चित्रपट समीक्षा: क्रिश ३

निमिष सोनार जनातलं, मनातलं
चित्रपट समीक्षा - क्रिश ३ दर्जा- * * * चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन कलाकार - निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन प्रिया - प्रियांका चोप्रा काया - कंगना राणावत काल - विवेक ऑबेरॉय सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू : हा खऱ्या अर्थाने सिक्वेल आहे. मागच्या दोन्ही चित्रपटांची (कोई मिल गया, क्रिश) कथा यात खरोखर पुढे सरकते. क्रिश ३ ची कथा क्रिश प्रमाणेच खूप किचकट आहे. रोहित मेहेरा हे त्यांचा मुलगा क्रिश आणि क्रिश ची पत्नी प्रिया सोबत राहत असतात. ते सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर एक प्रयोग करत असतात. पण सुरुवातीला तो प्रयोग ऊर्जा आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याने अयशस्वी होतो. दरम्यान क्रिश भारतात अनेक ठिकाणी संकट आले असल्यास मदतीला जात असतो. काल नावाचा एक शास्त्रज्ञ असतो. त्याला लहानपणापासूनच टेलिकायनेसीस चे वरदान मिळाले असते (ते का मिळाले असते ते नंतर शेवटी आपल्याला कळते आणि त्याला ही कळते. त्याच्या वडिलानंही ते माहिती नसते) तो अपंग असून व्हीलचेअर वर बसल्या बसल्या अनेक गोष्टी इकडच्या तिकडे करू शकतो. त्याने अनेक मानवर (मानव + जानवर) प्रयोगशाळेत बनवले आहेत आणि स्वत:ला ठीक करण्यासाठी तो अनेक प्रयोग करत असतो. त्यासाठी लागणारा पैसा तो एका रोगाचे विषाणू बनवून नामिबिया, भारत अशा देशांत मार्फत पसरवून लोकांना आजारी पाडून, त्याचा इलाज करण्यासाठी स्वतःच्या रक्ता पासून ऍंटीडोट बनवून ते विकून मिळवतो. पण इकडे रोहीत स्वतः वर आणि क्रिश वर त्या विषाणू चा परिणाम न झाल्याने क्रिश च्या रक्तापासून ऍंटीडोट बनवण्यास सफल होतात आणि तिकडे काल ला धक्का बसतो की हे कसे शक्य आहे? त्याच्या रक्ताविना इतर रक्तापासून हे ऍंटीडोट बनवणे कसे शक्य झाले? त्या अनुषंगाने रोहीत ला (सिंगापूरला जाऊन) एक सत्य कळते... ते काय असते? पडद्यावरच बघणे योग्य! रोहित सिंगापूरला जाणार आहे हे क्रिशला घरात असून सुद्धा माहिती नसते आणि त्याचे कारण प्रिया असते असे रोहितला दिसते पण तसे नसते... काल च्या अनेक मानवरांपैकी (मान्यवर नाही बरे!) एक मादक मानवर स्त्री काया ही सरड्याचे गुणधर्म असलेली मानवर असते. ती कोणाचेही रंग रूप घेऊ शकते. "काल" च्या पयोगशाळेत जे चालते त्याचा भांडाफोड करण्यास निघालेल्या एका व्यक्तीला ती रूप बदलवून धोक्याने मारते. क्रिश आणि त्याच्या पूर्ण कुटुंबावर हे मानवर एके दिवशी हल्ला करतात.... त्यात प्रिया जखमी होते....क्रिश त्यांचेशी लढतो, नंतर डॉक्टर क्रिश ला सांगतात की प्रिया च्या पोटात त्याचे वाढणारे बाळ हल्ल्यात मृत्यू पावले आहे..... पुढे काय होते? पडद्यावर बघा! परिक्षण : सुरुवातीचा विमानातल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रसंग अगदी अस्सल आणि नवीन! ज्याने कुणी हि शक्कल लढवली त्याला शाबासकी!! मानवर रात्री क्रिश कुटुंबावर हल्ला करतात तेव्हाची ऍक्शन अगदी वेगळी. वर्णन करण्यापेक्षा मी म्हणेन ती पडद्यावर अनुभवा! ऍक्शन आणि स्पेशल इफेक्ट हॉलिवूडच्या तोडीचे आहेत. त्याबद्दल १०० मार्क. आणि विशेष म्हणजे स्पायडर, सुपर, एक्स अशा अनेक मॅन पेक्षा क्रिश आपले करामतीतले आणि ऍक्शन मधले वेगळेपण टिकवून ठेवतो. त्यात कुणाचीही नक्कल नाही. चित्रपटाची कथा अस्सल आहे. फक्त "काल" चे शेवटचे दृश्य आयर्न मॅन ३ सारखे वाटते पण ते तरीही वेगळे आहे कारण त्याचा शरीराला चिकटणारे पत्रे टेलिकायनेसिस मुळे चिकटतात. आयर्न मॅन ची संकल्पना वेगळी आहे कथेचे थोडेफार स्पायडर मॅन ३ शी साधर्म्य वाटते पण नंतर कळते की हे वेगळेच आहे. यात चित्रपटात अनेक वैज्ञानिक कल्पना एकाच वेळी हाताळल्या गेल्या आहेत. (विषाणू तयार करणे, टेलिकायनेसीस, प्राणी मानव बनवणे, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून वनस्पतींना जिवंत करणे) "दिल तूही बता" हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय (गाण्यातले लोकेशन्स बघण्यालायक आणि गाण्यातली कंगना अतिशय मादक दिसली आहे) तसेच "रघुपती राघव" या गाण्यात हृतिकचा नाच छान आहे. पूर्ण चित्रपटात कंगना खूप सुंदर आणि मादक दिसली आहे. सुपर वूमन च्या चपळाईला साजेसे तिचे शरीर असल्याने ती भूमिका तिला फिट बसते. दिपिकाला (पडूकोण) ही ही भूमिका करता आली असती. कायाच्या भूमिकेतली कंगना ची वेशभूषा थोडी कॅटवूमन सारखी वाटते पण कॅटवूमन ची भूमीका करणाऱ्या "हॅले बेरी " इतकी कंगनाची फिगर मात्र सुडौल वाटत नाही. जीभ लांब करणारा मानवर आणि काया वगळता इतर मानवरांचा म्हणावा तसा उपयोग कथेत करता आला नाही. शेवटच्या प्रसंगात फक्त काल शीच लढाई दाखवण्यापेक्षा हे सगळे मानवर सुद्धा त्यात दाखवायला पाहिजे होते. तसे राकेश रोशनने टाळले असावे कारण कदाचित मग तो स्पायडरमॅन ३ चा क्लायमॅक्स वाटला असता, ज्यात सगळे खलनायक एकत्र येतात. क्लायमॅक्स थोडासा ट्रान्स्फॉर्मर्स ३ च्या एका ऍक्शन सीन सारखा वाटतो. "क्रिशच्या आजूबाजूला अनेक मानवर" असे चित्रपटाचे एक पोस्टर बघून चित्रपटाबद्दल एक जी कल्पना आणि उत्सुकता तयार होते ती या चित्रपटात पूर्ण होत नाही. राजपाल यादव चा रोल विनोदासाठी थोडा अधिक करता आला असता. हृतिकचा अभिनय (तिन्ही भूमिकांमधला) अतिशय उत्तम. क्रिश चित्रपटासारखा सिद्धांत आर्य च्या प्रयोगशाळेत जसा क्लायमॅक्स होतो तसा आता क्रिश ३ याही चित्रपटाचा क्लायमॅक्स "काल" च्या प्रयोगशाळेत होणार आणि चित्रपट एवढ्यात संपणार की काय असे वाईट वाटत असतांना काल तेथून पसार होतो, आणि आपल्याला अजून क्लायमॅक्स बाकी आहे असे समजून हायसे वाटते. एकूण राकेश रोशनचा एक अतिशय चांगला सफल प्रयत्न असे या चित्रपटाबाबत म्हणता येईल.
वर्गीकरण
लेखनप्रकार

26 टिप्पण्या 7,209 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

धन्स. नक्कीच बघू. अवांतर : दिल तू ही बता युट्यूबर पाहिलं. मादक बिदक असं कै वाटलं नाही. -दिलीप बिरुटे

विजुभाऊ नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्याशी सहमत आहे बिरुटे सर ..ते तसे दिसणे हा ज्याची त्याची वैयक्तीक भावना आहे. कोणाला देवीका राणी तशी दिसू शकेल तर कोणाला साउथ ची "नमिथा" ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by विजुभाऊ

>>>> ते तसे दिसणे हा ज्याची त्याची वैयक्तीक भावना आहे. सहमत. :) अवांतर : शाहिद कपूरचा डान्स असलेले साडी के फॉलसा कभी म्याच किया रे... हे गाणं लै फार्मात आहे असं वाटलं. -दिलीप बिरुटे

जेपी नवीन

वाटच पहात होतो . कुणी क्रिश परीशण लिहिण्याची . पहायचा आहे .

साळसकर नवीन

अर्थात मोठ्या पडद्यावरच बघणार हा चित्रपट... फक्त तो विवेक ओबेरॉय सहन होतो की नाही तेवढे सांगा..

निमिष सोनार नवीन

हो! विवेक ऑबेऱोय अतिशय आश्चर्यकारकरित्या सहन होतो. पण तोपर्यंयच जोपर्यंत तो व्हिल चेअर वर असतो. तोपर्यंतचा त्याचा अभिनय अतिशय उत्तम आहे. गंभीर आहे. ....पण जेव्हा तो पत्रे अंगाला चिकटवून शहरात येवून क्रिश चा पुतळा फोडून त्या जागी ऊभा राहून बडबड करायला लागतो त्यामुळे त्याचे खलननायकी गांभीर्य नष्ट होते. तो विनोदी वाटायला लागतो. आता हा बावळट आतापर्यंतचा त्याचा अभिनय शेवटी वाया घालवतो की काय असे वाटायला लागत असतांनाच शेवटची दे धमाल हाणामारी सुरू होते आणि आपल्याला हायसे वाटते आणि विवेक पुन्हा सहन व्हायला सुरूवात होते....

विजुभाऊ नवीन

अरे व्वा....... एकुणातच ही चित्रपट लोकाना "प्रेक्षकानी डोके चालवावे पण निर्मात्याच्याच डोक्यानुसार" या पठडीतला आहे. सदाशिव अमरापूरकर + धर्मेन्द्र अभिनीत एक चित्रपटात अमरापूरकर एक वाक्य पृथ्वीचा गोल दाखवत एक वाक्य म्हणतात " हम कम्पुटरसे यहां बम फोडेंगे"....... हा चित्रपट देखील त्याच कॅटॅगरीतला दिसतोय

भाते नवीन

आत्तापर्यंत आंजावर वाचलेले सर्वात चांगले परीक्षण. धन्यवाद. आंजावरची एवढी नकारार्थी परीक्षणे वाचुन क्रिश३ खरंच एवढा खराब आहे का अशी शंका आली होती. हे परीक्षण वाचल्यावर किमान एकदा हृतिक रोशन (आणि कंगणा राणावत) साठी हा सिनेमा पाहायला हरकत नाही आहे असे वाटते. जमल्यास सिनेमा पाहुन पुढील प्रतिक्रिया देईन.

बॅटमॅन नवीन

कायाच्या भूमिकेतली कंगना ची वेशभूषा थोडी कॅटवूमन सारखी वाटते पण कॅटवूमन ची भूमीका करणाऱ्या "हॅले बेरी " इतकी कंगनाची फिगर मात्र सुडौल वाटत नाही.
कॅटवुमन एकच- अ‍ॅन हॅथवे!!!!! बाकी सब बेडौल मांजर्‍या. (हॅथवेप्रेमी) वेनकुलोत्पन्न ब्रूसाजी बिन थॉमसाजी.

कानडाऊ योगेशु नवीन

आजच क्रिश ३ पाहीला. पहीले दोन्हीही चित्रपट बच्चे कंपनीला टारगेट करुन बनवले होते आणि बच्चे कंपनीत जादू आणि क्रिश हे कॅरेक्टर फेमस ही झाली होती. पण ह्या चित्रपटात लहान मुलांना पाहण्यासाठी तसे काहीच नावीन्य नाही आहे. अ‍ॅक्शनदृष्ये प्रभावे आहेत पण उत्कंठावर्धक नाहीत. मानवर आणि क्रिश मधली मारामारी फारच त्रोटक आहे.तिघांपैकी एकाशीच हेड टू हेड मारामारी आहे आणि ती ही लवकर संपते. थोडक्यात एज ऑफ द सीट वर आणतील असे प्रसंग जवळपास नाहीतच. विवेक ऑबेरॉयने केलेली भूमिका मला तर आवडली. सलमान प्रकरणानंतर त्याला एकही दमदार भूमिका मिळाली नव्हती. इथे मिळालेली भूमिका त्याने चांगली निभावली आहे. विशेषतः स्वतःच्या आवाजाचा त्याने परिणामकारक वापर केला आहे.

अत्रुप्त आत्मा नवीन

एक महत्वपूर्ण निरिक्षण ह्रायलं हो!... लहान मुलांना~ "जो दुसरों के दुख दुर करने की कोशिश करता है,वही क्रिश है।जिसमें पावर्स है...सिर्फ वो नही।" अशा आशयाचे डायलॉग संपूर्ण शिनुमात ३/४ वेळा योग्य ठिकाणी, परिणामकारकपणे आलेले आहेत. :)

पाषाणभेद नवीन

In reply to by अत्रुप्त आत्मा

एक महत्वपूर्ण निरिक्षण अत्रुप्त आत्मा - Mon, 04/11/2013 - 23:51नवीन एक महत्वपूर्ण निरिक्षण अत्रुप्त आत्मा - Mon, 04/11/2013 - 23:54नवीन एक महत्वपूर्ण निरिक्षण अत्रुप्त आत्मा - Mon, 04/11/2013 - 23:55नवीन एक महत्वपूर्ण निरिक्षण अत्रुप्त आत्मा - Mon, 04/11/2013 - 23:55नवीन अशा आशयाचे डायलॉग संपूर्ण शिनुमात ३/४ वेळा योग्य ठिकाणी, परिणामकारकपणे आलेले आहेत. हो समजले आम्हाला पण हे सांगण्यासाठी तुम्हीही ४/४ वेळा सांगण्याची आवश्यकता नव्हती. :-) आणि हो, चित्रपट परिक्षणाचा हा फॉर्म्याट योग्य आहे. नाहितर बरेच जण केवळ चित्रपट पाहिला की परिक्षणाच्या योग्य झालो हा नियम मानतात.

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by पाषाणभेद

@हो समजले आम्हाला पण हे सांगण्यासाठी तुम्हीही ४/४ वेळा सांगण्याची आवश्यकता नव्हती.>>> mobile नेटवर्कचा प्र'ताप! :) असो,हे समजेल अशी अपेक्षा. :)

निनाद मुक्काम … नवीन

परीक्षणात विवेक ला दुय्यम स्थान दिल्याचे पाहून धक्का बसला , ह्या सिनेमात ऋतिक त्याच्या पहिल्या व दुसर्या भागातील भूमिका पिता पुत्राची पुढे नेतो त्याच्या भूमिकेत नावीन्य नाही तीच गात प्रियांकाची , पण विवेक ने फारच सुंदर व दमदार अभिनय केला आहे ८० टक्के मिळवणाऱ्या ने ८५ टक्के मिळवणे व एरवी ६० टक्के मिळवणाऱ्या ने ८० टक्के मिळवणे ह्यात नक्कीच फरक आहे , जो अनुक्रमे ऋतिक व विवेक मध्ये आहे , सिनेमातील मानवर हि संकल्पना हॉलीवूड ला नवीन नाही ,मात्र मानव व त्यांच्यात असामान्य शक्ती असे जे सिनेमात दाखवले आहे ते एक्स मेन वरून ढापले आहे ,अर्थात भारतात सगळ्यांनी एक्स मेन पहिलाच असेल अशी शक्यता नाही तेव्हा भारतीयांना ते नवीन व आकर्षक वाटते , हाणामारी चे प्रसंग मस्त जमले आहेत त्यात तुम्ही भी क्रिश बन सक ते हो असे सांगणारा त्या लहान मुलाला वाचविण्याचा प्रसंग वरणीकारणी मूळ पटकथेला ठिगळ लावलेला वाटला तरी त्या मागे तो क्रिश चा हातातला बांधायचा बेंड भारतीय बाजारपेठेत खपविण्यासाठी मुददाहून टाकला होता. सिनेमात घराच्या भिंतीवर रेखाच्या फोटोला हार घालून तिचे म्हणजे रोहित च्या आईचे काय झाले हा प्रश्न आपसूकच निकालात काढला , सिनेमात जागोजागी क्रिश हा भारतीय आद्य महामानव शक्तिमान ह्याच्या सारखे लहान थोरांना आयुष्यात कसे वागावे ह्याचे धडे देतो त्याच सोबत लहान मुलांनी क्रिश सारखे इमारतीवरून उड्या मारायचे येडे चाळे करू नये हे देखील आवर्जून सांगतो , रोशन चे संगीत अत्यंत सुमार पहिल्या सिनेमात दोन गाणी मस्त जमली होती रघुपती राघव खटकते बाकी पसंद अपनी अपनी काल की कायनात मध्ये सध्या भारतीय प्रेक्षकाच्या उड्या पडत आहेत , सिनेमा १०० कोटीच्या समूहात पहिल्या आठवड्यात सहज जाईल दुसर्या आठवड्यात तगडी स्पर्धा नसेल तर दिवाळीचा भर ओसरल्या वर २०० कोटी अशक्य वाटत नाही , पाप रोशन च्या डोक्यात क्रिश ४ च्या जुळवा जुळवीचे काम कधीच सुरु झाले असेल , त्यात सुझान च्या भावाला जो सध्या बेरोजगार आहे त्यास फुटकळ भूमिका नेमकी कोणती व कशी द्यायची ह्यावर सुद्धा विचार प्रक्रिया सुरु असेल , अवांतर विवेक चे पात्र ह्यावरून उचलले आहे. तर कंगनाचे ह्या वरुन

रामपुरी नवीन

In reply to by निनाद मुक्काम …

हेच म्हणायला आलो होतो. टंकनश्रम वाचविल्याबद्दल धन्यवाद. चित्रपट सुमार आहे हे वेगळे सांगायला नकोच

उद्दाम नवीन

फालतू सिनेमा. ३०० रु घालून पाहिला.

अग्निकोल्हा नवीन

In reply to by उद्दाम

बिनधास्त विचरा इन्सेप्ष्ण अन मेत्रिक्स् वा ट्वेल मंकीझ मंदी पि एच डी हाई आपली....

निमिष सोनार नवीन

मला वाटते आहे की आता क्रीश वर जरूर कॉमिक्स निघतील ... या चित्रपटाने दोनशे कोटी च्या वर गल्ला जमवला आहे. म्हणजेच हा सिनेमा सगळ्यांना आवडतो आहे.

पिलीयन रायडर नवीन

मला तर हा उत्तम चिरफाडीचं पोटेन्शिअल असलेला चित्रपट असावा असं बाकी परीक्षणांवरुन वाटत होतं.. तुम्ही तर चांगलाय म्हणताय.. जाऊ दे.. तसही मला "दुनियाको बचाना है" पिक्चरचा वैताग येतो..