Skip to main content

" दु:खा "

लेखक कैलास गायकवाड यांनी रविवार, 01/09/2013 या दिवशी प्रकाशित केले.
कधी नको अन कधी वाटतोस रम्य दु:खा तुझ्या नि माझ्यामधील नाते अगम्य दु:खा असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा जगात जीवन नसेल जर काय दु:खविरहित जगावयाची कशास इच्छा अदम्य दु:खा हजार 'कैलास' जन्मती तव कथन कराया तुझ्यामुळे या कथा जोवरी सुरम्य दु:खा ---डॉ.कैलास गायकवाड
लेखनविषय:

वाचने 1297
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त गज़ल ! विशेष करुन
असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा
! हे दोन शेर खूप भावले . -- प्रसाद

गझल. असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा तुझ्यामुळे जाणले सुखाचे महत्व यास्तव तुझे हजारो गुन्हे ठरवतोय क्षम्य दु:खा एकदम खास. -दिलीप बिरुटे

आकृतीबंध अन् वाचनीय.

गझल खुप छान ! प्रत्येक शेर आवडला मात्र - "असा कसा बेसुमार आलास एवढ्यांदा जरा तरी बाळगायचे तारतम्य दु:खा" हा लाजवाब !