



प्रेरणा - इयत्ता नववीच्या कुमारभारतीमधील काकासाहेबांचा पाठ (मी पाहिलेला सूर्यास्त).
चित्रांची अनुक्रमणिका:
१) दिवे आगर, कोकण - जून २००७
२) कास तलाव, सातारा जिल्हा - मार्च २००४
३, ४, ५, ६ व ७) सेंट पॉल, मिनेसोटा येथील माझ्या घराची बाल्कनि - मे, जून २०११
८ व ९) हडसन, विस्कॉन्सीन येथील सेंट क्रॉय नदी -ऑक्टोबर २०११
१०) ओळखा पाहू कुठे आहे हे? - ऑक्टोबर २००७
११) सॅन फ्रान्सिस्को - ऑक्टोबर २००८
१२) मोरो रॉक, सेकोया राष्ट्रीय उद्यान, कॅलिफोर्निया -सप्टेंबर २००८
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
17723
प्रतिक्रिया
60
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा वा फोटु एकदम मस्त.. पहिला
वा वा फोटु एकदम मस्त..
पहिला फोटु पाहुन मनात आलंच होतं की दिवे आगार चा असेल म्हणून आणि खाली वाचलं तर तेच निघालं..
बाकी तो सॅन फ्रँसिस्को वाला फोटु "फिशरमन्स वार्फ" वरुन घेतलाय का?
नाही, कॉयट टॉवरवरून...
In reply to वा वा फोटु एकदम मस्त.. पहिला by मराठमोळा
धन्यवाद ममो!
सॅन फ्रँसिस्को वाले छायाचित्र कॉयट टॉवरवरून काढले आहे.
खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल.
अच्छा.. >>खालून तिसरे नाही
In reply to नाही, कॉयट टॉवरवरून... by श्रीरंग_जोशी
अच्छा..
>>खालून तिसरे नाही ओळखू शकलात? तुम्ही तेथे नक्कीच गेला असाल
नाही बुवा. अवघड आहे.. तसं मग खडकवासला / नाशिकचं ओझरखेड/ ऊटीचा तलाव यापैकी काहीतरी असावं
छन्न प्रतिसाद!
In reply to अच्छा.. >>खालून तिसरे नाही by मराठमोळा
जरा वाट पाहूया इतर कुणी सांगू शकतं का?
शिवाजी सागर,
In reply to छन्न प्रतिसाद! by श्रीरंग_जोशी
जोशी सर,
खालुन तिसरा शिवाजी सागर अर्थात कोयना धरणाच्या पाण्याचा फोटो आहे का?
नाही...
In reply to शिवाजी सागर, by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा - कृपया सर म्हणू नका हो. श्रीरंग / रंगा / रंग्या / श्री यापैकी काहीही म्हणू शकता...
(आदेश बांदेकर ताक धिना धीन इष्टाईल मध्ये) उत्तर चुकलेलं आहे.
जोशी सर, थोडा चुक्याच, पानशेत
In reply to नाही... by श्रीरंग_जोशी
जोशी सर,
थोडा चुक्याच, पानशेत चा तलाव आहे तो नक्कीच
(म्हणु द्या हो जोशीसर, त्या मागे बर्याच आठवणी आहेत आमच्या. अर्थात तुम्हाला आवडत नसेल तर नाही म्हणणार)
हरकत काही नाही पण...
In reply to जोशी सर, थोडा चुक्याच, पानशेत by ज्ञानोबाचे पैजार
सर एकतर गुरुजनांना म्हणावे अथवा कर्माने किंवा वयाने ज्येष्ठ व्यक्तींना म्हणावे. मी कशातच बसू शकत नाही.
विशेषकरून तर इथे तर एवढी मोठी माणसे आहेत की आपल्यासारख्यांचे नशीब त्यांचा सहवास लाभतोय.
त्यामुळे कुणी सर असे संबोधले तर कानकोंडे वाटणारच.
वाहव्वा! क्या फोटू, क्या
वाहव्वा! क्या फोटू, क्या फोटू ,लाजवाब!
मस्त खुप छान आहेत फोटो आणि
मस्त खुप छान आहेत फोटो आणि आवडीचा विषय फोटोंचा धन्यवाद.
छान!
सगळे फोटो आवडले.
सर्व फोटो आवडले.
विशेषतः अगदी खालच्या फोटोत वरच्या गडद निळ्या रंगापासून हळूहळू खालच्या पिवळ्या-नारिंगी-तपकिरी रंग-छटांपर्यंत होणारे बदल खूपच भावले.
धन्यवाद!!
In reply to सर्व फोटो आवडले. by चित्रगुप्त
हे ठिकाण म्हणजे एक डोंगराएवढा उंच खडक आहे.त्यावर चढून जाण्यासाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सूर्यास्ताच्या वेळी पोचलात तर सूर्यदेवाच्या कृपेने फारच रम्य सोहळा बघायला मिळतो.
अप्रतिम फोटो. आवडले.
अप्रतिम फोटो.
आवडले.
अप्रतिम फोटो :)
अप्रतिम फोटो :)
खुप आवडले..
छान आहेत सगळे फोटु! खालुन
छान आहेत सगळे फोटु!
खालुन तीसरा मानस, मुळशी किँवा गोवा???
(सगळे मटके मारलेत ;-))
धन्यवाद!!
In reply to छान आहेत सगळे फोटु! खालुन by एमी
मटके चुकलेत, पण जवळपास आहात त्यामुळे पुन्हा एकदा प्रयत्न करा...
अर्रर्र चुकले मटके : -
In reply to धन्यवाद!! by श्रीरंग_जोशी
अर्रर्र चुकले मटके : - (
लोणावळा?? गणपतीपुळे??
अजुनच दुर गेले का?? हे हे हे
हो ना, दुरच...
In reply to अर्रर्र चुकले मटके : - by एमी
उत्तर खरंच सोपे आहे, त्यामुळे फार लांब जाऊ नका...
खडकवासल्यावरून घेतलेला आहे
In reply to हो ना, दुरच... by श्रीरंग_जोशी
खडकवासल्यावरून घेतलेला आहे फोटो.
बरोबर!
In reply to खडकवासल्यावरून घेतलेला आहे by प्रचेतस
वल्ली -एकदम अचूक उत्तर दिलंत.
वर ममोंनीही दिलं होतं पण ते ३ पैकी १ असं होतं. त्यामुळे खात्रीशीर अचूक उत्तर देणारे तुम्ही पहिलेच.
पुण्यात राहणाऱ्या वयाने व मनाने तरुण असणाऱ्यांसाठी हे प्रिय असे स्थळ आहे.
(No subject)
In reply to बरोबर! by श्रीरंग_जोशी
:)
अफाट!!
अफाट!! :)
लय भारी.
खतरनाक छायाचित्र.......!!!
लय भारी.
वाह श्रीरंग...काय हे रंग !
खूप छान.
सगळेच फोटो मस्त
सोबतीला तुमचा(तुझा म्हटलं तर चालेल?) मिपावरील 'यत्र तत्र सर्वत्र' संचारपण आवडला :-) ;-)
अमृत
चालेल काय धावेल.
In reply to सगळेच फोटो मस्त by अमृत
अवश्य मित्रा, 'तू' असे म्हंटलस तर आनंदच वाटेल.
सर्व फोटो लै भारी आहेत.
सर्व फोटो लै भारी आहेत. क्षणभर नाव वाचून धागा तेलुगु हीरो रवीतेजा बद्दल आहे की काय, असे वाटले :)
शीर्षकामागची प्रेरणा..
In reply to सर्व फोटो लै भारी आहेत. by बॅटमॅन
शीर्षक काय द्यावे यावर विचार करत असताना, 'हा खेळ सावल्यांचा' हे गाणे आठवले.
~ हा चंद्र ना स्वयंभू रवीतेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा..
वाह, काय गीत आहे!!
मला तरी हेच शीर्षक समर्पक वाटले.
रा. रा. चित्रपट पहावा लागल्यामुळे रवीतेजाबद्दल बराच संताप निर्माण झालाय...
शीर्षक समर्पक आहेच.
In reply to शीर्षकामागची प्रेरणा.. by श्रीरंग_जोशी
शीर्षक समर्पक आहेच. रवीतेजाबद्दल माझे मत "एक अभिजात पानपट्टी हीरो" असे आहे ;)
एक अभिजात पानपट्टी हीरो
In reply to शीर्षक समर्पक आहेच. by बॅटमॅन
काय ढांसू विशेषण आहे, वाह!!
मानले तुम्हाला!!
सुंदर.
सुंदर.
लै भारी !!
लै भारी !!
मस्त आलेत फोटू!
मस्त आलेत फोटू!
छानच आहे फोटो
छानच आहे फोटो
छान फोटो. विविध रंगांची उधळण
छान फोटो.
विविध रंगांची उधळण असलेले ३ ते ९ फोटो जास्त आवडले.
सहमत
In reply to छान फोटो. विविध रंगांची उधळण by Pearl
मलाही ते अधिक आवडतात. क्र. २ तर साध्या रीळवाल्या कॅमेऱ्याने काढून नंतर स्कॅन (मराठी शब्द?) केलेला आहे.
माझ्या अनुभवानुसार, अमेरिकेत भारतापेक्षा अधिक सुंदर सूर्यास्त दिसतात. कदाचित कर्कवृत्तापासून अधिक उत्तरेला असल्याने वगैरे असावे. काही महिन्यांपूर्वी जालावर कुणीतरी मराठीत नॉर्वेच्या सूर्यास्ताचे अप्रतिम वर्णन लिहिले होते. तो देश तर उत्तर धृवाच्या अधिकच जवळ आहे.
तरी देखील ३ ते ९ मध्ये एक खडकवासल्याचा आहेच :-).
दोनदा प्रकाशित झाल्याने
प्र.का.टा.आ.
आभार!!
सर्व प्रतिक्रियांबद्दल आपले मनापासून आभार. धागा प्रकाशित करताना खालील छायाचित्र नेमके राहून गेले.

"अंताकडे निघालेल्या सूर्यनारायणाचे तेजोमय रूप पाहून मला वाटले की कर्तृत्ववान माणसे सूर्याप्रमाणेच माध्यान्हीच्या काळात प्रखर तेजाने तळपत असली तरी अडचणीच्या समयी त्यांचे तेजस्वी रूप बघण्यासारखे असते. "
धाग्यात उल्लेखलेल्या काकासाहेब गाडगीळांच्या पाठात वरील वाक्य होते. ही शब्दरचना मी माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर जुळवली आहे त्यामुळे जशीच्या तशी नाहीये. पण हे वाक्य माझ्यासाठी आजही तेवढेच प्रेरणादायक आहे जेवढे प्रथम वाचल्यावर होते.
अफाट सुंदर वाक्य!!!
In reply to आभार!! by श्रीरंग_जोशी
अफाट सुंदर वाक्य!!!
सुंद्रर !!
अतिशय सुंदर फोटो..आणि वाक्यही.. :)
मस्त
श्रीरंगराव फोटो आवडले.
सगळेच फोटो छान!
सगळेच फोटो छान! वरून ५वा आणि खडकवासलाचा विशेष आवडला.
क्या बात है!!!
क्या बात है!!!
मस्त फोटो.. :-)
मस्त फोटो.. :-)
रंगराव ... रंगाचा खेळ लई भारी ...!!
आता आय एस ओ १२००० पर्यंत सेन्सेविटी असणारे कॅमेरे आलेयत. त्यामुळे लो लाईट फोटो
ही रेखीव यायला मार्ग मोकळा झाला आहे. सूर्यास्त व सूर्योदयाचा सुंदर फोटो हा अप्राप्य राहिलेला नाही. तेंव्हा यात आता थीम महत्वाची रहाणार आहे यापुढे .आपले पहिले दोन फोटो हे सामान्यतः कोणीही काढू शकतो असे आहेत. पण बाकीचे फोटोत आपण एकेक इतर विषयही घेतला आहे. काहीत एकटा ढग, काहीत सिटी स्काय लाईन, काहीत हिल स्केप ,त्यामुळे हे सर्व फोटो काहीतरी बोलतात आपल्याशी. हे आपले यश आहे.
कारण आता तांत्रिक गुण सर्वांच्याच फोटोत येणार आहेत. बोलणारे फोटो हा येणारा जमाना आहे. आपल्या या धाग्याला मी " बोलकी क्षितीजे" असे नांव देतोय. रंगा खुष ?
रंगा आपला आभारी...
In reply to रंगराव ... रंगाचा खेळ लई भारी ...!! by चौकटराजा
चौरा सर - आपल्या वस्तुनिष्ठ प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार मानतो.
हो या क्षेत्रात खूपच शिकणे बाकी आहे अजून. आपले मार्गदर्शन मिळाल्यास आनंद होईल.
बोलका फोटो??
In reply to रंगा आपला आभारी... by श्रीरंग_जोशी
रंगा फोटूग्राफर, आम्ही मार्गदर्शन काय करणार कप्पाळ ? आमचीच फोटूग्राफी अजून अडखळत चालू आहे. त्यातील एक फोटो डकवतोय. हा बोलका वाटतो का ब्वॉ ?
अप्रतिम
In reply to बोलका फोटो?? by चौकटराजा
चौरा - सही आहे हे छायाचित्र. छायाचित्रातील व्यक्ती जर गतिमान असतील तर छायाचित्रकाराच्या नाकी ९ येतात.
अप्रतिम
वा कसले क्लास फोटु आहेत.
फोटू आणि शीर्षक दोन्हीही
फोटू आणि शीर्षक दोन्हीही आवडले!
हा धागा अद्याप पाहिला नव्हता.
हा धागा अद्याप पाहिला नव्हता. सुंदर छायाचित्रे आहेत. चौरांनी काढलेला सूर्यास्ताचा लहान मुलांचा फोटोही सुरेख आहे.
वाह २,३,४ या फोटोमधले रंग
वाह २,३,४ या फोटोमधले रंग अतिशय सुरेख, कोणता कॅमेरा वापरलात. आणि शक्य असल्यास exif दिलेत तर अजून अभ्यास होईल आमच्या सारख्या शिकाऊ विद्यार्थ्यंचा
धन्यवाद
In reply to वाह २,३,४ या फोटोमधले रंग by महासंग्राम
नव्याने प्रतिसाद देऊन प्रोत्साहन देणार्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
मंदार - दुसरा फोटो २००४ साली साध्या रोलवाल्या कॅमेर्याने काढलेला आहे. प्रिंटेड फोटो स्कॅन करून तो अपलोड केला होता. तीसरा व चौथा फोटो कॅनॉन पॉवरशॉट एसएक्स ३० आयएस या पॉइंट अॅन्ड शूट (झूम) कॅमेर्याने काढले आहेत.
त्यांचे EXIF खालीलप्रमाणे
बादवे छायाचित्रणाच्या बाबतीत मी देखील शिकाऊ विद्यर्थीच आहे.
तेजोनिधी
फार सुरेख फोटो. हा धागा निसटला होता. आत्ताच पाहिला. -वसंतरावांच्या तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज -ची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch?v=C0uSv5FUni0
सुंदर छायाचित्रे!
सुंदर छायाचित्रे!
क्या बात
खूप सुंदर फोटो आहेत.
सुंदर फोटो!
पुलंच्या चालीवर, "क्यामेऱ्यात मज्जा आहे हो तुमच्या!"
Sandy
अतिशय सुरेख फोटो.
अतिशय सुरेख फोटो.
सुरेख फोटो!
सुरेख फोटो! आणि वाक्य लाजवाब!