नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन
नरेंद्र मोदी भारताच्या विकासात तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेऊ इच्छितात, विकासासाठी खासगी क्षेत्राचेही सहकार्य गरजेचे आहे हे सर्वच खरे आहे. भारतातील अधीकतम जनतेला डिजीटल क्रांतीत सहभागी करून घेणे हि स्वागर्ह बाब आहे.
नॅशनल डिजीटल लिटरसी मिशन नावाची काही सरकारी+खासगी क्षेत्रातून योजना आहे. त्या बद्दल अंशतः http://digitalliteracy.co.in/index.html या धाग्यावर (जराशी व्हेग) माहिती दिसते (संकल्पनेची सुरवात काँग्रेसी काळातच झाली असण्याची शक्यता), पण एकुणच यात नवे काय ? यात नेमके काय ?
जडण-घडण 10
ऑफीसमध्ये जाणं शक्यच नव्हतं. फोन करून कळवलं. शिकवण्या बंद होत्या आठवडाभर, त्यामुळे मुलं नव्हती. खूप चिडचिड व्हायची माझी. असं आजारी होऊन पडून राहणं अजिबात आवडत नव्हतं आणि ऑफीसमधलं काम आवडू लागलं होतं. त्यात हा खंड. आतापर्यंत वर्षभरातून फारतर एकदा, ते सुद्धा तापाचं आजारपण. त्यात सुद्धा दोन दिवसांच्या वर नाहीच. त्यामुळे कांजण्यांचा त्रास जरा जास्तच जाणवत होता.
मग जवळ राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला मॅडम आजारी असल्याचं समजलं. इयत्ता चौथीतला विद्यार्थी. मला बघायला घरी आला. मी झोपले होते. तो आल्यावर डोळे उघडून त्याच्याशी बोलले, अभ्यासाबद्दल विचारलं. उठता मात्र नाही आलं मला, अगदीच गलीतगात्र झाले होते.
'ती' कोमातून बाहेर आली
नुकत्याच कळलेल्या बातमीनुसार, स्वप्नाली लाड ही मुलगी, जी गेले वीस दिवस कोमात होती, ती शुद्धीवर आलेली आहे. हे वाचून एक अनामिक दिलासा मिळाला. काही दिवसांपूर्वी या मुलीने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तोच जीव धोक्यात घालत रिक्षातून उडी मारली होती. रिक्षावाल्याने सांगितलेल्या रस्त्यावरून रिक्षा न नेता भलत्या रस्त्यावर वळवली आणि मग स्वप्नाली ने चालत्या रिक्षातून उडी घेतली. अर्थातच रिक्षावाला फरार झाला. मग तिला तिथल्या नगरसेविकेने इस्पितळात नेले, ती कोमात गेली, आता ती शुद्धीवर आली हा सगळा पुढचा प्रवास.
दरम्यान, माझा, तुझा चायनल वाल्यांनी अनेक चर्चा घातल्या या विषयाला धरून. कामच आहे ते त्यांचं म्हणा.
किस्से एका डॉक्टरचे
मायमराठीतले (आणि सावत्रमाय विंग्रजीतले) काही शब्द आपल्यामागे एक एक इमेज घेऊन वावरत असतात. मंत्री (मराठीत मिनिष्टर ) म्हटल्यावर डोक्यावरची गांधी टोपी सावरत कडक इस्त्रीच्या खादी जाकिटाची बटणे कुरवाळत फर्डे भाषण करणारा बगळासदृश्य मनुष्य डोळ्यासमोर येतो. वकील हा सहसा घाऱ्या कावेबाज डोळ्यांचा धूर्त इसम असतो. आणि डॉक्टर हा शब्द उच्चारताच एक सौम्य धीरगंभीर, सौहार्द आणि कणवपूर्ण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी व्यक्तिमत्व नजरेसमोर उभे राहते.
खारकर डॉक्टर हे याला शंभर टक्के अपवाद होते. होते म्हणायला कारण आता ते नाहीत.
कापूसकोंड्याची खरी गोष्ट
फार पूर्वी विदर्भ देशात आटपाट नगर होते, नगरच्या वेशीवर धनाजी नावाचा शेतकरी आपल्या बायको आणि एकुलत्या एक छकुल्या सोबत सुखाने नांदत होता. आपल्या शेतात तो कधी ज्वारी, तर कधी तूर, भुईमूग इत्यादी पिक घेत होता. वरुण राजाच्या लहरीपणाचा फटका विदर्भाला नेहमीच बसतो. धनाजी सारख्या शेतकरीच्या भाग्यात लक्ष्मी नव्हती पण दुर्भिक्ष पडले तरी उपासमार व्हायची नाही. पोटाचा खड्डा अर्धा तरी भरल्या जात असे.
एक दिवस धनाजी शेत नागरत होता. अचानक शुभ्रवेशधारी लांब-लचक रेषे असलेला कापूसकोंडा त्याचा शेतात उतरला. कोण ग पावण, कुठून आलात, धनाजीने विचारले. मी दूरदेशी पाताळातून आलो.
स्मरणातील भ्रमण.
२००५मधील गोष्ट आहे.चारधाम यात्रेला गेलो होतो चाळीसजण होतो हरिद्वारपासुन ५सुमो केल्या होत्या,यात्रा सुरळीत पार पडली शेवटच्या दिवशी पहाटे बद्रिनाथ दर्शन करुन निघालो.आता सर्व प्रवास उताराचा होता.आमची गाडी सर्वात पुढे होती.मागची गाडी लाईट देत होती,गाडीतील सर्वजण हातवारे करुन काहीतरी ईशारे करत होते,काचा बन्द असल्याने अम्हाला काही ऐकु येत नव्हते मागच्या गाडीने आम्हाला ओव्हरटेक केले आणि हाताच्या इशार्याने गजानन{ड्रायव्हर}ला गाडी थाम्बवायला सान्गितले आणि तेही थाम्बले गजाननने डाव्याबाजुला मातीचा ढिगारा पाहुन गाडी त्यावर घालुन थाम्बवली.सगळे गाडीतुन उतरले होते आम्हाला म्हणाले खाली उतरा बघा तुमच्य
सौभाग्य लेणी
माझ्या माहितीत एक फ्यामिली आहे...टिपीकल मध्यम वर्गीय आहेत..सण वार पाळणारे व जमेल तितक्या परंपरा बाऊ न करत जपणारे...एक मुलगा लग्न झालेला ..अमेरिकेत..कुठलीच जबाबदारी
नाही..
श्री सेवा निवृत्त झाले ..अन ३-४ महिन्यात त्यांचे निधन झाले....ज्यावेळी सौभाग्य लेणी उतरविण्याची वेळ आली त्या वेळी या बाईंनी त्याला नकार दिला ...
तिचे म्हणणे असे होते की मी का सौभाग्य लेणी उतरवू...ते ज्या वेळी माझ्या बरोबर होते ते माझे सौभाग्य होते..आज हि त्यांना विसरू शकत नाही ..
मिसळपाव