मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गंप्या ची विनोद ग्रहिता

राजा सोव्नी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो , विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो. गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली . स्मरणिकेच्या संपादक मंडळात तसेच कार्यकारी मंडळात महिलांच्या नावांची भली मोठी नामावली होती ,हल्ली च्या प्रथे प्रमाणे महिलांनी नवा नंतर माहेर चे आडनाव व नंतर सासरचे आडनाव लिहिले होते ,ती नावे वाचून गंप्या ला खूपच गंमत वाटली . संपादक मंडळात सौ. सुनयना काणे डोळे,सौ. कुंतल टकले डोके,सौग़ुलाब बोचरे काटे . सौ. जुही फुले गजरे होत्या . कार्यकारी मंडळात सौ कडू वाटाणे ,सौ… दुबळे नातू ,सौ …।खोटे वैद्य ,सौ … खरे आठवले ,सौ ।ओक लेले , सौ … प्रचंड बडबडे ,सौ … हिरवे फाटक ,सौ … वाकडे सुळे ,या प्रमाणे भली मोठी यादी होती माहेर सासर चे आडनाव लावल्याने अशी गंमत होऊ शकते ,गंप्याला स्मरणिकेतल्या बाकी लेखा पेक्षा हि नावे वाचूनच खूप मज्या वाटली

वाचने 6783 वाचनखूण प्रतिक्रिया 13

प्रकाश घाटपांडे 27/05/2013 - 08:25
हॅहॅहॅ मजा आली वाचताना. काही लोक श्लेषातून चावट विनोद करण्यात मशहूर असतात.

ब़जरबट्टू 30/05/2013 - 09:53
गंप्या बदनाम हुआ राजा तेरे लिए..

अनिरुद्ध प 30/05/2013 - 13:24
परोपकारी गम्पु,पु ल देशपान्डे यान्ची आठ्वण झाली,त्यामुळे 'गम्पु' हे पात्र विनोदासाठी वाहिलेले आहे असे वाटते.
"हसू नका बरे" हे सदर माझ्या लहानपणी "चंपक"मधे यायचे. अजूनही येत असेल. त्या तोडीचं किंबहुना त्याला मागे टाकणारं लिखाण आज बर्‍याच वर्षांनी वाचलं.

In reply to by गवि

रामपुरी 30/05/2013 - 22:58
हल्ली त्या तोडीचे सदर 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये 'हसा लेको' या नावाने येते. पण या लेखाने(?) सगळ्यांना मागे टाकले आहे.

आशु जोग 28/07/2013 - 00:15
मारुतीला किती डोळे

चित्रगुप्त 28/07/2013 - 02:33
इश्श्य... काहितरीच मेलं... चहाटळ कुठ्ले... -- चित्रा गुप्तगंगातीरकर मादागास्करकर