विकासाची भारतीय संकल्पना..२
विकासाची भारतीय संकल्पना
...पण इच्छा पूर्ण कमी करता येणारच नाहीत ! शरीर आहे म्हणजे शरीर धर्म आहे आणि म्हनून त्याच्या किमान गरजा आहेत , वासना - कामना आहेत ! त्याचे " दमन " करता उपयोगी नाही तर त्याला निर्धारित आणि सुनियंत्रित वाट करुन द्यावी लागेल. त्याचे योग्य दमन करता आले नाही तर त्या " केला जरी पोत बळेचि खाली , ज्वाला तरी ती वरती उफाळे या न्यायाने वासना - कामना अधिकच चेतविल्या जातील !
आणि म्ह्णूनच त्यांचे निर्धारित आणि सुनियंत्रित व्यवस्थापन म्हणजे विवास संस्था आणि चार आश्रम !
यापूर्वी आपण पाहिले की पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये सुखाचा अथवा वैभवाचा विचार करताना उपभोगाची अधिकाधिक साधने आणि ती मिळावावीत म्हणून त्यासाठी लागणारा अधिकाधिक पैसा म्हणजे सुख अथवा वैभव !
मात्र भारतीय पूर्वसूरीनी जीवनाचा सर्वांगीण विचार केला होता आणि म्हणूनच त्यांनी सर्वंकष समाधान देणारी अशी परिपूर्ण जीवनपद्धती विकसित केली.
योगी अरविन्दानी यांवर मोठी मार्मिक टिप्पणी केली आहे, ते म्हणतात ..
१. प्रत्येकाला त्याच्या मगदूराप्रमाणे काम असावे , त्याचा त्याला सुयोग्य मोबदला मिळावा.
२. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा अशी सामाजिक परिस्थिती असावी. ( सामाजिक सुरक्षा)
३. मिळालेल्या मोबदल्याचा उपभोग घेता यावा इतका पुरसा वेळ त्याच्याकडे असावा.
४. अशी स्थिती असेल तर ताण विरहित सुखी जीवन तो जगू शकेल.
यापैकी प्रत्येक मुद्द्यावर आजची भारतीयांची स्थिती {जे पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करतात} पाहता काय दिसते ?
१. आपण सारे जण आपले जन्मजात कौशल्य विसरून गेलो आहोत. "कारागिर" लयाला जाऊन "कामगार" निर्माण झाले आहेत. आमचा मगदूर विसरुन गेला असून आमची सृजनशक्ती नष्ट झाली आहे. मोबदला सुयोग्य असला तरी कमीच आहे असेच आम्हांला वाटते, कमी कामाचा अधिक मोबदला ही आमची वृत्ती होत चालली आहे.
२. मिळालेल्या सुखाचा उपभोग आम्ही घ्यावा अशी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आज नाही.कष्टाने मिळवलेले सोने -नाणे आपण अंगावर घालून सुखाने फिरु शकत नाही.
३.वेळ ? तेवढे सोडून बोला. पैसे मिळवण्याच्या नादात आमच्याकडे वेळच नाही.आम्ही विकांत सुद्धा टाकणं टाकल्यासारखा टाकतो..(मला त्या परिस शोधणार्या तरुणाची गोष्ट आठवते. परिस शोधायचा म्हणून तो समुद्र किनार्यावरचा प्रत्येक दगड गळ्यातील लोखंडाच्या साखळीला लावून पहात असे व सोने झाले नाही म्हणून फेकून देत असे. या कंटाळवण्या प्रक्रीयेत सारा दिवस संपून जातो आणि आता थकून परतावे म्हणून तो साखळी काढून हातात घेतो , तो ती केव्हाच सोन्याची झालेली असते !] असे कितीतरी परिस आपण न कळत फेकून देत असतो.
४. आणि या सार्या धावाधावीत आम्ही शारिरिक आणि मानसिक ताणाचे शिकार झालो आहोत.
कचकड्याच्या अशा खोट्या सुखाचाच आपण पाठलाग करत आहोत हे आपल्या सहज ल़क्षात येते..
सुखाची भारतीय संकल्पना ही नव्हे ! एकात्म सुख हीच सुखाची भारतीय संकल्पना होय !
एकात्म सुख
"मी" म्हणजे कोण याचा शोध घेत गेल्यावर प्राचीन भारतीय तत्ववेत्त्याना असे लक्षात आले की, हे फक्त "शरीर अथवा इंद्रिये " म्हणजे मी नव्हे , त्याचबरोबर " मन " आहे, त्या मनाच्या पलिकडे " बुद्धी" आहे आणि बुद्धीच्याही पलिकडे "आत्मा" आहे ! या सार्याला मिळून "मी" म्हणतात.
माझा आनंद, माझे सुख म्हणजे माझ्या शरिराचा+ मनाचा+ बुद्धीचा+आत्म्याचा आनंद ! आणि हे सारे कप्पेबंद नसून एकमेकांत विलक्षण मिसळलेले आहेत, शरिराचा अथवा मनाचा असा स्वतंत्र आनंद अथवा सुख उपभोगता येत नाही !
सुग्रास भोजनाचा आनंद घेत असताना, आप्त अत्यवस्थ असल्याची बातमी समजली तर सुग्रास भोजनाचे सुख लाभेल काय ?
लता मंगेशकरांचा आवाज ऐकल्यावर, एखादी सुंदर कविता वाचल्यावर होणारा आनंद , वाट्णारे सुख आपले डोके दुखत असताना अथवा पोटात तीव्र दुखत असेल तर घेता येईल का ?
बुद्धीचा आनंद म्हणजे सृजनाचा आनंद ! मन अस्वस्थ असेल तर आपण लतादिदीसारखे गाण्याचा प्रयत्न करु काय ? ल्रेख लिहिण्याचा प्रयत्न करु काय ?
आत्म्याचा आनंद म्हणजे आनंद वाट्णे.. आपल्या एखाद्या कृतीने एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण करणे !
आत्मनो मोक्षार्थ जगदहितायच !
सुखाची चढती भाजणी
आपल्या असे लक्षात येईल की , शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक सुख देणारे ( सुखाची मात्रा ) आहे.
आपल्या असेही लक्षात येईल की,शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे अधिक काळ टिकणारे ( सुखाचा कालावधी) आहे.
पुढे जाऊन असेही म्हणता येईल की, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.
मात्र, शरिराच्या सुखापेक्षा मनाचे सुख आणि मनाच्या सुखापेक्षा बुद्धिचे आणि आत्म्याचे सुख हे कमी साधनसामुग्री लागणारे( सुखासाठी लागणारी साधन सामुग्री ) आहे.
तसेच, सुखाची गरज मात्र उतरत्या भाजणी प्रमाणे आहे.भूक लागल्यावर आपोआप जाणीव होते, वयात आल्यावर योग्य ती प्रेरणा होऊन मनुष्य सुखाच्या शोधार्थ निघतो आणि तसा प्रयत्न करतो. मनाच्या आणि त्याही पेक्षा बुद्धीच्या आणि आत्म्याच्या सुखासाठी तशी गरज सामान्यपणे होत नाही , त्यासाठी तश्या प्रकारे सुसंस्कारित झालेला मनुष्य असावा लागतो !तरच ती प्रेरणा निर्माण होईल.
थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे !
(क्रमशः)
वाचने
9312
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
क्रमश
वाचत आहे...
लेख आवडला
.
आत्म्याचे सुख हे कमी कष्टात अधिक मात्रेत सुख ( सुखाचे फल ) देणारे आहे.एक प्रश्न पडतो. कमी कष्टात असेल तर राजा विश्वामित्राचा ब्रह्मर्षि विश्वामित्र बनताना त्याला एवढे कष्ट का पडले ?In reply to . by आशु जोग
नेमका संदर्भ
In reply to नेमका संदर्भ by विटेकर
.
वाचत आहे
रोचक. पण ...
In reply to रोचक. पण ... by आतिवास
काहीसा सहमत .. पण
In reply to काहीसा सहमत .. पण by विटेकर
भारतीय " विचार " आणि "व्यवहार
In reply to भारतीय " विचार " आणि "व्यवहार by बॅटमॅन
पाश्चिमात्यांशी संपर्क
पाश्चिमात्यांशी संपर्क येण्याअगोदरही आत्मविस्मृती होतच होती.हे मान्यच आहे म्ह्णून मी आत्म विस्मृती " आणि " अंधानुकरण असे म्हंट्ले आहे. धर्माला पुनः पुन्हा ग्लानी येते हे तर स्वतः भगवंताने सांगितले आहे तेव्हा तुमच्या पिरिऑडिक मुद्द्याशी सहमत!ही लवचिकताच आपला यूएसपी आहेहे ही मान्य ,पण त्यामुळेच अपप्रवृत्ती शिरल्या कारण त्यातला " विवेक " हरवला. सरसकट नव्हे पण त्याने दिर्घ कालीन परिणाम झाले हे ही खरे.In reply to पाश्चिमात्यांशी संपर्क by विटेकर
पण त्यामुळेच अपप्रवृत्ती
In reply to पण त्यामुळेच अपप्रवृत्ती by बॅटमॅन
विवेक विरुद्ध लवचिकता
In reply to विवेक विरुद्ध लवचिकता by विटेकर
सहमत!
In reply to सहमत! by बॅटमॅन
जस्ट टू अॅड
In reply to जस्ट टू अॅड by प्रसाद गोडबोले
(No subject)
In reply to जस्ट टू अॅड by प्रसाद गोडबोले
.
In reply to काहीसा सहमत .. पण by विटेकर
उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा
उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा विवाह होत नाही तोपर्यन्त भाऊ अविवाहित राहतो हे त्यागाचे परिणामी आत्मिक सुखाचे उदाहरण आपल्या आजूबाजूला आपण आजही पाहतोच ना ?याच्या विपरीतही उदाहरणे पाहण्यात आहेत; आणि त्यात (थोरल्या भावाने बहिणीच्या विवाहाआधी स्वतः विवाह करणे) माझ्या मते काहीही गैर नाही! शिवाय समजून-उमजून मूल्य पाळणे आणि रुढी-परंपरा - 'लोक काय म्हणतील' म्हणून - एखादा रीतीरिवाज पाळणे यात फरक आहे. कोण नेमके कशामुळे अमूक एखादा व्यवहार करत आहे हे समजून घेणे अवघड आहे. नि:स्वार्थीपणाचा, त्यागाचा विचार नि:स्वार्थी आणि त्यागी लोक बहुसंख्य असलेल्या समाजात सांगायची वेळ येत नाही असा एक अंदाज आहे. ज्याअर्थी इतके 'विचार' सांगावे लागले त्याअर्थी त्याची गरज त्या काळच्या समाजधुरिणांना भासली असावी. (या विधानाचा व्यत्यास खरा नाही - म्हणजे विचार सांगितले नसतील तर तसा सगळ्यांचा व्यवहार असेलच असे नाही!! :-)' क्रिटिकल मास' तयार होणे ही एक प्रक्रिया आहे. शिवाय एका भारतीय समाजात किती समाज आहेत - हे पाहिले की वेगळे चित्र दिसते . चांगले-वाईट लोक सर्वच समाजांत, सर्वच काळात असतात. परिस्थितीवश कुणाचे प्रभावक्षेत्र जास्त आहे हे ठरते. ही परिस्थिती ठरण्याला मूल्येही कारणीभूत ठरतात - इतका संबंध नक्कीच आहे. पण आता हे विषयांतर होते आहे - म्हणून थांबते. मी पुन्हा नमूद करते की चांगल्या विचारांना आणि भारतीय विचारप्रणालीत ते सांगितले गेले आहेत याविषयी काही दुमत अथवा आक्षेप नाही.In reply to उदाहर्णार्थ .. आपल्या बहिणीचा by आतिवास
पूर्ण प्रतिसादाशी सहमत.
In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत. by बॅटमॅन
साहेब
"एक महत्त्वाची गोष्ट म्हंजे "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" केला जातो बहुतेकदा. अन तोच खरा व्हर्च्यू म्हणून कवटाळल्या जातो, वरिजिनल नेसेसिटी संपल्यावरदेखील. पण हे सांगणे म्हंजे तात्कालिक नेसेसिटीदेखील नजरेआड करणे असा सूर प्रंप्राभिमान्यांकडून लावला जातो., जे चूक आहे.नीट मराठीतुन समजावुन सान्गाल का?In reply to पूर्ण प्रतिसादाशी सहमत. by बॅटमॅन
...
थोरल्या भावंडाआधी धाकट्याने लग्न करणे किंवा एका बहिणीचे लग्न झालेले नसताना भावाने लग्न करणे यात.....हे केवळ सामान्य त्यागाचे उदाहरण म्हणून घेतले ! त्या रुढीचे अथवा परंपरेचे ( अशी प्रथा असलीच तर ) उदात्तीकरण करावे असा हेतु नव्हता. त्यागामुळे मिळणारा आत्मिक आनंद असा असतो असे सांगण्यचा तो प्रयत्न होता. याऐवजी महात्मा गांधीनी समाजासाठी केलेला त्याग अथवा सावरकर घराण्याने केलेला त्याग हे उदाहरण घ्यावे. पुराणातील उदाहरण द्यायचे झाले तर दधिचीचे अथवा शिबी राजाचे घ्यावे. इतिहासातील उदाहरण घ्यायचे तर फतेसिंग- जोरावर सिंग आहे. सध्याचेच घ्यायचे तर आमटे परिवार अभय बंग ही उदाहरणे आहेत. फार मोठी उदाहरणे न देता, आजूबाजूची उदाहर्णे द्यावीत म्हणून हे उदाहरण दिले होते. मुद्दा हा आहे की. त्यागातून मिळणारे आत्मिक समाधान !In reply to ... by विटेकर
मुद्दा हा आहे की. त्यागातून
In reply to मुद्दा हा आहे की. त्यागातून by बॅटमॅन
.
In reply to . by उद्दाम
पण त्याच्याकडे नाही, म्हणून मीही माझ्याकडचे पैसे टाकून देऊन
In reply to . by उद्दाम
हा हा.
In reply to . by उद्दाम
म्हणूनच म्हटले, की ते उदाहरण
विश्वामित्र.....
रोचक मालिका.
In reply to रोचक मालिका. by सस्नेह
स्टिफन कोवे
'मूल्ये' ही समाज, काल, सुबत्ता यांच्याप्रमाने बदलत आली आहेत. आजच्या समाजासाठी कालची मूल्ये स्वीकारार्ह असतीलच असे नाही." Values are like Lighthouses! It is you who break them and not the lighthouse !!" - 7 Habits of Highly effective people Chapter 1 - Character & Personalityहं.
In reply to हं. by उद्दाम
लेख आवडला. पण पाश्चात्यान्नी
सुखाचे गणित
...
पूर्तेच्छा व सर्वेच्छांचे गुणोत्तर ही सुखाची व्याख्या तितकीशी 'पूर्ण' नाहीही व्याख्या पूर्ण नसेल ही पन मग सुखाची पूर्ण व्याख्या काय आहे ? १ आणि २माणसाच्या इच्छा इतक्या जास्त असतातआणिसुखविषयक इच्छा करण्याची माझी क्षमता सिमित आहे???? सूज्ञ आणि प्रांजळ ची व्याख्या काय ? आणि सर्वच सूज्ञ आणि प्रांजळ माणसे सुखी असतात का ? याचा व्यत्यास सर्वच सुखी माणसे सूज्ञ आणि प्रांजळ असतात का ? ३.सुख हे जाणिव असे पर्यंत असते, स्मृती असेपर्यंत नाही.म्हणजे नीट उलग्डून सांगाल का ? ( कॉलिंग संक्षी.. साहेब तुमचा प्रांत सुरु झालाय ) ४. माझ्या समजुतीप्रमाणे " एकक " आणि "व्याख्या" अशा स्वरुपात मांडण्याचे हे गणितच नव्हे ! माझ्या लेखात जे सूत्र सांगितले ते विषय ध्यानात यावा म्हणून !त्या प्रमेयाची सिद्धता करण्यापेक्षा ते विषय समजण्याच्या द्रूश्टीने अंगुलीनिर्देश करते - शाखा -चंद्र न्यायाप्रमाणे ! शाखा सोडा - चंद्र ध्यानात घ्यावा. आणि लघुशंका करण्याचे सुख शारिरिक तर घर बांधण्याचे सुख मनाचे आणु बुद्धीचे सुख , त्याची बरोबरी कशी होईल? एकक एकच असला तरी वेक्टर वेग्वेगेळे आहेत. आणि हे लॉजिकल नाही सायकालॉजिकल आहे ! ५. पुन्हा तेच ! तुम्ही गणित मांडत आहात .. येथे फजी लॉजिक (मराठी शब्द ??) चालते बायनरी नाही.० किंवा १ असे उत्तर मिळणार नाही, सारेच सापेक्ष आहे. ६. निरिच्छ माणूस हीच सुखाची अंतिम अवस्था आहे. निरिच्छ म्हणजेच इच्छा नसलेला, ज्याचा छेद शून्य आहे ,त्याचे सुख अनंत ( इन्फिनिटी) ७. अन्य एकात्म म्हणजे सर्वसमावेशक ! एकात्म शब्द असलेल्या या लिंक पहाव्यात. ekaatma upachaar ekaatm maanavi darshanसुख हे जाणिव असे पर्यंत असते, स्मृती असेपर्यंत नाही!
एकत्त्वाचा बोध म्हणजे नक्की काय?
विवेक आणि लवचिकता
एकत्त्वाचा बोध म्हणजे नक्की काय?