अंधश्रद्धा - कर्मकांड
नको लागूस माणसा तू, अंधश्रद्धा व कर्मकांडाच्या मागे
नाही त्यातून चांगले ते निष्पन्न निघे।
अडकता माणूस त्या भोवऱ्यात नाही सुटका होत त्यातून,
माणसा तुझे कर्तव्य तू करत जा
नको मागे लागू अंधश्रद्धेच्या आणि कर्मकांडाच्या
आता तरी शहाणा हो व त्या गर्तेतून घे मोकळा श्वास।
शिकून-सवरून तू मोठा झालासी,
विज्ञानाचा वापर तू करू लागलासी,
काय सत्य ते तुला ठाऊक तरी तू
आहारी जातसे कर्मकांड व अंधश्रद्धेच्या!
जे व्हायचे ते होणार असते
नको अडकू तू या कर्मकांड व अंधश्रद्धे च्या फेऱ्यात
माणसा माणसा, आता तरी तू डोळस हो. बघ जग कुठे चालले आहे?
मिसळपाव