Skip to main content

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 14/02/2014 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.

... तुझ्यासाठी बहर होते

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 13/02/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला.. कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते.. घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही.. सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते ! नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते ! डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस

फावल्या वेळेतली फोटोग्राफी….

लेखक मेघनाद यांनी गुरुवार, 13/02/2014 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
खाली दिलेली सर्व छायाचित्रे ही मायक्रोमॅक्स A90s मोबाइल च्या ८ मेगापिक्सेल कॅमेरामधून टिपलेली आहेत. हि सर्व छायाचित्रे सर्व मिपा करांना दाखवण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा खटाटोप. काही छायाचित्र थोडीफार सुधारलेली आहेत. कलादालन श्रेणी मध्ये हा धागा टाकायचा बराच प्रयत्न केला पण काहीतरी समस्या येत होती म्हणून इथे प्रकाशित केला.

चिंता

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 13/02/2014 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
असाच आणखी एक प्रवास. रस्त्यावरचं गाव. नेहमीप्रमाणे मला उशीर झाला आहे. माझं काम कधी वेळेत संपत नाही - कारण चर्चेत एकातून एक मुद्दे निघत राहतात. ते तितकेच महत्त्वाचे असतात. त्यावर बोलत राहतो आम्ही. पण आत्ता या उशीराबद्दल मला फार चिंता नाही. इथं काही मीटिंग वगैरे नाही. तर दोन तीन घरांत आम्ही जाणार आहोत. नुकतीच एक माहिती गोळा केली आहे आमच्या टीमने. ती काही घरांत जाऊन, तिथल्या लोकांशी बोलून आणि नंतर (आमच्या हाती असलेल्या) त्या घराच्या माहितीशी पडताळून पहायची आहे. म्हटलं तर एकदम सोपं काम - म्हटलं तर अवघड. पुढची मोटरसायकल थांबते. आमची गाडीही थांबते.

संस्कृतचे अनोखे अभ्यासक

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 13/02/2014 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत. आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत. त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक.

पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?

लेखक psajid यांनी गुरुवार, 13/02/2014 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे.

आय लव्ह यू (२)......

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 13/02/2014 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा: आय लव्ह यू .....http://misalpav.com/node/26966 रश्मीचा अचानक फोन आला आणि मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवल्या......... पुढे.
"ओक्के..... शुअर... बाय..... " अन तेच ते मस्त जीवघेणे स्माईल..... गोखले मास्तरांच्या क्लासमधे आज वसंत फूललाय. मस्त श्रावण बरसतोय....... शरदाचे चांदणे पसरलय. गोखलेसर " एच एफ ई./ एच आय ई, थॅरिस्टर , झीनर ब्रेकडाऊन करंट , करंट लिमीट " हे शिकवण्या ऐवजी ऐवजी एक बोट नाचवत "देवा कीती सुंदर आकाश सुंदर चांदणे चंद्र देई.सुंदर प्रकाश सूर्य देतो" शिकवताहेत. क्लास संपला.....

Autism - निदानानंतर..

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी गुरुवार, 13/02/2014 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
Autism.. स्वमग्नता.. ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये? Autism - लक्षणे व Evaluation ***** Developmental Pediatrician तुम्हाला तुमच्या गोड बाळाच्या थोड्या वेगळ्या वागण्याचे निदान 'स्वमग्नता' असे करतो तो नक्कीच पालकांच्या आयुष्यातील सोप्पा क्षण नसतो. पण हे सुद्धा खरे आहे कि बर्याचदा त्या वेळेस पालकांना काहीएक कल्पना नसते आपले पुढचे आयुष्य कसे असणार आहे?

मदिरा स्तोत्र

लेखक नेत्रा वैद्य यांनी बुधवार, 12/02/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
मद्य मदिरा सुरा दारु, प्रसिध्द नामांनी असे | तीन प्रहरी प्राशिता ती, गाढ निद्रा येतसे|| रिचविता ते पेग पेग, जडत्व कायेचे नुरे | चालतानां भूमीवरुनी, स्थिर पाऊल ना ठरे || होऊनी आरक्त नेत्र, जीभ जड ती होतसे | धरेवरती स्वर्ग उतरे, कि स्वतः स्वर्गी वसे || सुरवरांना सुरा प्रिय, अप्सरांचा सवे जथा | दुग्ध शर्करा योग ऐसा, मदिराक्षी सवे सुरा || जन्म त्याचा वृथा झाला, आनंदासी मुकला | एकच प्याला नाही, ज्याने कधी तो प्राशिला || वास्तवाची जाण येता,

उत्तरायण २०१४ - बडोदा ते पुणे (भाग ५ - समाप्त)

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/02/2014 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग १) उत्तरायण २०१४ - पुणे ते बडोदा (भाग २) उत्तरायण २०१४ - काsssssssssssssयपो छेssss (भाग ३) उत्तरायण २०१४ - अमुल डेअरी - आणंद (भाग ४) आणंदहून परतताना एके ठिकाणी EME AREA अशी पाटी दिसली. EME Temple हे ठिकाण बडोद्यात असताना भेट देण्याच्या ठिकाणांमध्ये होतेच.