पियुष मिश्रा-एक अवलिया कलाकार (१)
===============================================================================
आंतरजालावर असलेल्या अनेक स्रोतांवर हे लेखन आधारित आहे. येणारी वळणं, त्यांचा क्रम, किंवा कमी-अधीक गडदपणा माझा म्हणावा. संदर्भ आणि स्रोत शेवटी देईन म्हणतो.
===============================================================================
पियुष मिश्राबद्दल बरंच बोलता येईल. पण आधी ताजी ओळख..
आजकाल बर्याच चित्रपटातुन दिसतो. वासेपुर १ आणि २ मध्ये नासिरचा रोल केलाय त्याने. वासेपुरच्या लंब्याचवड्या श्रेयनामावलीत कदाचित सुटुन जात असेल हे नाव पण नासिरचे कॅरेक्टर लक्षात रहातेच.
मिसळपाव