Skip to main content

पायरसी टाळणे शक्य आहे काय ?

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 17/08/2013 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
पायरसी टाळणे शक्य आहे काय ? जी चराचराला व्यापून दशांगुळे उरली आहे. पायरसी टाळण्यात कुणी पुढाकार घ्यावा ? उत्पादकाने, विक्रेत्याने की खरेदीदाराने ? की कायद्याचे पालन करणार्‍या व्यवस्थेने ? पायरसी मधून मिळणारा बराच पैसा समाजविघातक कामांसाठी वापरला जात असेल हे मला कळत असले तरी वळत असेलच असे नाही. ४०-५० रुपयांत ५-६ चित्रपट दाखविणार्‍या रस्तोरस्ती मिळणार्‍या डीव्हीडींचे प्रस्थ कमी करण्यासाठी मोझरबेअर ने त्याच किंमतीत २-३ चित्रपट देणार्‍या सीडी / डीव्हीडी उपलब्ध करुन देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

भिन्न षड्जच्या निमित्ताने..

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 17/08/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
ताई देवल क्लबात शिकायला जायची तेव्हा हे नाव पहिल्यांदा ऐकले: किशोरी आमोणकर. ताईचा आवाज तेव्हा थोडा नाजुक होता, पेटीच्या आवाजातुन बाहेर येत नसे. तेव्हा गुलाबबाई म्हणायच्या अगं जरा उंच स्वर लाव की! किशोरीताईंचे ऐक जरा. त्यावेळी कॅसेट-प्लेअर वगैरे नव्हता घरी (आणि जेव्हा आला तेव्हा पहिले काही महिने सुगम संगीत, किशोर, लताबाई, गीतरामायण यांच्या कॅसेट्स ऐकण्यात गेली. त्याविषयी पुन्हा कधीतरी). शास्त्रीय ऐकणे हा प्रकार सोपा झाला नव्हता.

पोळीचा लाडू

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 17/08/2013 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
मला येणारी पाककृती म्हणजे पोळीचा लाडू साहित्यः- घरात शिल्लक असलेली शिळी पोळी ( साधारण ४-५), गूळ किंवा पीठीसाखर, तूप कृती-घरात जास्त झालेल्या पोळ्या घ्या. काही लोक याला चपाती असे देखील म्हणतात. त्या मिक्सरमधे टाकुन बारीक करुन घ्या. घरात मिक्सर नसेल तर हातानेच बारीक होईपर्यंत कुस्करा. त्यात विळीवर चिरलेला गूळ आपल्या चवीनुसार टाका. गुळ कुठलाही चालतो. विळी नसेल तर सुरी घ्या. ते ही नसेल तर हातानेच गुद्दे मारुन फोडा व बारीक करा.आता मिश्रण एकजीव करण्याचा प्रयत्न करा.गूळा ऐवजी पीठीसाखरही घेउ शकता. ती नसेल तर साधी साखरसुद्धा चालते. आता तुप घ्या. ते थोडे गॅसवर गरम करा. ते पातळ होईल.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

म्हैसूर पाक

लेखक रोहिणी पानमंद यांनी शनिवार, 17/08/2013 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १)एक वाटी डाळीचे पीठ २)दोन वाटया साखर ३)तीन वाटी वनस्पती तूप गरम करून ४)चिमुटभर सोडा कृती :- १)साखरेत दीड वाटी पाणी टाकून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात डाळीचे पीठ टाकून सतत हलवत राहावे. २)नंतर त्यात गरम केलेले वनस्पती तूप टाकावे व हलवत राहावे.असे दोन ते तीन वेळा तूप टाकून हलवत राहावे. ३)तूप पूर्ण टाकून संपले की गुलाबी रंग येईपर्यंत मिश्रण हलवत राहावे.नंतर चिमुटभर सोडा टाकून पुन्हा थोडावेळ हलवावे. ४)त्यानंतर हे मिश्रण मोदक पात्रात काढून वरून पाण्याचा शिडकाव दयावा व म्हैसूर पाकची वडी पाडावी .

मदत हवी आहे.

लेखक बन्याबापू यांनी शनिवार, 17/08/2013 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरानो, मला ऑनलाईन मराठी कादंबरी पीडीएफ,ई-बुक स्वरुपात डाऊनलोड करायची आहे.मराठीतील वाचनीय कादंबरी डाऊनलोड करायचे संकेतस्थळ किंवा काही लिंक्स असतील तर सुचवा.धन्यवाद ! (संपादक मंडळीना विनंती आहे कि त्यांनी हा धागा लगेच तोडू नये.काही दिवसानंतर तोडला तरी चालेल.)

आहे!?

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/08/2013 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
आहे!? आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे? आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे! आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे? आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे! आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे? आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे! आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे? आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे! (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?) (नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!) किती मोजू सांगा?

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 16/08/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

आजहि

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/08/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजहि बुलबुल तेच बोलते दुष्कर भाषा परी ही ती दूर क्षितीजावरती दिसते क्षीण तेवणारी पणती आशा नाजुक हिरवळते दरवळते प्रतिमा ओझरती अमिट स्वरांचे हे नाते गुंजारवते अवती भवती श्रावण धारा लोभस वारा भाव भावना ओघवती पागोळी हळुवार उतरते आतुरल्या काठावरती वलये वलये उठती विरती हुर हुर मनभर कातरती सांज सकाळी आठवती नयनांत रेखलेल्या भेटी …………… अज्ञात
काव्यरस

स्वकीय ?

लेखक psajid यांनी शुक्रवार, 16/08/2013 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी आकांत माझ्या ओशाळणारे ओठ हलले, ज्यांनी केले वार शेवटी धीर देऊन गेले ! वादळातील शरीर माझे पाहायला तमाशा आले, केले चौकात उभे ज्यांनी नजरा उंचावून गेले ! कारणे ऐकवण्या अपयशाची समीक्षक ते होऊन आले, देऊन धीर उसना भुंग्यांनी वासे पोकळ केले ! हूल भरारीची देऊन बळ वांझोटेच दिले, माझ्या परस्परच त्यांनी आता घरटे माझे हिरावून न्हेले ! फुंकर घालण्याचे नाटक सोद्यांनी हुबेहूब वटवले, उरात दडवल्या दुःखाची शेवटी किंमत करून गेले ! श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी जिल्हा - सांगली
काव्यरस