Skip to main content

शोध माझ्यातला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/08/2013 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
शोध माझ्यातला मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले समजण्या मला काय गवसले अन काय हरवले माझ्यातले मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले शुद्ध हवा घेतली का कधी? निर्मळ पाणी चाखले का कधी? खळाळता निर्झर कधी का पाहीला? घाम त्वचेतून कधी का वाहीला? लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर? निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर? मदत का कधी कुठे केली? न ठेवता आशा परतीची? घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी? धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी? पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
काव्यरस

बादशाही...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 22/08/2013 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!

स्वीडनमध्ये राहण्याबाबत माहिती हवी आहे...

लेखक शिद यांनी बुधवार, 21/08/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, हा माझा मिपावर लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे. मला मिपावरच्या सर्व जाणकार मंडळींकडुन थोडीशी माहिती हवी आहे व आशा करतो कि तुम्ही सगळे मला पुर्णपणे मदत करतील. मी सध्या कामानिमित्त लंडन येथे आहे आणि लवकरच काम संपवून भारतात परत जाणार होतो. पण, आज अचानक सकाळीच डिलीवरी मॅनेजरचा फोन आला कि मला एका नवीन प्रोजेक्टसाठी Stolkholm, स्वीडन येथे जावे लागेल. माझे जाणे नक्की झाले तर माझ्यासोबत बायको आणि मुलगा (वयः १ वर्ष) सोबत येतील. गुगलवर स्वीडनची सगळी माहिती तर मिळाली तरीपण बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.

वाक्प्रचार, म्हणी,रूपकातील प्राणीवाचक उल्लेखांची अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि असांसदीयतेच्या नेमक्या सीमारेखा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 21/08/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाकप्रचार आणि म्हणींमध्ये बर्याच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्राणी वाचक उल्लेख येतात आणि दुसर्र्या बाजुची व्यक्ती आमचा प्राणी वाचक उल्लेख केला गेला आमच्या भावना दुखावल्या गेल्या असे म्हणू शकते.असे काही वेळा इतर रूपकांमुळेही होऊ शकते.दुसर्र्या बाजूस मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांना लिहिणार्या व्यक्तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यही सांभाळावयाचे असते. १)"वा अबकडराव वा !!! सौ चुहे खाकर बिल्ली हज चाली ...? हळक्षज्ञराव ह्यांना उपदेश सांगण्या आगोदर आपण आत्म परीक्षण केले का ?

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

प्रवासी

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 21/08/2013 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासी जीवन प्रवास गूढ, कोणी कसा केला कोणी हसत निभावले, रडून कोणी केला ll १ ll प्रवासी दिसले कोणी, चालता पथात एकलाच गेला कोणी, हात कोणी केला ll २ ll साथीदार कोणाचा, सोडूनी मधेच गेला संपले तिथेच कोणी, मार्गस्थ कोणी झाला ll ३ ll प्रवास दूरचा, निश्चय निघताना केला प्रारंभीच कोणी, शेवटी कोणी विसरला ll ४ ll प्रवास तत्व ठरले, खुणगाठ बांधलेला मोडले तत्व कोणाचे, प्रवास कुणाचा तुटला ll ५ ll कधी बिकट कधी सोपी, संमिश्र वाट होती थकला मधेच कोणी, कोणी खुणा सोडूनी गेला ll ६ ll प्रवास पूर्ण कोणाचा, हर्षोल्हास कोणा झाला नि:श्वास सोडला कोणी, साजरा कोणी केला ll ७ ll प्रवासी अनेक पंथी, द

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.

पुर्वसुचना

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 20/08/2013 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज पहाटे नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली . अत्यंत निषेधार्ह घटना . समाजाच्या सर्वच स्तरातुन ह्या घटनेचा जोरदार निषेध होत आहे . पण
ज्या विचारांनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच विचारांनी आज डॉ.

डासाचे मनोगत

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 20/08/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला || अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव जीव भुकेला रक्ता वाचून झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१|| मारशील तू मजला कितीही वंश माझा टिकतो तरीही तव अस्त्रांची न मजला भीती तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||
काव्यरस

रक्षा बंधन स्पेशल...

लेखक पुष्कर जोशी यांनी मंगळवार, 20/08/2013 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी पा वर एकही लेख नाही असे कसे ..... त्यामुळेच ... आज रक्षा बंधन मराठीत राखी पौर्णिमा हो... भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण.. ज्याने घर्माची बंधने कधीच तोडली आहेत ... इतिहासात सापडेल.... मुख म्हणजे आज बहिणीने भावाला ओवाळायचे आणि भावाने तिला गिफ्ट द्यायचे... आणि म्हणायचे मी तुझी आजन्म रक्षा करेन असे आजचे आधुनिक स्वरूप... ह्याचाशीच मिळता जुळता सन म्हणजे भाऊबीज सेम म्हणजे ओवाळणी गिफ्ट वगैरे .... पण ... सद्याच्या परिस्थितीत मला काही प्रश्न पडलेत ... का फक्त भावानेच बहिणीस गिफ्ट द्यायचे असे का ?