Skip to main content

शोध माझ्यातला

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 22/08/2013 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
शोध माझ्यातला मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले समजण्या मला काय गवसले अन काय हरवले माझ्यातले मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले शुद्ध हवा घेतली का कधी? निर्मळ पाणी चाखले का कधी? खळाळता निर्झर कधी का पाहीला? घाम त्वचेतून कधी का वाहीला? लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर? निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर? मदत का कधी कुठे केली? न ठेवता आशा परतीची? घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी? धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी? पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी? भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी? एकांती बसता कोणताच विचार नाही मनी लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी? रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात असे झाले कधी हरवून गेलो त्यात? दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला? मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला? चिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची? खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची? ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले? मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले - पाभे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1518
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

@ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले? मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले >>> __/\__ सलाम या शेवटावर! आंम्ही पाभेंना दिलेलं भेदकपाषाण,हे नाव सार्थ आहे!

हा शोध आयुष्याच्या फक्त एखाद्या हळव्या वळणावर घ्यायचा नसतो तर सतत घेत राहायचा असतो. कविता आवडली. चांगल्या विचारांना प्रवृत्त करणारी आहे. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कविता आणि प्रतिसाद आवडला.

In reply to by सुधीर

+२ कविता आवडली आणि पेठकर काकांशी सहमत.

कविता अतिशय आवडली. हा तुमचा शोध पूर्ण होइल, आणि तुमच्या सर्व प्रश्नांची, तुम्हाला हवी तीच उत्तरे नक्की मिळतील, याची खात्री बाळगा. तुम्ही फक्त या मार्गावरून चालत रहा. s

सुंदर कविता , आणि खरेच विचार करायला लावणारी.......पाभेंच अभिनंदन...