मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात.
पण गेल्या काही दिवसात माध्यमांमधील पक्षपातीपणा अचानक नागडेपणाने समोर येवू लागला आहे. असं मला वाटतं. सकाळ ने घेतलेली राष्ट्रवादीची सुपारी आपण सगळेच ओळखून आहोत, म्हणजे असावोत (काल सलग तीन मोदींच्या बातम्या होत्या सर्व बातम्यांवर कोंग्रेसी चाप असूनही 'लाइक्स' चे प्रमाण अचंबा वाटावा इतके मोदींच्या बाजूने. बहुतेक म्हणूनच तासाभरात सर्व प्रतिक्रिया आणि लाइक्स वगैरे वगळून 'रिफ्रेश' मारल्यासारखा ई-पेपर दिसू लागला !). पण हल्ली जो सरळसोट खुला 'प्रोपागांडा' (हि हि...असो,) वाटावा असा प्रकार लोकसत्ताचाही चालू आहे त्याने खचितच वाईट वाटले. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि मी जरी भाजपचा (मोदींचा) समर्थक असलो तरी गिरीष कुबेरांचे अग्रलेख मला आवडतात. त्यांच्या लिखाणात मोदींबद्दल थोडासा कडवट भाव असूनसुद्धा वास्तवाला स्वीकारण्याची भूमिका असते. नियोजन आयोगाच्या आकड्यांवर आधारभूत भूमिका घेऊन 'महाराष्ट्रच गुंतवणुकीत नंबर वन' या सिएम च्या विधानावर त्यांनी अग्रलेखात कडक फटके टाकले होते हे आपल्यापैकी काही लोकांना आठवत असेल. पण कालच्या 'दंगल आवडे सर्वांना' या अग्रलेखात सरळ सरळ भाजपवर आरोप झालेले आहेत ! या दंगलीचा आणि अमित शहांना प्रभारी नेमण्याचा त्यांनी सरळ दंगलीशी समंध लावला आहे*. आज राहुल'जीं' च्या मोदिंवरील बुळबुळीत टीकेला 'कडाडणे' वगैरे विशेषणे बहाल केली आहेत**. आणि यासारख्या अनेक उदाहरणातून या सगळ्याला एक दिशा आहे असे जाणवू लागले आहे. हा एक षड्यंत्र सिद्धांत काहींना वाटू शकतो, मलाही सुरुवातीला हेच फिलिंग होते पण माध्यमांच्या धोरणात झालेला बदल ठळक आहे. प्रसून जोशी हा मनुष्यविशेष मला परवापर्यंत जरा 'सुलझा हुवा' वाटत होता...पण दाभोलकर हत्येनंतर याने च्यानलावर आणि त्याच्या चेपुवर जो काही वैचारिक जुलाब केलाय त्याने याच्या पत्रकार म्हणून लायकीवर संशय यावा. हल्ली हगल्या मुत्ल्याचाही जो ताणून कुंथून मोदीशी समंध लावला जात आहे त्याला बुरखाही ('मुखवटा' या अर्थाने- मोदींचे समर्थकांना अखंड सावध राहावेच लागते.) नेसवत नाहीयेत हि मंडळी. इतका टोकाचा विरोध का ? या प्रश्नाने बरेच दिवस माझे डोके खाल्ले होते...२००२ वगैरे मध्ये काही तथ्य नाही हे तर आता साक्षात काँग्रेस च्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने बसवलेल्या समितीने स्पष्ट केले. भट्टाचेही आरोप राजकीय दृष्टीने प्रेरित होते, त्याला राजकीय फूस होती हेही सांगितले***. वांजाराला तर सीबीआय नेच हाड म्हटले****. असे सगळे होवूनही स्वकियांचाच मोदींना विरोध? हे काही पटत न्हवते आणि 'हा' लेख वाचनात आला. त्याचे भाषांतर(लायकीनुसार केलेले)खाली देत आहे. यात तथ्य असावे असे वाटते आहे.
An outsider in a private club by Tavleen Singh.
मोदींचे कालचे भाषण हे मोदींच्या ऐवजी राहुल गांधींनी दिले असते तर राहुल हे देशाची तेजपुंज 'आशा' ठरले असते. जर ते भाषण लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिले असते तर भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ काही काळ विसरली जावून कदाचित थोडा आशावाद निर्माण झाला असता. एवढेच काय तर देशातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी तेच भाषण केले असते तर राजकीय पंडितांनी ते लक्षपूर्वक ऐकले तरी असते. पण केवळ भाषण मोदींनी केल्यामुळेच त्यावर टीका होणे अपरिहार्य होवून गेले. भाषणातले त्यांचे मुद्दे तर चोख होते म्हणून मग मूळ भाषणावर चर्चा, टीका करायची सोडून काहीतरी तिसरेच बोलून त्यांना निशाण्यावर धरणे हे गरजेचे झाले. मोदींना स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधानांना झाकोळून टाकण्याची गरज काय होती? एक लक्षात घेणे महत्वाचे आहे कि, स्वातंत्र्यदिनाची जादू हळूहळू ओसरत जावून तो दिवस आता सरकार दरबारी उपचारमात्रच उरला आहे. या दिवसाला स्फूर्तीदायक भाषणे देणारे नेते आपल्याला हवे आहेत पण हि कल्पना मोदींना सुचली याने काही लोकांना मिरची झोंबली. ती इतकी कि त्यांचे पूर्वाश्रमीचे राजकीय गुरु, अडवाणी यांनीही त्यांना 'या दिवशी तरी नेत्यांनी टीका टाळली पाहिजे' असे सुनावले. काय कारण??
शिवाय असे म्हणून अडवाणी लगेच राष्ट्रपती भवनात सोनियांच्या सोबतीत चहापानाच्या कार्यक्रमाला गेले. ही घटना विशेषेकरून मला विचारप्रवण करते. या मंथनातून मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे कि दिल्लीतल्या तारांकित नेत्यांना मोदी हे घोड्यांच्या शर्यतीत रेडा घुसवल्यासारखे खुपतात. मोदी (त्यांच्या दृष्टीने) 'चुकीच्या' वर्गातून (class) आणि जातीतून आलेत, त्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येत नाही, भारतातल्या महनीय घराण्यावर टीका करण्याची त्यांची हिम्मत होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातल्या तथाकथित समाजवादाला आणि सर्वधर्मसमभावाला ते कवडीत मोजतात.
समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव या दोन कल्पना लुत्येन दिल्ली मधल्या वलयांकित भागात ज्यांची उठबस असते अशा लोकांना अतिशय पवित्र अशा आहेत. सर्वच उच्च राजकीय नेत्यांना किंवा महत्वाच्या संसदीय महारथींना या पंचतारांकित 'क्लब' मध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. तुम्हाला राजकीय राजपुत्र असणे किंवा थंड हवेच्या रमणीय ठिकाणांहून इंग्रजी भाषेत तुमचे वलयांकित शिक्षण झालेले असणे या गोष्टी सहज वाजतगाजत प्रवेश मिळवून देतात. अशा वातावरणातून आलेल्या हुच्च लोकांना इथले नियमही समजण्यास सोपे जातात. त्यातला एक अधोरेखित नियम म्हणजे सेक्युलर आणि लिबरल मते'च' व्यक्त करायची असतात आणि महनीय घराण्याबाबत उगी राहावयाचे असते.
असे उगी राहिले कि कौटुंबिक लोकशाहीमुळे अतिशय स्पष्ट दिसणारी हानी देशाला होत असूनही माध्यमांमध्ये त्याचा गवगवा होत नाही.
अशा क्लाबांचे तुम्ही एकदा सभासद झालात तुम्हाला जवळजवळ रोजच अलिशान बंगल्यांमध्ये किंवा हॉटेलांमध्ये डिनर पार्ट्यांची अवताणे येवू लागतात. संसदेत एकमेकांच्या धोतराच्या चिंध्या करायला सरसावलेले वेगवेगळ्या पक्षातले लोक वर्गामित्रांसारखे गळ्यात गळे घालून मेडीयामधल्या धुरिणांना आपल्या बोलण्यात 'ऑफ द रेकॉर्ड' सामावून घेत असतात. एखाद्या माझ्यासारख्या मुर्ख माणसाने या क्लबांचे नियम मोडले कि मणिशंकर अय्यर सारख्या अतिशय मोठे थोबाड असलेल्या गांधी घराणे भक्त माणसाला माझ्यावर सोडले जाते. असो, विषयांतर होते आहे.
या स्तंभाच्या शब्दमर्यादेमुळे मी इथे एकच मुद्दा नोद्वू शकतो आणि आजच्या आठवड्यातला तो मुद्दा हा आहे कि मोदींच्या बोलण्यातले मुद्दे त्यांना गोत्यात आणत नाहीत, गुजरात दंगलींच्या वेळेस त्यांनी जे केले किंवा नाही केले तेही त्यांना अडचणीत आणत नाही कारण १९८४ च्या नंतर राजीव गांधी सुद्धा स्वीकार्ह्य राहिले होतेच. नरेंद्र मोदींचे नरेंद्र मोदी असणे हीच त्यांची समस्या आहे.
ते भारतातल्या एका अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करतात कि जो वर्ग ल्युतेन दिल्लीतल्या या क्लबांपासून काळजीपूर्वक बाजूला ठेवला गेला आहे. कारण हा रांगडा, चिडलेला आणि अतिशय मनस्वी असा वर्ग या पंचतारांकित खासगी क्लबांचे अस्तित्व जुमानितच नाही. याच वर्गाच्या बंडामुळे ब्रिटिशांनी जन्माला घातलेल्या आणि सर्व भारतातल्या राजकीय सत्तेच्या चाव्या जवळ असलेल्या बंद भिंतीतल्या साहेबी थाटांवर गंडांतर येण्याचा धोका तयार होत असतो. हा धोका या इंग्रजाळलेल्या धुरिणांना सध्या अस्वस्थ करतो आहे.
साहजिकच, काँग्रेस पार्टीतल्या सर्व हालचाली सध्या मोदींना दिल्लीपासून दूर ठेवायच्या दृष्टीनेच चालू आहेत. आणि या हालचालींना भाजपमधल्या सर्वोच्च नेत्यांचीही साथ मिळत आहे. त्यामुळेच काल पर्यंत बाबरी मशिदीच्या पतनाला कारणीभूत ठरलेले अडवाणी काँग्रेस ला अचानक 'मध्यममार्गी' मवाळ वाटू लागले आहेत. प्रत्यक्षात सर्वांनाच, कदाचित खुद्द अडवाणींना सुद्धा हे माहितीये कि जर याही निवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचाराची सूत्रे अद्वानिन्च्याच हातात राहिली तर भाजप पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधी पक्षात बसेल पण निदान त्यामुळे त्यांना मोदींपासून दिल्लीतल्या क्लबांच्या भिंती तरी सुरक्षित ठेवता येतील.
--तवलीन सिंग, द इंडिअन एक्स्प्रेस. Sun Aug 18 2013, 05:45 hrs
* http://www.loksatta.com/sampadkiya-news/the-real-story-behind-muzaffarn…
** http://www.loksatta.com/desh-videsh-news/rahul-gandhi-slams-narendra-mo…
*** http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sanjeev-bhatt-forged-evid…
**** http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Vanzaras-letter-has-only-…
वाचने
13562
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक शन्का
मोठीच चूक, स्वारी !!
In reply to एक शन्का by महेश_कुलकर्णी
+१
In reply to एक शन्का by महेश_कुलकर्णी
अजुन एक
येस धन्स
In reply to अजुन एक by तिरकीट
घरचा आहेर
२७ ऑगस्टला कोर्टात काय झाले
In reply to घरचा आहेर by उद्दाम
:)
In reply to २७ ऑगस्टला कोर्टात काय झाले by llपुण्याचे पेशवेll
.
खरंय...
In reply to . by आशु जोग
.
In reply to खरंय... by तिरकीट
>
In reply to . by आशु जोग
.
In reply to > by देवांग
...
In reply to . by आशु जोग
मोदी यांचे टीकाकार त्यांचे
सर्वसाधारण पणे
In reply to मोदी यांचे टीकाकार त्यांचे by पिंपातला उंदीर
समर्थन आंधळे कि डोळस हे या
In reply to मोदी यांचे टीकाकार त्यांचे by पिंपातला उंदीर
मी कधि म्हन्तल की तुम्ही
In reply to समर्थन आंधळे कि डोळस हे या by इष्टुर फाकडा
आलं लक्षात !
In reply to मी कधि म्हन्तल की तुम्ही by पिंपातला उंदीर
बाकी जनरलायझेशनच करायचे असेल तर काय म्हन्ना नाय आमचा
In reply to समर्थन आंधळे कि डोळस हे या by इष्टुर फाकडा
न उलगडलेले कोडे
In reply to मोदी यांचे टीकाकार त्यांचे by पिंपातला उंदीर
हात तिच्या ! तुम्ही
In reply to न उलगडलेले कोडे by क्लिंटन
कै च्या कै
In reply to हात तिच्या ! तुम्ही by पिंपातला उंदीर
.
In reply to कै च्या कै by क्लिंटन
मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी
In reply to न उलगडलेले कोडे by क्लिंटन
+१
In reply to मला एक प्रश्न नेहमी पडतो मोदी by बॅटमॅन
सुधारणा
In reply to +१ by क्लिंटन
तुमचे टंकन श्रम फुकट आहेत.
In reply to सुधारणा by क्लिंटन
चांगला लेख..
अव तस
In reply to चांगला लेख.. by चिगो
राजकारणाची इनसायडर स्टोरी !
.................
ह्या काथ्याकुट
वेगळा विचार
+१
सुमार 'घेत'करी परंपरा अबाधित
.
:)
लेखातील भावना आवडल्या पण
वाजपेयी हे नेमस्त, व्यवस्थेला
In reply to लेखातील भावना आवडल्या पण by निनाद मुक्काम …
||सध्या भारतात दाढ्या
सहमत
In reply to ||सध्या भारतात दाढ्या by मंदार कात्रे
.
In reply to सहमत by मंदार कात्रे
चेतन कुलकर्णी यान्चेशी सहमत
In reply to . by आशु जोग
फाकडा साहेब
निनाद, लेख माझा नाही.
मुद्दा
>>> कट्ट्र देशभक्तीसाठी आपण
In reply to मुद्दा by लिओ
माध्यमे मेडिया क्रुक्स ब्लॉग वाचनीय
लिंक चुकली
In reply to माध्यमे मेडिया क्रुक्स ब्लॉग वाचनीय by कापूसकोन्ड्या
जबरदस्त लेख आहे. तिस्ता
In reply to लिंक चुकली by कापूसकोन्ड्या