Skip to main content

अकबराचा मोबाईल हरवतो

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 09/02/2014 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
अकबराचा मोबाईल हरवतो नेहमीप्रमाणे अकबर बादशाह दरबारात बसला होता. इतर सारे दरबारी आपाअपल्या खुर्च्यांवर बसले होते. दरबाराचे कामकाज चालू होते. नविन टॅक्स सिस्टीम कशी राबवायची, रेपो रेट कमी करायचा का नाही, आधार कार्ड स्कीम बंद करून नविन आयडेंटी कार्ड लागू करावे काय, अनुदानातले गॅस सिलेंडर, अभिनेत्री करूना कपुर हिला पद्मश्री पुरस्कार आदी बरेच विषय चर्चेला होते. एका दिवसात हे सारे विषय काही संपणारे नव्हते हे बादशाहाला अन बाकीच्या दरबार्‍यांनाही सवयीने माहीत झाले असल्याने टंगळमंगळ, विनोद करत चर्चा चालू होती. बिरबलाचे बादशाह अकबराकडे बारकाईचे लक्ष होते.

आय लव्ह यू........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 09/02/2014 02:16 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा : http://misalpav.com/comment/551311#comment-551311 ( पिवळा डांबीस काकाने प्रेरीत केलं त्यामुळे लिहायला घेतलं) फेब्रुवारी असूनही आज आकाश ढगाळलंय. कुंद म्हणता येणार नाही पण प्रफुल्लीत एकदम उत्साही. असं वातावरण असलं की कसं भाग्य फिदा असतं अशावेळेला दुधात साखर म्हणजे ऑफिसमध्ये क्लायंट ने मीटींगची डेट पोस्टपोन केलेली असावी.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 08/02/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रवीर्याची विचित्र कहाणी . चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने) यापूर्वीची कथा: कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १) मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) मदनकेतु उवाच: मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे? नारदमुनी उवाच: अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.

दुर्योधन,: महाभारतातला

लेखक शरद यांनी शनिवार, 08/02/2014 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ? श्री.मृत्युंजय यांचा दुर्योधनावरील लेख वाचून थोडी निराशा झाली.. रामायण व महाभारत हे आपले नुसते धार्मिक ग्रंथच नव्हेत तर सांस्कृतिक धन आहे. त्यावर आपले विचार अवष्य मांडावेत पण तसे करतांना " ग्रंथात असे आहे पण मला त्यातून हा अर्थ लावावा असे वाटते " असे लिहले पाहिजे. दुर्गा भागवत वा इरावती कर्वे या महाविदुषी देखील हाच मार्ग चोखाळतात. याने दोन गोष्टी साधतात. वाचकाला ग्रंथात काय आहे व मग तुम्हाला काय म्हणावयाचे आहे ते सापेक्ष कळते. नच, तुम्ही मांडता ते ग्रंथात आहेच अशी चुकीची समजुत होऊं शकते. श्री.

टोमॅटो भात

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शनिवार, 08/02/2014 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी मी तसा आळशी या सदरात मोडणारा,त्यांमुळे एक सोपी पाकृ ईथे देत आहे. भारतात वेगवेगळ्या प्रांतात भाताचे अनेक प्रकार प्रचलित आहेत त्यापैकी एक हा टोमॅटो भात. साहीत्य---शिजवलेला भात ,४ टोमॅटो,१ मध्यम आकाराचा कांदा ,कडीपत्ता,कोथिंबीर, थोडे शेंगदाणे,उडीद डाळ, मुगडाळ कृती--भात शिजवुन घ्यावा. (कालचा शिळा असल्यास उत्तम :) . दाणे व डाळ भिजत घालावी. कांदा व टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढीपत्ता, कोथिंबीर व ईतर तयारी करुन घावी. एका पातेल्यात (नॉन- स्टीक असल्यास बरे) तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर जिरे,मोहरी व हिंगाची फोडणी करावी.

"मोटो -जी" ची क्रेझ

लेखक उडन खटोला यांनी शनिवार, 08/02/2014 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं . अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १.

विन-विन सिच्युएशन का भ्रष्टाचार?

लेखक यसवायजी यांनी शनिवार, 08/02/2014 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
इथे चाललेल्या चर्चेवरुन परवाचाच एक भष्टाचार आठवला... शनि-रविवारी गावी गेलो होतो. आईने रयवार सक्काळ्-सक्काळी गादीतून ओढुन काढलं आणी "मुन्शीपाल्टीच्या शाळेत जा आणी आधार कार्ड काढुन घेउन ये. ज्जा." म्हणुन हाकललं. १० वाजता आंघोळही न करता, टी-शर्टवरच मी शाळेत हजर. पाहतो तो काय?? २ टेबलांवर अंदाजे ६०-६५ जणांच्या २ मोठ्या रांगा लागलेत. अर्धा तास रांगेत कंटाळून उभा राहिल्यावर मागच्या माणसाला माझा नंबर धरुन ठेवायला सांगुन पुढे टेबलाजवळ जाउन पाहिले.

तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का?

लेखक विदेशी वचाळ यांनी शुक्रवार, 07/02/2014 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का? असेलच ना? सगळ्यांनाच तसे ते आवडते. पण मला का कोण जाणे त्यात मोठी खीन्नता वाटते. माझ्यासाठी तारा हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे. ध्रुवाच्या त्या अढळ पणाचे प्रतीक म्हणजे तारा. माझ्या मुलींची बापा कडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा. माझ्या आईची मुलाकडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा. मला भेटायला येणारी प्रेयसी म्हणजे चांदणी, म्हणजेच तारा. मला माझ्या अनेक शिक्षका बद्दल असणारी भावना म्हणजे तारा. आपल्याला आपल्या आयुष्या कडून असणार्‍या अपेक्षा म्हणजे पण तारा. असा मी बराच वाहावत जाईन.

आज आसु मझ्या.....

लेखक पंडित मयुरेश नागेश्वरम देशपांडे यांनी शुक्रवार, 07/02/2014 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज आसु मझ्या डोळा आले ते पाहुन हसु तुझ्या ओठी आले क्वचितच घडते असे कधी कधी दुखावतो जेव्हा मीही अधी मधी कणखर म्हणवतो पुरुष आम्ही स्वतःस तरी अलगद फसतो अशाच हळव्या क्षणांस मग येतेस तु जवळ ठेवतेस डोक्यावर हात नकळत सांगुन जातेस आहेना माझी साथ मीही मग हसतो हलकेच श्वास सोडतो ठेवतो अलगद डोके ओंजळीत तुझ्या..... - कवी म. ना. दे.