माझेच जगणे खरे.....
पूर्वप्रकाशित...
नमस्कार मंडळी
आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो?
ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.
कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!
मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.
म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता . पण मराठी प्रेक्षकांनी ऐकेकाळी अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता.
लोकमान्य - एक युगपुरूष
लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे.
चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी.
ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग २
उज्जयिनीच्या लोहमार्ग स्थानकावरील विश्रामकक्षातच दुपारी थोडासा आराम करून, सुमारे तीन वाजता आम्ही स्थानकाधिकार्याहस विश्रामकक्ष सुपूर्त केला आणि इंदौरच्या दिशेने कूच केले. पहिले स्थलदर्शन, विमानतळ रस्त्यावरील “गोमतगिरी” हे जैन तीर्थक्षेत्र होते. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर होते. भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती होती. इथे पर्यटक मात्र फारसे दिसले नाहीत.
((सहज..))
शब्दाने वाढला शब्द
कडाक्याचे भांडण झाले
मी सुन्न आणि स्तब्ध
अन, ती निघून गेली
न मागे वळून पाहणे
न माघारी ते फिरणे
वादातून तुटला धागा
आता उरले ते झुरणे
मी आशा का ठेवावी?
की जीवनी असेच व्हावे
साथ ही सुखाची
नेहमी मनाजोगे घडावे
ती निघून गेली आता
तिच्या एकल्या मार्गाने
कोमेजून गेली स्वप्ने
मी व्याकुळ इथे विरहाने
भेटेल कुणी कधी तिला
तो मार्ग चालता चालता
दाटूनी कंठ माझा आला
मज काही न ये बोलता
आता माझ्याही नशिबी
हे थमला आवडलेले ऋतुरंग २०१४
हे दिवाळी अंकाचे समीक्षण नाही किंवा जाहीरातही नाही.
मला या अंकात भावलेले लिखाणाचा आकलन लेखा-जोखा म्हणा (फारतर) आहे.
विषय घेतला आहे स्थलांतर
===========================================
अनेक नावाजलेल्या लेखकांचे लेखन सशक्त अनुवादित आहे.
१.गुलजार =रावीपार (विजय पाडळकर)
फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चटका लावणारी कथा
२.
ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग १
उज्जयिनी, इंदौर, मांडू, महेश्वर आणि ओंकारेश्वरचे पर्यटन करावे असे कधीचेच मनात होते. मात्र संधी मिळत असे तेव्हा तिथे जाण्यास अनुकूल ऋतूमान नसे.
अनुकूल ऋतूमान निवडावे कसे ह्याकरता त्या ठिकाणांच्या हवामानचित्रांची मदत घेता येऊ शकते. लगतचे प्रकाशचित्र पाहा [१].
मिसळपाव