Skip to main content

मिपाचे नविन सदस्य

लेखक बरखा यांनी बुधवार, 05/02/2014 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता मिपाचे नविन सदस्या॑साठी मिपावरी नविन सदस्यत्व मिळाले अतिविचाराने मग लेख मि ट्॑कले प्रतिसादा॑चा हा पाउस पडला लेखाची मग खिल्ली उड्वुनी गेला| एक-दोन प्रतिसादा॑नी दिलासा तो मिळाला पुन्हा आमचा तो ट्॑कनाचा प्रयत्न सुरु झाला विचार करोनी मग लेख मी ट्॑कला प्रतिसाद न आले तया लेखनाला||:( ट्॑कनाचा मग नाद मी सोडिला केवळ वाचनात मी जीव गु॑तवला आवड्ले लेख तर प्रतिसाद मी दिला लेखाला न मिळाले एवढे प्रतिसाद त्याला||| :) धन्य हो मिपा आणि मिपाकरहो कधी घेति उचलुनी डोक्यावर हो तर कधी पाडती धाड्कन तो॑डावर हो|||| :( तरीही मिपा वाटे आपलेसे सख्या नात्याहुन ही घट्ट ईथली नाति करी चेष्टा मस्करी तरि न होई दुखी कोणी

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा

लेखक मराठी कथालेखक यांनी बुधवार, 05/02/2014 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
"दिल से निकलने वाली रस्ते का शुक्रिया... दिल तक पहुचने वाली हर डगर को सलाम" लता च्या आवाजातल्या या ओळी , "बाली उमरको सलाम" हे गाणं ऐकलं की मन वेगळ्याच विश्वात जातं. अनेक आध्या-अधू-या प्रेमकथा आठवू लागतातं. अनेकदा मनात आलं की या कथा एकदा लिहून काढाव्यात पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही. आता ते करावसं वाटतंय. अर्थात कितपत जमेल ते माहीत नाही. पण प्रयत्न करणार आहे. या सगळ्या मी जवळून पाहिलेल्या गोष्टी आहेत. (काही माझ्याही आहेत). सगळ्या अधू-या प्रेमाच्या. यात माझी कल्पनाशक्ती फक्त नावे बदलण्यापुरतीच वापरणार आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 05/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

दुर्योधन

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 05/02/2014 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:| विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत || अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे. एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले.

ओढ

लेखक psajid यांनी बुधवार, 05/02/2014 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले सूर्यकिरण त्याचे आसुसले नयन, रात्रभर पळाला तो धरणीस भेटण्याला ....... लहानशी कळी उमलतेय तळी, तिची धाव ती वृक्षास व्यापण्याला ....... नदीचे काठ जशी चांदण्यातली वाट, चालण्याचा योग परी आसुसली भेटीला ........ भिरभिरती नजर तिची धाव अवाक्यापर, काव्य धाव घेतेय निसर्ग पिण्याला ........ कशाची तरी ओढ हवी माणसाला, नाहीतर निष्फळ आयुष्य काय अर्थ जगण्याला ........ श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी पलूस, सांगली (महाराष्ट्र)

पाकिस्तान, दहशतवाद आणी सलोखा

लेखक यशोधन वाळिंबे यांनी बुधवार, 05/02/2014 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल नेहेमीप्रमाणेच एक घटना घडली, ज्याने बऱ्याच जणांना हुरूप मिळाला, तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना टीकेची संधी, मिडियाला चघळण्यासाठी बातमी, विश्लेषकांना विश्लेषणाची संधी, पाकिस्तानला पुन्हा जगापुढे भारताविरोधात बोटं मोडण्याची संधी, (अहो या सगळ्यात आमच्या तेंडूलकर भाऊंचा विषय राहिला बाजूला.. असो इंडीया फर्स्ट) तर आज शिवसेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या भारतातील सहभागावर निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. माझ्या मते, शिवसेनेची ही कृती म्हणजे एक अपरिहार्य पाऊल आहे.

माझा लोकलनामा :- भाग २

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/02/2014 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझा लोकलनामा:- भाग १
आपण सारे अर्जुन
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. याच लोकल ने मी ही प्रवास करतो, डब्यात चढलं नी पाठीवरची बॅग रॅकवर ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो, तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात.

रजा आणि विश्रांती

लेखक मन यांनी बुधवार, 05/02/2014 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
थकलात ? कंटाळलात? जरा विश्रांती घ्या. रजा घ्या. विश्रांती घेउन थकला असाल तरी विश्रांतीमधून विश्रांती घेउ नका.काम करायला लागू नका. फक्त अधिक विश्रांती घ्या. आराम करा. काम करुन लवकरच थकणार आहात. कामातील बदल ही विश्रांती असते असं गांधीजी म्हणतात. असं काही वाचण्यात आलं तर सर्वप्रथम तुमच्या वाचनाच्या सवयीत बदल करा. वाचनातून विश्रांती घ्या. मिळेल तिथून घ्या. ती फार काही केवढ्याला मिळेल असं नाही. तिची वेगळी थेट किंमत द्यावी लागत नाही. किंवा किंमत देउन विकत नेहमीच घेता येत नाही. तुम्हाला जे मिळताहेत ते सोडणं म्हणजेच विश्रांती. कामातून विश्रांती घेता तशी खाण्यातूनही घ्या.

पळसाला पाने तीन...

लेखक मारकुटे यांनी बुधवार, 05/02/2014 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे काही मित्र आमचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. आमचे म्हणणे एवढेच होते की बाबांनो संधी मिळत असली की कुणी सोडत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करतेच. कुणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करतोच. फार थोडे असतात जे बरबटत नाहीत. आणि ही वृत्ती केवळ कुठल्या वंशाशी, देशाशी वा जातीशी संबंधित नाही. माणुस जिथे आहे तिथे ही वृती आहे. पण नाही. विचारवंती झूल अंगावर पांघरली की जे काही भारतीय असेल ते तुच्छ मानावेच लागते असा काही दंडक आहे की काय कळत नाही.

हर दिल जो प्यार करेगा

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 04/02/2014 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही ‘कहो ना प्यार है’ यामधील ‘एक पल का जीना’ या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते.