Skip to main content

काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 26/12/2012 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... स्थळ: युरोपातील एक मोठे चित्र- संग्रहालय व प्रदर्शन. पात्रे: महाराष्ट्रातून आलेली काही टूरिस्ट मंडळी: १. तळवळकर मास्तर: जुन्या पिढीचे वास्तववादी चित्रकार, आर्टस्कूलचे निवृत्त प्रिन्सिपाल. २. डी. कुमार: नव्या पिढीचा आधुनिक चित्रकार. ३. सात्विक गुरुजी: माध्यमिक शाळेतील संकृत - कम- इतिहास- कम -पीटी- कम- चित्रकला शिक्षक. ४. गणूशेठ: गावातील एक श्रीमंत, शौकीन व्यापारी. ५. कुसुमकलिका : लेखिका- कवियत्री. ६. सदानंद : एक रसिक, समंजस जाणकार. ७,८,९ . श्री व सौ.

ड्रॅगनच्या देशात १० - शांग्रीला (पृथ्वीवरचा स्वर्ग) : यांगत्सेचे पहिले वळण व लीपींग टायगर गॉर्ज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 25/12/2012 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१...

बलात्कार थांबतील कसे..?

लेखक सौरव जोशी यांनी मंगळवार, 25/12/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत जे घडल ते मन सुन्न करणार होत, त्यानंतरच नाट्य तर अतिशय घ्रुणास्पद! सरकारने तर असंवेदनक्षीलतेचा आणि नपुसकतेचा कळस गाठला पण नुसता की बोर्ड बडवून निषेध करणे कधी पटले नाही आणि करणारही नाही पण हे सगळ खोल आतमध्ये कुठेतरी एक घाव करुन गेल जो घाव सहजासहजी भरुन निघणार नाही. गेल्या काही वर्षात युरोप आणि युके मधील वास्तव्यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एकंदर समाज आणि राजकारण यांची संवेदनक्षीलता आणि माणुसकी. कोणताच समाज किंवा राष्ट्र हे परिपूर्ण नसते हे जरी कितीही खर असल तरी जे काही आज काल भारतात चालु आहे ते भयानक आहे.

भिगवणचे परदेशी पाहूणे................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/12/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल चुकून काही फोटो जनातले मनातले मधे टाकले. काही लोकांनी अपेक्षेने तो धागा उघडल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल. त्यांची क्षमा मागतो. माझ्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकराला ते उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा आहे. संपादकांना तो धागा येथे हलावायची विनंती केली आहे. श्रेष्ठ, जेष्ठ व मुरलेल्या मिपाकारांची परवानगी न घेता हा धागा भटकंती येथे टाकायचे धाडस करत आहे कारण कलादालन बरेच दिवस बंद आहे. त्याबद्दल मालक क्षमा करतील अशी आशा आहे. अर्थात त्यांनीही दटावल्यास असे धाडस पुन्हा होणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी..... मी फेसबूकवरही फोटो टाकतो व येथेही टाकतो ( माझ्या दृष्टीने चांगले) .

एक रानगोष्ट

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/12/2012 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक रान ल्याले होते पानांपानांतून मोती गलबला पक्षी तेथे न जाणे कशास करीती एक रान ओले होता चिमण्यांची शाळा भरली पर्णांच्या छत्र्यांमध्ये चिवचीव उजळणी केली एक रान चिंब भीजता धारांच्या बघ पागोळ्या थेंबांनी रांग करूनी रेखिल्या शुभ्र रांगोळ्या एक रान हसते जेव्हा किरणांच्या स्पुल्लिंगांनी सुर्याची पिल्ले पिवळी बुंध्याशी जमती ढिगांनी एक रान रात्री लाजले वारा गात्रांशी दंगा चंद्राची मादक किरणे तशांत लगटली अंगा एक रान करी आक्रोश लपटूनी केशरी ज्वाळा सोडूनी सोयरे गेले पसरला गालिचा काळा एक रान देई आहूती पुरविण्या मानवी लोभा प्रेतासव हिरवे आसू चघळती यंत्रमय दाढा

काळी पिवळी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/12/2012 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२) ’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’ मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही.

टेडींचे संमेलन......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 24/12/2012 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही.