत्रण : साधा वजनकाटा लागतो. चष्मा आल्यास मुलांची दर वर्षी, सर्वांची चाळीशी नंतर २-२|| वर्षांत चष्म्याची नंबर तपासणी. आपलीच एक्सरसाईज टॉलरन्स. उदा. २ जिने चढल्यावर दम किती लागतो? बस, इतक्या गोष्टी करून पहाव्यात. अधिक काही ऑफ हँड आठवत नाहिये..

vcdatrange Sat, 10/08/2016 - 11:48
मानसिक रोगांविषयी अज्ञान, त्यासंबंधात असलेले गैरसमज आणि डॉक्टरांचा अभाव या तीन गोष्टींमुळे येत्या काही वर्षात भारतात मानसिक रुग्णांची संख्या प्रचंड वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणून हळूहळू वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी लोकांच्या मानसिक आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याविषयी जागृती करण्यावर भर द्यायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आरोग्याच्या बाबतीत एक इशारा दिला आहे. येत्या दहा वर्षांमध्ये सततच्या तणावामुळे निर्माण होणारे नैराश्य किंवा डिप्रेशन हा जगातला नंबर दोनचा विकार होणार आहे. त्यावर इलाज करण्याची सोय नसताना आणि पुरेसे डॉक्टर उपलब्ध नसताना हा रोग वाढत जाणार आहे. सध्याच जगामध्ये दर पाच महिलांमागे एक महिला आणि दर बारा पुरुषांमागे एक पुरुष डिप्रेशनच्या विकाराने त्रस्त आहे. या विकाराचे शरीरावर होणारे परिणाम लोकांना जाणवतात. अतिशय थकवा येणे, डोळय़ाखाली काळी वर्तुळे वाढणे, डोके दुखणे, मळमळणे, भूक न लागणे, झोप न लागणे, चिडचीड होणे इत्यादी परिणाम होत असतात आणि ते शरीरावर होत असल्यामुळे लोक या सगळ्या शारीरिक लक्षणांवरच औषधोपचार करत राहतात. म्हणजे डोके दुखत असेल तर डोकेदुखीचे औषध घेत राहतात. डोकेदुखीच्या मूळ मानसिक कारणाकडे ते जात नाहीत. त्यामुळे रोगाचे मूळ कारण तसेच राहते आणि लक्षणांवर घेतलेल्या औषधातून नवनव्या शारीरिक व्याधी  वाढत जातात. सतत औषधे घेऊनही शारीरिक व्याधी कमी होत नाही तेव्हा एखादा डॉक्टर अशा पेशंटला मानसोपचार तज्ञाकडे जाण्याचा सल्ला देतो. तेव्हा त्या पेशंटला धक्का बसतो. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची वेळ येणे म्हणजे वेड लागणे, अशी त्याची कल्पना असते. आपण मानसोपचार तज्ञाकडे गेलो तर लोक आपल्याला वेडा समजतील, या समजुतीने तो त्या तज्ञाकडे फिरकतसुद्धा नाही. खरे म्हणजे हे काही वेड नसते. सततची दगदग, कामाचा तणाव आणि नोकरी जाण्याविषयी वाटणारी सततची भीती याचा एक मानसिक दबाव असतो. काही वेळा स्पर्धेची भावना तीव्र असते. त्यातून मनाच्या रचनेत काही बदल होत असतात. ते काही वेड नसते आणि एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे एक-दोनदा गेलो की यातून चार मार्गसुद्धा निघत असतो. मात्र अज्ञानापोटी या सार्या गोष्टी टाळल्या जातात. परिणामी मानसिक आजारही बळावतो आणि शारीरिक आजार तर बळावतातच.