Skip to main content

बाजरीची खिचडी

लेखक त्रिवेणी यांनी मंगळवार, 26/02/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-(2 जणांसाठी) बाजरी- 1 ½ वाटी तूर डाल- ¾ वाटी(1/2 तास आधी भिजवून घ्यावी) तांदूळ- 5-6 टेबलस्पून शेंगदाणे व खोबर्‍याचे काप- आपल्या आवडीप्रमाणे हळद – ½ चमचा लाल तिखट- आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला किवा गोडा मसाला- 2 टेबलस्पून कांदे-2 मीठ- चवीनुसार कृती- बाजरी 1 तास भिजत घालावी. नंतर एका कपड्यावर घरातच वाळत घालावी. बर्‍यापैकी वाळल्यावर मिक्सरच्या छोट्या भांड्यात अगदी कमी वेळ फिरवावी. (2-3 spin) नंतर पाखडून घ्यावी म्हणजे बाजरीची टरफळे निघून जातील. आता एका पसरट पातेल्यात तेल तापवून जिरे, मोहरी टाकून तडतडले की कांदा गुलाबी परतवून घ्यावा. नंतर हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घालावा. बाजरी+तूर डाळ+तांदूळ=2 वाटी असेल तर 5 वाट्या पाणी गरम करून फोडणीत घालावे. पाण्याला उकळी आली की बाजरी+तूर डाळ+तांदूळ एक एक करून घालावे. चवीनुसार मीठ घालावे. कोथंबीर घालून शिजू द्यावी. (बाजरीला पाणी जास्त लागत असल्यामुळे शिजताना अंदाजाने पाणी अजून घालावे.)

वाचने 6744
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

खीचडी तशी आवडत नाही मला पण बाजरीची खीचडी आवडीची पण वेळ खाउ अस्ल्याने जास्त वेळा केली जात नाही,बरं झाल आठ्वण करुन दीलीत :)

मस्त असते बाजरीची खिचडी. आजीची आठवण आली. याच्यासोबत आमसुलाचेकढीच्या कन्सिस्टन्सीचे सार करतात. त्याचीही रेस्पी टाकलीत तर मजा येईल. खिचडीवर लसणाची फोडणी वरून घेतात सोबत तोंडी लावायला ताकातल्या वाळवलेल्या मिरच्या तळून. वाह!

धन्यवाद सर्वांचे प्रतीसादाबद्दल. गोपाळजी मी खानदेशची आहे त्यामुळे आमच्या स्वयंपाकात आमसुलाचा वापर फक्त आंबट वरण करण्यापुरताच. आमसुलाचे सार मी कधी करून पहिले नाही.

मस्त! आजी करायची तेंव्हा नाक मुरडून, तोंड वेगाडून, रागावून घेवून खाल्ली जायची. त्या खिचडीची मस्त चव आजी गेल्यावर कळून आली. तुम्ही जुन्या आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद!

रेवती ताई मला एकेरी नावानेच संबोधा. मलाही आजीने केलेलीच आवडते. हॉस्टेलला राहत असताना घरी जायच्या आधीच मी पदार्थांची लिस्ट करून ठेवायचे. आणि आजीला सर्व पदार्थ करायला सांगायचे.

हि खिचडी हा अनवट रागातला बडा ख्याल आहे!! वाह!!! तथापि उन्हाळ्यात हा पदार्थ खावा किंवा कसे?? इथे कुणी आयुर्वेदाचार्य असल्यास कृपया मार्गदर्शन करावे...

In reply to by अत्रन्गि पाउस

बाजरी ही उष्ण असते. त्यामुळे उन्हाळ्यात बरेच जन नाही खात. मीही उन्हाळ्या पूर्ण सुरू होण्याआधीच करून खाल्ली.

In reply to by अत्रन्गि पाउस

बाजरी ही उष्ण असते. त्यामुळे उन्हाळ्यात बरेच जन नाही खात. मीही उन्हाळ्या पूर्ण सुरू होण्याआधीच करून खाल्ली.