Skip to main content

आयुष्य

लेखक हेमान्गी यांनी शुक्रवार, 20/12/2013 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या वाटा थोडे खळगे थोड्या लाटा जपून चालावे तर लाटांबरोबर वाहत जाण्याची भीती धावत जावे तर खळग्यात पडण्याची भीती तरीही मन होते फुलपाखरू स्वप्नगंधी फुलांनी लागते बहरू आसमन्ताच्या जादूने रंगांची उधळण अंगणात जणू प्राजक्ताची पखरण वृक्षवल्लींना चढतो फुलांचा साज कधी गंभीर होते मन ऐकून समुद्राची गाज बहर ओसरू लागताच तुटतात स्वप्न साखळ्या कागदावर उतरू लागतात शब्द चारोळ्या

बालस्नेहसंमेलन

लेखक मितान यांनी शुक्रवार, 20/12/2013 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे. एका शाळेच्या क्रीडास्पर्धा. बेडुक उड्या. भल्या सकाळी ७:३० वाजता आपापल्या चिमुकल्यांना मैदानावर घेऊन आलेले पालक.

चिर अनंत

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती ……………… अज्ञात
काव्यरस

चीनला हवीत मुले

लेखक अमित खोजे यांनी शुक्रवार, 20/12/2013 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीपासून आपल्या देशातली घाण आणि भ्रष्टाचार याला आपली लोकसंख्या जबाबदार आहे हा विचार माझ्या डोक्यात अगदी पक्का बसला होता. नेहमी मला वाटायचे कि अमेरिकेत असते तशी स्वच्छता, टापटीपपणा, कमी भ्रष्टाचार, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी हे सर्व आपल्याकडे का नाही तर जनसंख्या. एवढी लोकं असताना कुणाकुणाला आणि कधी शिस्त लावणार? त्यामुळे आपल्या देशात जर चीन सारखी "हम दो हमारा एक" अशी योजना जर केली तर किती बरे होईल!

नेहमीचंच !

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 20/12/2013 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्‍यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते.

चला व्हिएतनामला ०९ : मेकाँगचा त्रिभूज प्रदेश आणि विन् त्रांग पॅगोडा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

गुन्हा ?

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-d… वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते .

पोलिसांचा ढिसाळपणा

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये एका मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला . गेल्या वर्षी दिल्लीत एवढे कांड होवूनही पोलिसांनी या प्रकरणात जो ढिसाळपणा दाखवला ,तो पाहता कोणाही जागरूक नागरिकाला संताप आणणारा आहे ! सन्दर्भ- http://prahaar.in/maharashtra/konkan/164988 मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला. ठाणे- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला.