मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आला स्मायलीवाला...

अत्रुप्त आत्मा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ढीशुम ढिशुम क्लेमरः- सदर लेखन मि.सूडोकू यांनी आमच्या नामा'चा उप योग-करून लिहिलेल्या एका लेखावरून http://misalpav.com/node/27052 सुचलेले आहे. त्यामुळे हा लेख त्याची प्रतिक्रीया...विडंबन ..इत्यादी काहिही नसून त्या निमितानी काहि धमाल लेखन करावं..अश्याच अनुषंगानी लिहिलेला आहे. ======================================================== प्रातःकाळची प्रसन्न स्मायलीमय वेळ.

अहमदाबाद-गांधीनगर_2

अमितसांगली ·
दिवस दुसरा: प्रवासाची रूपरेषा १. कांकरिया लेक (तलाव) : (लागणारा कालावधी : ४० मि.) २. सिद्दी सय्यद मस्जिद: कांकरिया लेकपासून १५ मि. च्या अंतरावर (लागणारा कालावधी: ३० मि. ) ३. जुम्मा मस्जिद: सिद्दी सय्यद मस्जिदपासून १५ मि. (लागणारा कालावधी: ४० मि.) ४. साबरमती आश्रम: लाल दरवाजापासून ३० मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) ५. सायन्स सिटी: साबरमतीपासून ४५ मि. (लागणारा कालावधी: ३ तास ) १. कांकरिया लेक : संध्याकाळी सहाची बस पकडायची असल्याने दुसऱ्या दिवसाचा सूर्योदय कांकरिया लेकवरच बघण्याचे नियोजन होते. पण नेहमीच उठण्याच रडगाण पाठ सोडायला नको.

क्षितिज

सार्थबोध ·
लेखनविषय:
मन विलाप जाणते धरतीचा सागरतिरी सूर्याचे ओझरणे प्रतिसाद लाटांवरुनी ll १ ll विहंग एकला प्रवासी समांतर अवकाशी धरतीस व्‍याकुळलेल्या साथ क्षणापुरती ll २ ll संध्येस का छळतो उनाड अल्लड वारा मावळत्या कातरवेळी जीव एकल्या विहारा ll ३ ll क्षितिजाचे रूप विलोभी उतरे गगनावरुनी डोळ्यादेखत माझ्या मिसळे पाण्यामधुनी ll ४ ll - सार्थबोध

हे लोकं बोलतात तरी काय / कसे.

अत्रन्गि पाउस ·
दोन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा तत्सम अत्युच्च पदस्थ लोकं जेव्हा अधिकृत कामासाठी भेटतात तेव्हा ते जी चर्चा वाटाघाटी करतात त्याचा गोषवारा / औटकम आपल्याला नंतर कळतो..आपण नेहेमी ऐकतो वाचतो कि अमुक नेत्याने अतिशय मुत्सद्दीपणे अमुक एक परिस्थिती हाताळली / आपलं मुद्दा गळी उतरवला वगैरे वगैरे.. परंतु हे लोकं प्रत्यक्ष बैठकीत / बोलण्यांमध्ये ते काय /कसे बोलत असावेत ? विशेषतः बंद दाराआड चर्चेत जेव्हा प्रत्येक शब्द, हालचाल, मौन सगळे सगळे महत्वाचे असेल त्यावेळी आपलं मुद्दा मांडतांना, रेटतांना, सोडतांना शिष्टचारांचा डोलारा सांभाळत .. ते एक्झाकटली 'बोलत' काय/कसे असावेत?

मृगगड - उंबरखिंड - भाग १

वेल्लाभट ·
’मृगगड??? हा कुठे आला? ऐकलं नाही कधी याबद्दल! मोठा आहे का? किती कठीण आहे? काय विशेष आहे त्या किल्ल्यावर?’ इत्यादी असंख्य प्रश्न उपस्थित झाले, जेंव्हा मृगगडाचं नाव सुचवलं गेल. तसा हा अपरिचितच किल्ला म्हणायला हवा. इंटरनेटवरही याची म्हणावी तेवढी मुबलक माहिती मिळत नाही. सुधागड, राजगड ही नावं शर्यतीत होती पण शेवटी एक दिवसाचाच ट्रेक करायचा ठरल्याने ती बाद झाली. मग कोहोज, टकमक गड, घनगड आणि हा मृगगड अशी काही नावं पुढे आली. मृगगड त्यातल्या त्यात जवळ, छोटा, फार कठीण नसलेला, (ही सगळी विशेषणं पुढे बदलली. कशी ते कळेलच) असा होता आणि नवीन होता त्यामुळे ‘होऊदे ट्रेक !’ असं म्हणून मंडळी ट्रेक ला तय्यार झाली.

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

माहितगार ·
लेखनविषय:
भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे.

मोदी वगेरे ठीक आहे…महाराष्ट्राला काय ते बोला

पुतळाचैतन्याचा ·
मराठी माणसाचा शुद्ध स्वार्थ या भुमिके मधून हा लेख लिहिला आहे.मोदी पंतप्रधान होणे हे देशाच्या भल्याचे वगेरे आहे हे ठीक पण ते पंतप्रधान झाले तर मंत्रिमंडळात कोण मराठी चेहरे दिसणार आहेत? त्यांना कोणती खाती मिळतील आणि महाराष्ट्राचे नेहमीचे रेल्वे, सरकारी नोकर्या, उसाच्या शेतकरी, सहकार, मुंबई शहर, इतर औद्योगिक वसाहती यांना काय मिळणार? का नुसता मन मोठा करून बाकी प्रदेशाची प्रगती पहायची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने गप्प बसायचे? सरकार कोणाचेही येवो, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाच्या काही प्रमुख मागण्या असाव्यात ज्या आपण सरकार कडून मान्य करून घेतल्या पहिजेत.

ही ती चित्रे ...

चित्रगुप्त ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही काळापूर्वी मिपाकरांसाठी 'सांगा, कसे केलेत तुम्ही हे सर्व ? … आणि मिळवा एक चित्र' नावाची एक लेखन स्पर्धा मी जाहीर केली होती, त्याला मिपाकरांनी उत्तम प्रतिसाद दिला, आणि पैसा, वल्ली आणि प्रसाद गोडबोले, यांना एकेक चित्र भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तीन चित्रे एकत्रित पाठवली, ती सर्वांना बघायला मिळावीत म्हणून इथे देतो आहे. यापैकी कोणते चित्र कोणी घेतले ? कळवावे.

टाईमपास

बबन ताम्बे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"ए गित्या, अजुन वर वढ ना फ़्लेक्स तिच्या आयला ..." कांच्या माझ्यावर खालून वराडला. आयला या कांच्याच्या! याच्या वाढ्दिवसाचा फ़्लेक्स यानी बनवुन आणलाय आन आम्हाला लावलेय धक्क्याला. याचा वाढ्दिवस आहे का तेरावा याचं पब्लिक्ला काय घेणं हाय का ? पण याला चमकायची हौस दांड्गी . चौकात मोठा फ़्लेक्स लावलाय, " आपले लोकप्रिय युवा नेते कांच्या आरकुले यांना वाढ्दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा". शुभेच्छूक म्हणुन स्थानिक नगरसेवक पोपटरावचा फ़ोटो साइडला, मधे याचा पिवळे दात दाखवणारा आणि गांजा मारल्यागत दिसणारा फ़ोटो आणि खाली आम्हा पोराटोरांची नावे !

मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग २: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी) माहिती साठ्याची कमतरता

माहितगार ·
वस्तुतः चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी ह्या विषयाच्या सांगोपांग चर्चेस अजूनही वाव आहे. माझ्या निरीक्षणांनुसार मराठी आणि महाराष्ट्र संबंधी कोणत्याही विषयावर हिट्सचा अभ्यास केला तर मराठी माणसाचा मराठी आणि महाराष्ट्र विषयीचा जिव्हाळा कायम आहे पण अजूनही ९०-९५ टक्के शक्य श्रोता अथवा वाचकवर्ग इंग्रजीतूनच शोध घेतो मराठीत शोधत अथवा वाचतच नाही लेखन दूरची गोष्ट आहे; याच एक कारण मराठी भाषेतील ऑनलाईन मराठीत ज्ञान आणि माहिती साठ्याची कमतरता आहे.