नरेन्द्र दाभोलकरांच्या हत्येचे वृत्त हे मला त्याच्याशी वैयक्तीक ओळख नसली तरी व्यक्तीशः आणि एकंदरीतच सामाजीक स्तरावर अस्वस्थता आणणारे ठरले. जर समाजास (त्यात मी केवळ सामान्य माणूस धरत आहे, राजकारणी नाही) त्यातून खरेच अस्वस्थता आली असेल, तर तो महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे. २०१० च्या जर्मन बेकरीवरील दहशतवादी घातपातापेक्षाही पुण्यासारख्या शहरात घडलेली ही एकच हत्या जास्त गंभीर आहे असे कुठेतरी वाटते. हल्ल्यास भ्याड म्हणावे का थंड डोक्याने आखलेला कट हे काळच सांगेल.
या दुर्घटनेवर सर्वत्र लिहीले जात आहेत. आशा आहे की आरोपी आणि त्यांचे बोलविते धनी यांचा शोध लवकरात लवकर लागेल आणि त्यांना कायद्यानुसार जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल... ते होईपर्यंत यावर बोलण्यात अर्थ नाही असे वाटते. मात्र बातम्या-लेख-प्रतिक्रीया वाचताना ह्या ना त्या रुपात, हळहळी बरोबरच त्राग्याने एक गोष्ट लिहीली/बोलली जात आहे ती म्हणजे "पुरोगामी महाराष्ट्रास हे लांच्छनास्पद आहे." अथवा "महाराष्ट्राची पुरोगामीओळख संपली..." वगैरे वगैरे. पण जितका या घटनेनिमित्ताने गेल्या काही दशकांचा विचार करू लागतो तेंव्हा परत परत प्रश्न पडू लागतो की आज महाराष्ट्र आणि पर्यायाने आपण खरेच पुरोगामी आहोत का?
"पुरोगामी" म्हणजे जर "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince hoUna) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल" असा अर्थ असला तर स्वातंत्र्याच्या अलिकडे-पलीकडे विचार केल्यास महाराष्ट्रात नक्कीच अनेक पुरोगामी विचारवंत झाले, त्यांच्यामुळे बदल देखील झाले. पण गेल्या दिड-दोन दशकांचा विचार केल्यास आपण नक्की महाराष्ट्रात एक समाज म्हणून काय केले आहे ज्यामुळे आज आपल्याला पुरोगामी म्हणवून घेण्याचा हक्क आहे?
जातींवरील नुसतेच राजकारण नाही तर जातींचे पुनरुत्थापन आणि त्यातून सामाजीक द्वेष, बुवाबाबांचा केवळ सामान्यांवरच नाही तर राजकारणी आणि प्रथितयश आर्थिक उच्चवर्गावर वाढता प्रभाव, दुसरीकडे स्वतःला बुद्धीवादी म्हणत आणि इतरांना हिणवत "केवळ पाश्चात्यांची जीवन पद्धत स्विकारणे म्हणजेच अधुनिकीकरण आणि पुरोगामित्व", असे समजणारा स्वतःच्याच नशेत धुंद असलेला सुशिक्षित वर्गाचा एक भाग... सोशल मेडीयावरील जातीय ग्रूप्स, धर्माच्या / परंपरांच्या विरोधात असलेल्यांची केवळ तुच्छ लेखणारी, प्रत्येक गोष्टीस जुनी आहे म्हणून काय वाट्टेल ते करून चू़क ठरवणारी मुक्ताफळे असे बरेच काही बघायला सहज मिळू शकते.
मग नक्की आपण, म्हणजे सद्यस्थितीतील महाराष्ट्र, खरेच पुरोगामी आहे का? असलो तर नक्की कुठल्या संदर्भात? नसलो तर नक्की काय करायला हवे जेणे करून आपण समाज म्हणून पुरोगामी ठरू? का काही गरज नाही? Who cares! असे म्हणत, "ठेवीले अनंते" म्हणायचे आणि पोटा पाण्यासाठी. "मी एक मुंगी, तू एक मुंगी" म्हणत आयुष्य पुढे रेटायचे?

वाचने
4513
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण पुरोगामी आहोत काय...
व्याखेतच गडबड
ही फार संथ प्रक्रिया ...
घटना गंभीर असली तरी गमतीशीर वर्तन पहावयास मिळाले.
आपण खरेच पुरोगामी आहोत का?
पुरोगामी म्हणजे...
In reply to आपण खरेच पुरोगामी आहोत का? by मदनबाण
धन्यवाद
In reply to पुरोगामी म्हणजे... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा आवश्यकच.
In reply to धन्यवाद by विकास
पुरोगामी म्हणजे नक्की काय व
माझ्या मते...
In reply to पुरोगामी म्हणजे नक्की काय व by श्रीगुरुजी
सहमत
In reply to माझ्या मते... by विकास
'पुरोगामिन' (पाय मोडका न)
+
In reply to 'पुरोगामिन' (पाय मोडका न) by आतिवास
अवांतर
In reply to + by विकास
म्हणून तर
In reply to अवांतर by अर्धवटराव
माझ्या समजण्यात काहि गडबड होतेय का?
In reply to म्हणून तर by विकास
गडबडीबद्दल खुलासा
In reply to माझ्या समजण्यात काहि गडबड होतेय का? by अर्धवटराव
पुरोगामी" म्हणजे जर
पुरोगामी" म्हणजे जर "टप्प्याटप्प्याने असेल, पण मनापासून (convince hoUna) आत्मसात केला गेलेला चांगल्यासाठीचा स्वतःमधील/समाजामधील डोळस बदल" असा अर्थ असला तर स्वातंत्र्याच्या अलिकडे-पलीकडे विचार केल्यास महाराष्ट्रात नक्कीच अनेक पुरोगामी विचारवंत झाले, त्यांच्यामुळे बदल देखील झाले.बदलाची प्रक्रिया आर्थिक संपन्नतेवरुन अवलंबून असु शकेल. त्यातून भारतात त्याचा वेग कदाचित संथ असेल कारण बहुधर्म आणि बहुजातिनिष्ठ प्रथाविविधता.वाचते आहे
ही पुरोगामी ,प्रतिगामी काय
सावरकरान्चे पुरोगामित्व
आम्ही पुरोगामी आहोत अशी आमची