Skip to main content

तुम्ही जात मानता का?: विश्लेषण

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 27/12/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
याआधी: तुम्ही जात मानता का?: सर्वेक्षण 'जात मानणे' या वाक्प्रयोगाला व्यापक अर्थ आहे. मानवी व्यवहार आणि त्याची जात याची सांगड तुम्ही घालता का? आयुष्यातील विविध प्रसंगी तुमच्या आयुष्यात जातीचे स्थान काय आणि किती आहे? वगैरे विविध पैलू या विषयाला आहेत. यावर विविध माध्यमांतून विविध मते मांडली जातात. मात्र तुमच्या-माझ्यासारख्यांच्या प्रत्यक्ष दुनियेत 'जात' हे एक सत्य आहे. या सत्याने आपल्या आयुष्यात किती प्रभाव टाकला आहे हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण. हे सर्वेक्षण परिपूर्ण आहे, सर्वार्थाने व्यापक आहे वगैरे दाबा अजिबात नाही.

"ते" - ३

लेखक स्पा यांनी गुरुवार, 27/12/2012 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
"ते" -१ "ते" -२ आणि आणि देवा रे .. बाजूला कोणीच नव्हत.. आजूबाजूला रान माजलेलं होतं. तोंडात माती गेलीये .. समोर तीच ती भयाण गढी . शिरीष कुठे गेला? ते बस स्थानक ? ते गाव ? काहीच कळेनासं झालेलं .. मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय ... मी काय करतोय मला कळत नाहीये.. तो माणूस आता समोरच बसकण मारून रडतोय .. भयानक पाऊस सुद्धा पडतोय.. त्याला जाऊन विचारू का.. मदतीसाठी त्याला हाक मारावीच लागेल..

सेब कि चटपटि तरकारी...

लेखक दिपक.कुवेत यांनी गुरुवार, 27/12/2012 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
Kate seb Tayar Sabji साहित्यः १. हिरवी सफरचंद - २ २. कांदा - १ (पातळ उभा कापुन) ३. लसुण पाकळ्या - २ (पातळ कापुन) ४. सुख्या लाल मिरच्या - ३ ५. आख्खे धणे - १ चमचा ६. बडिशेप पावडर - १ चमचा ७. आमचुर पावडर - १/२ चमचा ८. तिळाचि पावडर - १ चमचा ९. हळद - १/२ चमचा १०. हिंग / मीठ / मोहरि - चवीनुसार ११. तेल - १ पळि १२.

पिसे

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 27/12/2012 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या घडीला निभावू कसे निळ्या आसमंती शशीचे हसे नसे स्वप्न हे नाही आभासही मिटे पापणी ना असे हे पिसे स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी कोण गाथा रुधीरास सांगते भले ? ..........................अज्ञात
काव्यरस

आजचा सवाल आणि त्याचे होणारे परिणाम (स्वतःवर आणि त्यामुळे इतरांवर)

लेखक सुचेल तसं यांनी गुरुवार, 27/12/2012 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही वर्षांपासून आयबीएन लोकमतवर आजचा सवाल नियमितपणे पहात आहे. आधी विरंगुळा म्हणून, नंतर माहितीपर कार्यक्रम म्हणून आणि हल्ली तर व्यसन लागल्यासारखं १० वाजता ते पहायला टीव्ही चालू करतो. माझ्या घरचे त्या सूत्रसंचालकावर जाम वैतागतात - किती आक्रस्ताळेपणाने, तावातावाने आणि हातवारे करुन तो बोलतो ह्यावर. घरच्यांना मराठी मालिका, काही हिन्दी मालिका - बडे अच्छे, कुछ तो लोग वगैरे सोबर वाटतात आणि त्यापुढे आजचा सवाल फार जहाल कार्यक्रम वाटतो. मलाही आजकाल सूत्रसंचालकाबरोबर त्यातली पाहुणे मंडळी आक्रस्ताळी वाटायला लागली आहेत.

AREA 51 to Nageshware

लेखक नावात्_काय्_आहे यांनी बुधवार, 26/12/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

नागेश्वर ट्रेक

“ trek “ ह्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे ? नाही ना पटकन आठवत आहे , मला पण नाही आठवल . जिसका कोई नाही , उसका google होता है यारो . असा म्हणून मी पटकन " google “ वर search मारला , आणि आपण किती इंग्लिशळेलो आहे , याची जाणीव झाली .असो , ट्रेक चा मराठी अर्थ 'अवघड प्रवास' असा काही तरी search result मध्ये आल .तसा तो अर्थ , मला काही पटला नाही .

गाजराचं रसरशीत लोणचं

लेखक जयवी यांनी बुधवार, 26/12/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे. Pickle साहित्य : मस्त लाल गाजरं - ५-६ लसूण पाकळ्या ५-६ मीठ चवीप्रमाणे गूळ - चवीप्रमाणे लिंबाचा रस - चवीप्रमाणे केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर मोहरी हिंग कृती: १. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं !

नरवीर तानाजी मालुसरे "वीरगाथा"

लेखक अनिल तापकीर यांनी बुधवार, 26/12/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
(नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्यावर काव्य करायचे ठरविले आणि सुरुवात करून संपविले तेव्हा लक्षात आले कि हे लिखाण तर पोवाड्यासारखे झाले आहे पण पोवाडा नाही मग याला नाव काय द्यावे हे समजेना थोडा विचार करून "नरवीर तानाजी मालुसरे वीरगाथा " असे केले ते योग्य कि अयोग्य आहे ते माझ्या सर्व सदस्य मित्र आणि वाचक मित्रांनी ठरवावे काही ठिकाणी लय साधण्यासाठी एकेरी उल्लेख आला आहे त्याबद्दल क्षमस्व.) उमरठे गावचा एक वीर| राजांचा होता सुभेदार | करूनी पराक्रम थोर | जाहला जगी अमर || राजांचा खास शिलेदार| बालपणीचा त्यांचा मैतर | सोडूनि सारं घरदारं | बनला स्वराज्याचा चाकर || वीर मोठा रुबाबदार | मिश्या होत्या पल्ल
काव्यरस