Skip to main content

ती राजकन्या आणि मी..??

लेखक Yash
Published on बुधवार, 20/03/2013
तो खूपच थकून गेला होता. मागचे काही दिवस ऑफिसमधील काम इतक वाढलेल होत कि त्याला जेवायलाही वेळ मिळत नव्हता. तो PC समोर बसून files check करत होता. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याला असं उदास बसलेलं पाहून अमोद त्याच्या इथे येऊन म्हणाला “अविनाश बस झाल आता चल जरा खाली जाऊन काही तरी खाऊन येऊ. तू तर आज धड जेवला पण नाहीयेस.” “नको रे कंटाळा आलाय खाली उतरायची पण इच्चा नाहीये.” “अरे चल ना अव्या (अविनाश) काम तर होतच राहतात म्हणून काय आपलं जेवणखाण सोडून चालत का ? चल निदान ज्यूस तरी घे.” “बर चल कटकट करू नको.” अविनाश आणि अमोद एका चांगल्या सोफ्टवेअर कंपनीत कामाला होते. कंपनीच्या ६ मजली अशा २ बिल्डिंग सामोरासमोर एका आवारात होत्या. मधील जागेवर एक सुंदर छोटीशी बाग आणि बागेत एक सुंदर कारंजे होते. कंपनीत काम करणारे कधी तरी शांततेत बसता यावं म्हणून तिथे येऊन बसायचे. कंपनीच्या आवाराबाहेर काही खायच्या गाड्या, पाणी पुरीवले असायचे. ज्यूस center तर फार प्रसिद्ध. ज्यूस सेंटर मध्ये बसायला जागा नव्हती पण बाहेर उभं राहून ज्यूसचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या तशी बरीच होती. आणि तशी ज्यूस प्यायची मजासुद्धा होती. अविनाश आणि अमोद ज्यूस सेंटरवर आले. “अव्या तू काय घेणार ?” “watermelon” “अरे भाई २ watermelon देना” ज्युसची ओर्डर देऊन अविनाश आणि अमोद बोलत उभे होते, तोच अविनाशच्या मागून कोणीतरी मधुर आवाजात येउन म्हणालं “भैया २ मोसंबी और १ apple ज्यूस देना. ” अविनाश मागे वळून बघतो. एक सुंदर मुलगी तिच्या २ मैत्रिणींबरोबर ज्यूस प्यायला आलेली असते. तिनी एक सुंदर मोरपिशी रंगाचा पंजाबी dress घातला होता. केस हवेबरोबर छान अलगद उडत होते. गालावर गोड हास्य होते. तिच्या गालावर एक छान खळी होती. हातात एक मोठा mobile होता. एकंदरच ती एका मोठया घरातील आहे हे तिच्याकडे बघून कळत होते. “अविनाश बघितलस काय सुंदर मुलगी आहे.” अमोद म्हणाला. अमोद बोलला त्याकडे अविनाशचे लक्षही नव्हते तो त्या मुलीकडे बघतच होता. “अव्या मी काय बोलतोय ...लक्ष आहे का तुझ माझ्याकडे ” “हं काय बोललास ...” “जाऊदे तू हरवलायस... कशात ते कळतंय मला. बर अव्या निघायचं का आपण बराच वेळ झाला काम पडलीयत अजून” “अरे अमोद थांब न जरा काम तर होतच राहतात रे...!! ” “ए...काय रे मगाशी तर खाली यायला पण तयार नव्हतास..” “असु दे आत्ता वर जायला तयार नाहीये...थांब 5 मिनिटे ” अविनाश हसत बोलला. त्याला बघता क्षणीच ती मुलगी मनात भरली. तो तिच्याकडे एकटक बघत होता जेणेकरून ती एक नजर तरी त्याच्याकडे बघेल. पण तिनी काही लक्ष दिले नाही. अविनाशला तिच्या मैत्रिणीच्या बोलण्यावरून कळले ते म्हणजे तिचे नाव ‘निशा’. ज्यूस संपवून निशा तिच्या मैत्रिणींबरोबर ऑफिसमध्ये जायला निघाली. अविनाश आणि अमोद सुद्धा निघाले. त्या 3 मैत्रिणी त्याच आवारात शिरल्या जिथे अविनाश आणि अमोद कामाला होते. अविनाशला हे बघून फार आनंद झाला कि निशा आपल्याच कंपनीत कामाला आहे. एकंदरीतच त्याला तिचे नाव आणि काम करायची जागा तर कळली होती. त्या 3 मैत्रिणी कंपनीच्या ए – विंग मध्ये शिरल्या. अविनाश आणि अमोद बी – विंग मध्ये कामाला होते. अविनाश आणि अमोद आपापल्या कामावर परतले. अविनाश एकदम खुश दिसत होता जणू काही तो जिच्या शोधात आहे तीच त्याला मिळाली. अमोदला हि गोष्ट लक्षात आली. ---- दुसऱ्या दिवशी ----- आज अविनाश कालच्याच वेळेला येऊन स्वतः अमोदला म्हणाला “अमोद चल जरा ज्यूस पिऊन येऊ” अमोद मिश्कील हास्य देत “काय रे काल तर तुला इच्चा नव्हती खाली उतरायची आज काय झाले अचानक....काही विशेष ??” “छे छे विशेष काहीच नाही रे ..असच म्हंटल जरा कंटाळ आलाय तर १०-15 मिनिटे ब्रेक घेऊन येऊ” “ओह...असं काय चल चल जाऊया ज्यूस पिऊया” अविनाश आणि अमोद परत तिथेच ज्यूस प्यायला गेले. पण बराच वेळ झाला तरी अविनाश जिच्यासाठी आला होता ती काही तिथे आली नाही. असेच २ – ३ दिवस गेले. अचानक एक दिवस परत निशा तिथे मैत्रिणींबरोबर आली. अविनाशचा चेहरा एकदम खुलला. पण नेहमीप्रमाणेच ज्यूस पिऊन झाल्यावर ते आपापल्या कामावर गेले. घरी जाताना अविनाश अमोदला म्हणाला “अमोद तिची माहिती काढायला मदत कर रे मला.” “अरे तू काय वेडा झाला काय.. अस होत नसत कधी” “असं होत नसतं...मग कसं होत असत ??” “अरे म्हणजे...तू काय तिला अस जाऊन सांगणार कि तू मला आवडतेस वगैरे.....आपली न ओळख न पाळख.” “तुला माझी मदत करायची आहे का नाही ते सांग.” “नाही” “ठीक आहे रे ...जगात आपल अस कोणीच नसतं मित्र पण नावापुरतेच ” अविनाश मुद्दामून म्हणाला. “हा ठीक आहे ठीक आहे ...जास्त senti झाल्याच नाटक करू नकोस. बघतो मी काढतो तिची माहिती माझे १-२ मित्र आहेत त्या विंग मध्ये. त्यांना विचारतो.” आणखी काही दिवस असेच जातात. अविनाश आणि अमोद ज्यूस प्यायला जातात. निशाहि तिथे येते. पण काहीच पुढे होत नसतं. एक दिवस अमोदचा ए – विंग मधला मित्र “रितेश” सुद्धा ज्यूस प्यायला तिथे येतो. निशासुद्धा तिथेच थोडी लांब उभी असते. अमोद रितेशला विचारतो “रितेश ही समोर pink top मध्ये उभी आहे ती तुमच्याच इथे कामाला आहेना रे ?” “हो...का ??” “अरे माझ्या या मूर्ख मित्राला ती आवडते. तर तू थोडी माहिती दिलीस तर जरा मदत होईल.” रितेश भुवया उंचावतो आणि म्हणतो “हं मूर्ख मित्र म्हणालास ना तू त्याला तेच बरोबर आहे.” अमोद आश्चर्याने विचारतो “म्हणजे ?” रितेश अविनाश आणि अमोदकडे बघून म्हणतो “अरे ती आपल्या chairman ची मुलगी आहे. आणि आपल्या कंपनीची नवीन मार्केटिंग हेड आत्ताच US वरून आलीये. नशीब असाच जाऊन काही बोलण्याची हिंमत केली नाहीस ते. नाही तर त्या pink top वालीने तुला pink slip दिली असती. घरी बसाव लागल असत. हातची नोकरी गेली असती.” ते ऐकून अमोद अविनाशला म्हणतो “ए बाबा ..मला काही तुझ्या मदतीला घेऊ नकोस तू तुझी आणि माझी दोघांचीही नोकरी घालवशील. अरे ती मोठया मोठया गाड्यांमधून फिरणारी. तुला परवडली तरी असती का ती. काय पण बोलतो. चला ऑफिसमध्ये भरपूर काम पडलय. नसते उद्योग करायचे. राजकन्या वगैरे स्वप्नापुरत्याच बऱ्या. आला मोठी स्वप्नं बघायला.” अविनाश चालता चालता अमोदला “अरे पण मला काय माहित ती कोण होती ते ? मी आपला सहजच...” दोघेही ऑफीसमध्ये जाऊन कामाला लागतात.
लेखनविषय:

वाचन संख्या 2988
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

हात तेच्या मारी! अगदी ऑस्ट्रेलियन टिमने कसा गपगुमान मार खाल्ल्ला तस वाटल वाचुन.

सदर लेखकाने श्रीमान गोविन्दा ह्यान्चा पार्टनर व विल स्मिथ हेन्चा "हिच" हा मार्गदर्शक चित्रपट पहावा. योग्य मार्गदर्शन होईल. असे खचुन जाऊन जुस चे पैसे वाया घालवु नये.

लेखकाने वर्तमानकाळ व भूतकाळाचे इतके अप्रतिम मिश्रण केले आहे की तो एक मराठीतला नवीन प्रयोग म्हणता येईल. इतकी रोचक प्रेमकथा बरेच दिवसांत वाचली नव्हती. एक शंका: पाणी पुरीवले असायचे या ठिकाणी पाणी पुरवणे वा पाणीपुरीवाले असा श्लेष लेखकाने साधला आहे का ?

छान. १)नविन लोक कामाला लागले की "Welcome new joiners" चा एक मेल येतो.इथे ही पद्धत दिसत नाही. २)"हातात एक मोठा mobile होता" हल्ली हातात लहान मोबाईल असणे हे मोठेपणाचे ल़क्षण आहे.मार्केटिंग हेड वाल्यांकडे काळबेर(ब्लॅ़कबेरी) तर पाहिजेच. ह्.घ्या.