Skip to main content

नाचणीचे झटपट डोसे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 21/02/2014 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी नाचणीचे पीठ १/२ वाटी तांदळाची पिठी १ हिरवी मिरची बारीक चिरून ५-६ कढीपत्ता बारीक चिरून बारीक चिरलेली कोथींबीर मीठ चवीनुसार . पाकृ: नाचणीचे पीठ, तांदळाची पिठी, चिरलेली मिरची, चिरलेली कोथींबीर, चिरलेला कढीपत्ता व मीठ एकत्र करावे. त्यात थोडे-थोडे करून पाणी घालून घावने / नीर डोश्याप्रामाणे पातळ मिश्रण बनवावे. (ताकात भिजवले तरी चालेल) नॉन-स्टीक तवा गरम करायला ठेवावा व डावाने मिश्रण तव्यावर ओतावे. (घावनाप्रमाणे मिश्रण ओतावे, नेहमीच्या डोश्याप्रमाणे वाटीने पसरवायचे नाही.) थोडे तेल सोडून हलकेच काढावे. . गरम-गरम डोसे नारळाच्या, लसणीच्या चटणीबरोबर किंवा लोणच्याबरोबर सर्व्ह करावे. .

वाचने 13391
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

काय रेखीव फोटो आहेत ! मार डाला. जाळी तर इतकी सुरेख नक्षीदार पडलीये ! मस्त लागतात हे डोसे. मी रात्री पीठ भिजवते अन सकाळी करते. त्यामुळे जरा हलके होतात.

In reply to by शिद

"_/\_" ही खूण कॉपी-पेस्ट करून ठेवतो... ह्या ताईंच्या लेखाला आता इतकाच प्रतिसाद...

मनापासून आवडली ही पाकृ! एक उत्तम पर्याय दिला आहे आपण! आजपर्यंत फक्त नागलीच्या पापडासाठी बनवलेले तयार पीठ खात होतो. त्यासोबत "फक्त लाल मिरची पूड, मीठ आणि तेल" हे खूप चांगले लागते. या डोस्या बरोबरही चांगले लागेल असे वाटते. धन्यवाद.

मस्त फोटू. मी थोडे वेगळे करते हे दोसे पण त्याला जरा वेळ लागतो. म्हणजे उडदाची डाळ भिजवून मग तांदळाची पिठी व नाचणी पीठ वगैरे. पण ते फर्मेंट करावे लागते. हे खरेच झटपट दिसतायत. उद्या करून बघावेत म्हणते. कळवीनच!

मस्तच आणि पौष्टीकसुध्दा.........बर्‍याच दिवसाने आलीये ईथे. दोन्ही गुढघाबदल शस्त्रक्रिया. मला तर फार आवडली ही कॄती..

पौष्टीपाकक्रुतीसाठी धन्यवाद ! सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम !

आत्ताच केलेत. मस्त लागतायत. मी एक दोसा खाऊन प्रतिसाद द्यायला आलीये. पीठ ताकात भिजवले. रात्री झोपण्याआधी मिश्रण तयार करून ठेवले. एक टिप सानिकेची (ताकाचा वापर) दुसरी स्नेहांकिताताईंची(आधी भिजवून ठेवण्याची) असे केले आहे.

In reply to by रेवती

ताकात भिजवले की चव ही छान येते. कधी ताक कधी पाणी असे करत बनवत असते मी. आता मी पण स्नेहांकिताताईंची टीप फॉलो करेन पुढच्यावेळेस. धन्यावद.

छान पाकृ. सध्या माझा एक हात दुखावल्याने पोळ्या करायला त्रासच होतो आहे. त्या ऐवजी असे दोसे करायला हरकत नाही.