मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

केरळ स्टाईल व्हेजिटेबल स्ट्यू

खादाड अमिता · · अन्न हे पूर्णब्रह्म
kerala style vegetable stew सामग्री: १ गाजर, फोडी १ बटाटा, फोडी १/२ वाटी हिरवे मटार १ छोटा कांदा, बारीक चिरलेला ५-६ करी पत्ता २ हिरव्या मिरच्या, मधून चिरा दिलेल्या १ चमचा आलं लसूण पेस्ट १ वेलची २ लवंगा १/२ इंच दालचिनी चा तुकडा ३-४ काळे मिरे १ चमचा तेल २०० मी लि नारळाचे दाट दूध मीठ स्वादानुसार कृती: - एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मिरची, करी पत्ता, आलं लसूण पेस्ट आणि लवंग, दालचिनी, मिरे , वेलची घालून थोडं तडतडल कि मग त्यात कांदा घाला. कांदा मऊसर झाला कि मग बटाटा, गजर आणि मटार घालून झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्या. - भाज्या शिजल्या कि त्यात नारळाचे दूध आणि मीठ घालून एक उकळी आणा. गरम गरम अप्पम किंवा भात बरोबर सर्व्ह करा. - अश्याच पद्धतीने चिकन आणि मटण स्ट्यू पण करता येते.

वाचन 40216 प्रतिक्रिया 0