जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे.
"प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे.
अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे.
जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.
जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.
या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.
साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.
१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.
यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.
२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.
३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.
परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही
.......(अपूर्ण).........
- गंगाधर मुटे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
24914
प्रतिक्रिया
81
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे ह्या विषयावर अगदी
नरबळी साठी शिक्षा देण्यास सध्याचा कायदा सक्षम आहे
In reply to माझे ह्या विषयावर अगदी by पिलीयन रायडर
(No subject)
In reply to माझे ह्या विषयावर अगदी by पिलीयन रायडर
ह्याच विषयावर राजीव दीक्षित .
In reply to (No subject) by पुष्कर जोशी
वाचतोय. विंचु साप चावल्यानंतर
कोणाकडुन उपचार करुन घ्यायचा हे ज्या त्या व्यक्तीने ठरवावे, सरकार
In reply to वाचतोय. विंचु साप चावल्यानंतर by मृत्युन्जय
जे कोणी साप विंचू चावल्या वर
In reply to कोणाकडुन उपचार करुन घ्यायचा हे ज्या त्या व्यक्तीने ठरवावे, सरकार by प्रसाद१९७१
सरकार ने असले कायदे करण्यापेक्षा काहीतरी खरे उपाय करावेत.
In reply to जे कोणी साप विंचू चावल्या वर by गवि
प्रस्तावीत कायद्यमधील कलम क्र
विचार करायला लावणारा प्रतिसाद.
In reply to प्रस्तावीत कायद्यमधील कलम क्र by खटपट्या
थोडी दुरुस्ती
+१ सहमत! मी ही हेच म्हणतोय...
In reply to थोडी दुरुस्ती by सुहासदवन
तुमचा मुद्दा समजला. सर्प
शेतकर्यांचा, वारकर्यांचा
In reply to तुमचा मुद्दा समजला. सर्प by आदूबाळ
म्हणजे जास्त रेव्हेन्यु
In reply to शेतकर्यांचा, वारकर्यांचा by पिलीयन रायडर
म्हणजे जास्त रेव्हेन्यु
In reply to शेतकर्यांचा, वारकर्यांचा by पिलीयन रायडर
खरे च असे वाटते आहे का की अनिस किंवा दाभोलकरांमुळे कोणाची आर्थिक
In reply to शेतकर्यांचा, वारकर्यांचा by पिलीयन रायडर
ओक्के.. ते माझं मत झालं..
In reply to खरे च असे वाटते आहे का की अनिस किंवा दाभोलकरांमुळे कोणाची आर्थिक by प्रसाद१९७१
२ शक्यता
In reply to ओक्के.. ते माझं मत झालं.. by पिलीयन रायडर
>>> १. ह्या मागे राजकारण आहे.
In reply to २ शक्यता by प्रसाद१९७१
अजून एक
In reply to >>> १. ह्या मागे राजकारण आहे. by श्रीगुरुजी
सावरकरांनी सुरु आणि विसर्जित
In reply to अजून एक by विकास
+१
In reply to सावरकरांनी सुरु आणि विसर्जित by अगोचर
सावरकारानी बंद केलेली अभिनव
In reply to सावरकरांनी सुरु आणि विसर्जित by अगोचर
http://en.wikipedia.org/wiki
In reply to सावरकारानी बंद केलेली अभिनव by उद्दाम
दाभोलकरांचे कार्य केवळ
>>>>>अधिनियम लागू करायचा
बाकी, मंत्र तंत्राने विष
In reply to >>>>>अधिनियम लागू करायचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शाब्बास.
In reply to बाकी, मंत्र तंत्राने विष by प्रसाद१९७१
प्राथमिक उपचाराची सोय आहे, किमान वीस-पंचवीस किलोमिटरच्या परिघात
In reply to शाब्बास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to प्राथमिक उपचाराची सोय आहे, किमान वीस-पंचवीस किलोमिटरच्या परिघात by अनिरुद्ध प
एका माणसाच्या बोलण्याच्या
In reply to . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्स.
In reply to एका माणसाच्या बोलण्याच्या by प्रसाद१९७१
अवांतर
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर.
In reply to अवांतर by रामपुरी
सरकार ने शिक्षणाची दारे उघडुन दिली, पण सक्ती केली का शिक्षणाची
In reply to धन्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण सरकारचे दुसर्यांच्या
In reply to एका माणसाच्या बोलण्याच्या by प्रसाद१९७१
यात चूक काय आहे?
In reply to पण सरकारचे दुसर्यांच्या by आनन्दिता
मला वाटते तुम्हाला पण मी काय
In reply to पण सरकारचे दुसर्यांच्या by आनन्दिता
मला वाटते
In reply to एका माणसाच्या बोलण्याच्या by प्रसाद१९७१
+१
In reply to . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मालोजीराव
In reply to +१ by मालोजीराव
तुम्हाला आयुर्वेद आणि
In reply to शाब्बास. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सरकार जी घाई करतंय (आणि आधी
प्रश्न नव्हे राजकीय खेळी
रोम्युलस व्हिटेकर, निलीमकुमार
मुटे सरांचे आरोप खरोखरच
सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात?
In reply to मुटे सरांचे आरोप खरोखरच by धन्या
सरकारनी काही वैद्यकीय सुविधा
In reply to सरकारनी काही वैद्यकीय सुविधा पुरवली आहे का गावात? by प्रसाद१९७१
आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का? ती कशी चालते तुम्हाला
In reply to मुटे सरांचे आरोप खरोखरच by धन्या
आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी
In reply to आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी तपासली आहे का? ती कशी चालते तुम्हाला by प्रसाद१९७१
बी. ए. एम. एस. आणि बी. एच. एम
In reply to आयुर्वेद आणि होमिओपाथी तरी by धन्या
लेख पटलेला नाही
आतातायीपणा होत आहे
In reply to लेख पटलेला नाही by प्रसाद गोडबोले
चुकीचे समर्थन
हो ना....
In reply to चुकीचे समर्थन by कपिलमुनी
२) विंचू (इंगळी) - इंगळी
२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.मुटेसाहेब तुम्ही डॉक्टर हिम्मतराव बावस्कर नांव ऐकले आहे का..? इंगळी किती विषारी असते आणि त्याचे काय काय परिणाम होतात, किती मृत्यू होतात हे अनिल अवचटांच्या "कार्यरत" या पुस्तकामध्ये "विषावर उतारा" या लेखामध्ये वाचायला मिळेल. इंगळी मुळे होणार्या विषबाधेवरती उपचार करण्यामध्ये डॉ बावस्कर हे जगभरामध्ये "ऑथॉरिटी" मानले जातात. माझ्या मते - साप, विंचू व इंगळी चावल्यानंतरच्या तुम्ही दिलेल्या परंपरागत उपचारांना फारसा अर्थ नाहीये. आधुनीक विज्ञान शास्त्राकडे उत्तर नाही म्हणून परंपरागत उपचार करावेत हा आग्रह अयोग्य वाटतो.+१
In reply to २) विंचू (इंगळी) - इंगळी by मोदक
विषारी साप चावल्यावर वेळेच्या
Thanks. Doctor...!!!
In reply to विषारी साप चावल्यावर वेळेच्या by सुबोध खरे
+१
In reply to विषारी साप चावल्यावर वेळेच्या by सुबोध खरे
अण्णांना (निलीमकुमार खैरे
In reply to +१ by मालोजीराव
"साप चावतो तेंव्हा बर्याच
In reply to विषारी साप चावल्यावर वेळेच्या by सुबोध खरे
या प्रतिक्रिया मध्ये तुमचे उत्तर आहे.
In reply to "साप चावतो तेंव्हा बर्याच by रामपुरी
माहितीबद्दल धन्यवाद डॉ. खरे!!
In reply to विषारी साप चावल्यावर वेळेच्या by सुबोध खरे
कोरल स्नेक !
In reply to माहितीबद्दल धन्यवाद डॉ. खरे!! by मोदक
कायद्याचा सारांश
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
भाग १ विंचू .
थोडंसं अवांतर...
In reply to भाग १ विंचू . by जॅक डनियल्स
अतिशय
In reply to भाग १ विंचू . by जॅक डनियल्स
एक छोटीशी दुरुस्ती
In reply to भाग १ विंचू . by जॅक डनियल्स
धन्यवाद् ! थोडी चूक झाली.
In reply to एक छोटीशी दुरुस्ती by सुबोध खरे
.
मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे
मी नास्तिक आहे
In reply to मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे by प्रसाद१९७१
आणि तरीसुध्धा मांत्रिकावर
In reply to मी नास्तिक आहे by टवाळ कार्टा
लोकांना त्यांच्या मर्जी
In reply to आणि तरीसुध्धा मांत्रिकावर by प्रसाद१९७१
मुलांना शाळेत घालणे हे
In reply to मुद्दा सरकार व्ययक्तीक जीवनात हस्तक्षेप करत आहे हा आहे by प्रसाद१९७१
जादूटोणा-विरोधी कायदा या
हा हा
In reply to जादूटोणा-विरोधी कायदा या by ऋषिकेश