शतशब्द कथा _________मस्ती
फ्लाईट टेकऑफ़ होताच...
हवाईसुंदरी: काय हवेय?
पोपट: काही नाही, बटन चेक करत होतो.
हवाईसुंदरी: ओके, तुम्हाला काही हवे असल्यास मला बोलवा.
पोपट: परत एकदा बोलवू काय?
शेजारचा गाढव: का त्रास देतोस तिला?
पोपट:अरे मस्ती हाय रे माझ्यात.
हवाईसुंदरी: आता काय हवेय?
पोपट: माझ्याशी मय्यतरी करणार काय?
हवाईसुंदरी: परत अशी नाटके केलीस तर खाली फेकून देईन.
पोपट: गाढवा ही नुसत्या पोकळ धमक्या देते.तू बोलव परत तिला. काय करती बघू.
गाढवच ते.....................बोलावते. .
हवाईसुंदरी: उठा दरवाज्याकडे चला. . .
हवाईसुंदरीच्या मस्त लाथेसोबत पोपट आणि गाढव विमानाबाहेर........ .
आता.........
मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास
मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास
भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.
इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती.
छगनलालांचे सापळे (भाग ५)
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197
त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी.
सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख
आपल्याला कशाची गरज असते सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख?
नक्की कशासाठी आपली धडपड, वणवण चालू असते?
सत्य पूर्ण स्वरूपात कधी कुणासमोर आले आहे का? आणि तसे ते आले तर ते आनंद/समाधान/शांती/सुख देते का?
वरवर बघता सत्य, आनंद, समाधान, शांती, सुख हे जणू एक आले तर बाकीच्यांना घेऊन येते असे काहीसे मानले जाते प्रत्यक्षात असे होते का? का तो एक आभास???
मुळात हे सगळे नक्की आहे काय?
"असेल ते मिटवा आणि नसेल ते भेटवा" मनाचा व्यापार इतका मर्यादित आहे का?
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)
मामाचे गाव (आत्या आज्जी)
मामाचे गाव (आत्या आज्जी)
सुट्टीमध्ये आमच्या खूप गमती-जमती चालत असे. वाड्याच्या थोड्याच अंतरावर खाली एक ओढा वाहत असे, भर उन्हाळ्यात फक्त डबक्यात पाणी भरलेले असे व सवर्त्र वाळूचे साम्राज्य पसरलेले. दोन फुट खड्डा जरी हाताने खणला तरी ओलसर वाळू हाताला लागत असे. ओढ्याचा एक मोठा भाग आम्हाला दिसायचा पण जेथून ओढा सुरु होत असे तेथे घनदाट झाडी असल्यामुळे पाणी कोठून येथे हा प्रश्न आमच्या समोर नियमित असायचा. पावसाळ्यात तुडुंब भरलेला ओढा उन्हाळ्यात डबक्यात कसा मावतो याचे उत्तर शोधण्याचे आम्ही आमच्या परीने अनेक प्रयत्न करायचो.
आरोग्य पंचविशी -२ -- गंधार-पुढे
वासाच्या या दुनियेत मानवाने काही गोष्टी जाणून घेतल्या त्या म्हणजे कोणत्या वासामुळे आपल्याला धोका आहे आणि कोणता वास आपल्या फायद्याचा आहे. सडक्या मासाचा वास हा इतर परभक्षी जनावरांना आकर्षित करतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो या मुळे असा सडक्या मासाचा वास आपल्याला शिसारी आणतो. तसेच सडक्या अन्नामुळे विषबाधा होऊ शकते हे कळल्यामुळे तसा वास येणारे पदार्थ आपण आपोआप खाणे टाळतो.
आता या गोष्टी साध्या सरळ आहेत. पण ज्या गोष्टी इतक्या सरळ नाहीत त्या कोणत्या. तर मानवी शरीराचा वास.
मला एक प्रश्र्न पडला आहे "दाभोळकर की दाभोलकर" ?
गेले ३ दिवस डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांचे आडनांव बदलले आहे का?
व्याकरणाच्या द्रुष्टीने दाभोलकर हे चूकीचे आडनांव वाटते. जसे नेरुळकर,परळकर,परुळेकर, ह्या आडनांवात जसा "ळ" येतो तसाच "ळ" , "दाभोळकर" ह्या आडनांवात पण यायला पाहिजे.
विकिपेडिया आणि लोकसत्ता आणि इतर मराठी व्रुत्तपत्रांत पण दाभोलकर असाच उल्लेख आहे.
कायदेशीर दहशदवाद
कलम ४९८ अ - कायदेशीर दहशदवाद (Legal Terrorism)
परवाच भावाचा फोन आला. त्याच्या मित्राच्या बायकोने त्याच्या मित्रावर ४९८ अ (हुंडाविरोधी कायदा) च्या नावाखाली गुन्हा दाखल केला होता आणि पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता त्या मित्राला, त्याच्या वृद्ध आई वडीलांना आणि भावाला तुरुंगात टाकले. तुरुंगातून बाहेर सोडण्यासाठी पोलिसांनी ७०००० रु ची मागणी केली... मित्राच्या लग्नाला १ महिनाच झालेला होता ... त्यातहि तो आंतरजातीय प्रेमविवाह ... तरीही कुठलेही जातीभेद न मानता दोन्ही घरातील मोठ्यांनी कौतुकाने आणि हौशीने सगळे सोपस्कार केले होते... नवरा बायको दोघं software तज्ञ...
मिसळपाव