Skip to main content

नवीन नाटक - "गांधी आडवा येतो"

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/12/2012 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक बुद्धीभास्कर एक विद्वान आणि प्रथितयश प्राध्यापक. संध्या (पत्नी), माया (डॉक्टर असलेली मुलगी) व (श्याम) मुलगा असे त्यांचे चौकोनी कुटंब. त्यांचा मुलगा कोणत्याच नोकरीत टिकत नसल्याने प्राध्यापक अस्वस्थ आहेत. महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांच्यावर येऊन त्यांना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. यामुळे घरात तंग वातावरण आहे. अचानक मुलगी त्यांच्यावर बॉम्बगोळा टाकते.

केमिकल कॅस्ट्रेशन..

लेखक गवि यांनी सोमवार, 31/12/2012 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीमधे झालेला धावत्या बसमधला बलात्कार आणि त्यामधे त्या निरपराध मुलीच्या शरीराशी केल्या गेलेल्या विकृत मारहाणीने घेतलेला तिचा बळी हे सर्व अगदी ताजं आहे आणि त्याविषयी आधीच खूप चर्चा आणि आंदोलनं झाली आहेत, चालूही आहेत. या प्रसंगाची धग, बोच , अपराधीपणा कुठेतरी सर्वांनाच जाणवतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, जास्त करुन पुरुषाने स्वतःलाच यासाठी अंशतः जबाबदार धरावं की नाही हा मुद्दा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. सध्या कोणीही त्या दिशेने विचार करण्याच्या मनःस्थितीत नाही.

वक्तृत्व स्पर्धा. ( मदत हवी आहे )

लेखक बन्याबापू यांनी सोमवार, 31/12/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत :- स्त्री-भृणहत्या,भारतातील परदेशी गुंतवणूक,बालमजुरी-एक समस्या,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.मला जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल कि मी यातील कोणत्या विषयाची निवड करू ? जेणेकरून परीक्षकांवर प्रभाव पडेल.जो विषय निवडला आहे त्याची सुरुवात कशी करावी.वक्तृत्व कसे असावे ? भाषा कशी असावी ? त्यासंबधी काही सुचना आपण कराव्यात हि विनंती.आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे. ( काही दिवसांनी हा धागा संपादक मंडळींनी उडविला तरी काही हरकत नाही.धन्यवाद )

तुझा कुणी केला घात…

लेखक आर्णव यांनी सोमवार, 31/12/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीची पालखी असुरी हातात अंधाराचे सावट, दिन असो रात प्रतिकुलतेचा येथे नाते झंझावात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात प्रयत्नांची शर्थ जेव्हा व्यर्थ क्षणात विषण्ण विचारांचे तांडव मनात व्यर्थ तुझ्या कार्माविना तुझा अश्रुपात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात काळोखाच्या काजळीच्या मन विळख्यात छोटासा ही धक्का येथे भासतो आघात दैवाची नाराजी ही की फळे कर्मजात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात थैमान अविचारांचे सतत काळजात आपुलेच ओठ आणि आपुलेच दात तरी बळ झुंझायाचे तुझ्या मनगटात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

निरोपाचा क्षण

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 31/12/2012 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको. आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव.

कॉकटेल लाउंज : माइ ताइ (इयर एंड स्पेशल)

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 31/12/2012 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
एका जबरदस्त कॉकटेलनी 2012 ह्या वर्षाची सांगता करुयात. तर 'कॉकटेल लाउंज' मधले, 2012 इयर एंड स्पेशल कॉकटेल आहे माइ ताइ (Mai Tai). पार्श्वभूमी: माइ ताइ हे नाव वाचून , "ताइ माइ अक्का विचार करा पक्का" ह्या निवडणूक घोषणेची आठवण होऊन, मला 2014 च्या निवडणुकींची बाधा झाली की काय असा विचार तुमच्या मनात आला असेल, येऊही शकतो किंवा नसेलही! काय आहे, कोणाच्या मनात काय यावे ह्यावर माझा ताबा थोडीच असणार आहे, काय?

एक अध्यात्मिक संवाद

लेखक धन्या यांनी रविवार, 30/12/2012 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
"धन्या, अध्यात्मात खरंच ईतकी ताकद असते का रे?" ध्यानीमनी नसताना हा प्रश्न धाडकन कानावर आदळला आणि मी गोंधळून गेलो. "किस्ना, फोकन्या कोण चावला बे तुला? मी केव्हाचा वाट पाहतोय की हा वल्ली आता काहीतरी या लेण्यांमधील चित्रांबद्दल माहिती सांगेल, नंतर काहीतरी बोलेल. पण हा बावा केव्हापासून त्या क्यामेर्‍याच्या लेन्समध्ये डोळा मारत बसला आहे. देव जाणे कधी काही उघडया डोळयांनी पाहतो की जे पाहायचं ते क्यामेर्‍याच्या लेन्समधूनच असं ठरवलं आहे." "अबे मी आधी मी उघडया डोळ्यांनीच पाहतो आणि मग क्यामेर्‍याने टीपतो ते". वल्लीचं वाक्य कानावरुन निसटतं गेलं.

सप्तरंगी केक (Rainbow Cake)

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 30/12/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः रेडीमेड स्पाँज केक मिक्स (हे नाही मिळाल्यास बेसीक स्पाँज केकची पाकृ खाली दिली आहे) ५० मिली + २५ मिली पाणी (केक मिक्सच्या पाकिटावर पाणी आणी अंड्याचे जसे प्रमाण दिले आहे तसे घ्यावे) १ अंडं ६-७ खाण्याचे रंग (मी लाल,शेंद्री,पिवळा,हिरवा,निळा,गुलाबी रंग वापरला आहे.