साहित्यः
मोठी कोलंबी : ५०० ग्रॅम्स.
आलं : १ इंचं.
लसूण : ८ पाकळ्या.
ह्ळद : १/२ लहान चमचा (टि स्पून).
तिखट : १ लहान चमचा (किंवा आवडीनुसार जास्त).
हिरव्या मिरच्या : ३ नग. आख्या, उभी चीर देऊन.
कांदा : १ मध्यम.
टोमॅटो : १ मध्यम.
कढीलिंब : १७ ते १८ पानं.
नारळाचे तेल : अर्धी वाटी.(नारळाचे तेल आवडत नसल्यास कुठलेही आवडीचे खाद्यतेल घ्यावे).
जीरं : १ मोठा चमचा (टेबल स्पून)
नारळ : १ नग
मीठ : चवीनुसार.
तयारी:
कोलंबी स्वच्छ करून त्यातील काळा धागा काढून टाका. कोलंबीला हळद-मीठ लावून ठेवा.
आलं+लसूण वाटून घ्या.
कांदा टोमॅटो वेगवेगळे बारीक चिरून घ्या.
कढीलिंब धुवून घ्या.
नारळ खवून त्याचे जाड आणि पातळ दूध काढा. (नारळ आणि दिड ग्लास कोमट पाणी घालून मिक्सर मध्ये भरपूर वाटून, हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या. हे झाले जाड दूध . आता तोच नारळाचा चोथा मिक्सरमध्ये घालून अर्धा ग्लास कोमट पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून हे मिश्रण पातळ कपड्याने गाळून घ्या हे झाले पातळ दूध. जाड आणि पातळ दूध वेगवेगळे ठेवा.)
कृती:
कढईत किंवा जाड बुडाच्या पातेल्यात तेल तापवा.
तेल तापले की त्यात जीरे घाला. जीरे तडतडले की कढीलिंब आणि हिरव्या मिरच्या घाला.
कढीलिंबाचा वास आणि मिरच्यांचा तिखटपणा तेलात उतरला की बारीक चिरलेला कांदा टाकून परता.
कांदा गुलाबी रंगावर परतून झाला की टोमॅटो घालून परता.
टोमॅटो शिजून कांद्याशी एकजीव झाला की कोलंबी आणि आलं-लसूण पेस्ट घालून परता.
आंच मंद करून, कोलंबी बुडतील इतके (जरा कमीच) नारळाचे पातळ दूध घाला. सर्व मिसळून घ्या.
कोलंबी लवकर शिजते. ती शिजली की नारळाचे जाड दूध घाला.
जाड दूध घातल्यावर उकळू नका. रस्सा साधारण चांगला गरम झाला की गॅस बंद करा.
हे कालवण गरम भात किंवा अप्पम बरोबर, केल्यादिवशी, चांगले लागतेच पण दूसर्या दिवशी अधिक मुरते. फक्त दूसर्या दिवशी फ्रिझ मधून काढल्यावर गॅसवर किंवा मायक्रेवेव्ह मध्ये हलके गरम करावे. उकळू नये नाहीतर नारळाचे दूध फाटते.
शुभेच्छा....!
वाचने
10214
प्रतिक्रिया
38
मिसळपाव

प्रतिक्रिया
मस्तच..... कोलंबी तर माझा जीव
मस्त आहे
बेष्ट,खल्लास
काळंबी एकदम फेवरेट. कधी पण
+१ टु मॄणालीनि
मस्त! मलेशिया / सिंगापूर मधे..
लाभले आम्हास भाग्य....
काका हे काय बरोबर नाय हां.
कातील!
+१
In reply to कातील! by ऋषिकेश
हो.. यामधे वाल सूट होतील...
In reply to कातील! by ऋषिकेश
जरूर करा.
In reply to कातील! by ऋषिकेश
प्रयोग यशस्वी!
In reply to जरूर करा. by प्रभाकर पेठकर
अनोखी चव....
In reply to प्रयोग यशस्वी! by ऋषिकेश
धन्यवाद, फोटो दिल्याबद्दल.
In reply to प्रयोग यशस्वी! by ऋषिकेश
रंग एकदम मस्त दिसतो आहे.
होय.
In reply to रंग एकदम मस्त दिसतो आहे. by गवि
मोदक = मासे..??
In reply to होय. by प्रभाकर पेठकर
मोदक नव्हे, मोदकं.. क
In reply to मोदक = मासे..?? by मोदक
कधी करताय..?
In reply to मोदक नव्हे, मोदकं.. क by यशोधरा
मिळाली की..
In reply to कधी करताय..? by मोदक
मेजवानी
जबरा.
गेल्या आठवड्यात एका
......................!!!
देवा!!!!
आता वाल भिजत घालणं आले!
देवा! वाचव, आज गुरुवार,
खल्लास
रंग इतका यल्लो कशामुळे आलाय
मस्त
मस्त पाकृ
पाकृ नेहमीप्रमाणेच जबरडस्ट
कल्पना नाही.
In reply to पाकृ नेहमीप्रमाणेच जबरडस्ट by jaypal
पोर्तुगीज सूप
In reply to कल्पना नाही. by प्रभाकर पेठकर
इंटरेस्टींग.
In reply to पोर्तुगीज सूप by पैसा
पेठकर काका
फिश अथव कोलंबी करी बरोबर
In reply to पेठकर काका by चिंतामणी