१
धीर गंभीर गाज सागराची
सोबतीला आहे बोचरा वारा
हरवून गेल्या दिशा सार्या
अन मी शोधतो आहे किनारा
२
किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले
३
डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर होते टोकणार्या वेदनांचे साचलेले
४
तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं
५
काळ वेळ कधी तशी नसतेच तशी
गुलमोहर फुलांनी बहरून यायला
मनाचंही थोडंसं असंच असतं
पुरते एक जाणीव, मोहरून जायला
६
चांगलं वाईट तसं काहीच नसतं
हा सारा खेळ आपल्या मनाचा
दुखात हसत असे कुणी येथे अन्
कुणी सुखात आसरा घेई वनाचा
७
आपला परका आभास सारे
इथे कुणीच कुणाचं नसतं
प्रत्येक क्षण सापेक्ष इथला
तरीही मन जाळ्यात फसतं
८
भावनेचा ओलावा शोधताना
मी मलाच हरवून गेलो
शिकलो मात्र बरंच काही
अन् वृत्तीने नीर्विकार झालो
९
जाणिवेनेनीवेच्या पलीकडे
एक अस्वस्थ जग असतं
साथ आपलीच आपल्याला
तिथेही कुणी आपलं नसतं
१०
विसरायचं आता सारं अस
मी पुन्हा पुन्हा ठरवतो
क्षण दोन क्षण जातात अन्
मी पुन्हा स्वत:ला हरवतो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6481
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्या.. एकदम हळुवार रे.. मस्त
विसरायचं आता सारं अस
झक्कास्स्स्स्स्स...भावनेचा
अभिव्यक्ती ताजी असताना शिळे
आयला
मिपाला अजुन एक कवि लाभला..
In reply to आयला by मिसळलेला काव्यप्रेमी
कोण
In reply to मिपाला अजुन एक कवि लाभला.. by धन्या
अहो काय हे??
In reply to कोण by मिसळलेला काव्यप्रेमी
+१
In reply to अहो काय हे?? by प्रचेतस
अगदी अगदी. ते कसं विसरेन म्या
In reply to +१ by दादा कोंडके
धनाजीराव
५, ६ आणि ७ मस्त आहेत.
माहित नाहि का ते... तसा आपला माझा परिचयही नाही....
तुम्ही म्हणताय ते खरं आहे.
In reply to माहित नाहि का ते... तसा आपला माझा परिचयही नाही.... by अग्निकोल्हा
शेवटी ४ सिक्सर टपाटप बसलेल्या
अप्रतिम.
+१
In reply to अप्रतिम. by प्यारे१
सुंदर कविता... मात्र शीर्षक अगदीच हुकलेले आहे.+१खरंय....
कविता छान रे.
विसरायचं आता सारं अस
मस्त लिहिलंस धन्या!
+१ मस्त आहे, लिहित रहा
In reply to मस्त लिहिलंस धन्या! by पैसा
धनाजीराव जिंदाबाद!
भारी आहेत एकदम
आयला धन्या ५ वर्षापुर्वी
दोन -तीनदा अगदी वर आलेला धागा
हो ना...
जिलब्या अजिबात शिळ्या वाटल्या नाहीत...
सुखद धक्का
धनाजीराव, लैच जबरा लिहित होता