नमस्कार मिपाकरहो. मिपा छायाचित्रणकला स्पर्धेला लाभणारा वाढता प्रतिसाद पाहून ह्यावेळी स्पर्धेच्या स्वरूपात प्रायोगिक तत्वावर एक बदल घडवून आणत आहोत. आम्ही ह्या स्पर्धेसाठी विशेष परिक्षक म्हणून काम पाहण्यासाठी मिपासदस्य स्वॅप्स यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली.
उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं?
मिसळपाव वर टंकलेखन करण्याच्या काही विशेष सुचना
नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
इथे नविन सभासदांना मराठीत टाइप करायला बर्याच अडचणी येतात.
सुरुवातीला मला पण थोडा त्रास झाला.
त्यामुळे, मराठीत कसे टाइप करावे? ह्यासाठी हा धागा काढत आहे.
सुरुवातीला आपण बाराखडी बघु या.
पहिली महत्वाची गोष्ट ----- तुमच्या कळफलकाचे "Caps lock" नॉर्मल ठेवा.थोडक्यात अक्षरे छोट्या लिपीत यायला पाहिजेत.
कथा-कॉलेज कट्टा भाग २
सर्वांना नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा!!!!!!!!!!
मागील भाग
कथा-कॉलेज कट्टा भाग १
या कथेतील घटनाक्रम हा पुर्णतः काल्पनिक आहे.
तो दिवस होता २६ ऑगस्ट २०१२.डी.वाय पाटील कॉलेजच्या ऑफीसच्या बाहेर अॅडमिशनसाठी भली मोठी रांग होती.
"यार,ज्ञानेश्वर आपण उद्या येउयात का?" अभिनवने सवाल केला.
अभिनव दहा दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता.मुळचा अहमदनगर मधील अभिनवचा मेकॅनिकल इंजिनीअरींगमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला होता.
तो.....
त्या लीलाधराची मापी मागून :)
पेर्णा - http://www.misalpav.com/node/19709
-------------------------------------------------------------------------
तो.....
तो आहे नाना, तो आहे स्टिंकर,
तो ना"ही" तैश अन् तो नाही माइ,
पण तरीही त्याची मिपावर असते मात्र जिल्बी.....
काव्यरस
'लेखन' नावाचा टॅब ऑप्शन
मिसळपाव प्रशासकांना विनंती -
मिसळपाववर सदस्याच्या प्रोफाईलमध्ये सध्या दृश्य, वाचनखुणा, संपादन, Track, खरडवही असे पाच ऑप्शन्स दिसतात.
याच्या जोडीला लेखन हा ऑप्शन पण देता येईल काय?
त्या सद्स्याने केलेले सर्व लेखनाचे धागे या एका टॅबमध्ये सापडू शकतील.
अन्यथा Track चा वापर करुन शोधावे लागते. त्यात लेखकाचे स्वतःचे लेखन असले तरी इतर धाग्यांवर दिलेल्या प्रतिक्रीयाही असल्याने थोडे कठीण जाते. नवे लेखन मध्ये शोधणे तर अधिकच कठीण. विशेषतः जुने लेखन असेल तर.
टेक्नीकली हे कितपत कठीण आहे याची कल्पना नाही, पण इतर अनेक मराठी साईट्सवर (उदा. मायबोली, ऐसी अक्षरे) ही सुविधा उपलब्ध आहे.
व्हा पुढं … २०१५ साठी
२०१४ च्या उत्तरार्धात एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कुठल्याही फालतू चारोळी कवितेला वारेमाप प्रसिध्दी मिळवून द्यायची असेल असेल तर त्या कवितेच्या/ चारोळीच्या खाली फक्त लिहायचे
कवी: " तुम्हाला माहीतच आहे ", " सांगायला हवे का? " , "आपले नेहमीचेच" इ. इ.
बस ! ती कविता/ चारोळी अशी प्रसिध्द पावते की विचारायची सोय नाही
कुणी तरी म्हणले आहे ना , नावात काय आहे ?
(हे कोण म्हणले , आठवले का…. ? असे कृपया विचारू नये )
तर असो मला काय म्हणायचे आहे की ….
उड उड रे
उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला
माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते !
एअर-एशिया QZ8501 ... पहाटेचा काळोख...
शेवटी विमानाचे थोडेसे तुकडे आणि चाळीसेक मृतदेह मिळाल्याचा अपडेट आला. आत्ता तीस डिसेंबरचे पावणेचार (भारतीय वेळ) वाजलेत. आता तासातासाला नवेनवे आकडे येतील आणि नवी वाईट माहितीसुद्धा. MH370 सारखी भयानक अनिश्चितता या विमानाच्या वाट्याला आली नाही, पण हे काही भाग्य म्हणता येत नाही. गडद काळ्याच्या कसल्या शेड्स बघायच्या ?
नेमकं काय झालंय ते तंतोतंत सांगणं आत्ता याक्षणी कुणालाच शक्य नाहीये. पण जितकं कळलंय तितकं सरळ भाषेत इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. विमानाने सुराबाया एअरपोर्टवरुन सकाळी पाच पस्तीसला (जावा बेटांवरचा लोकल टाईम) टेकऑफ घेतला.
किल्ले तिकोना - २८ डिसेंबर २०१४
प्रवास: मुंबईहून तिकोना
वाहन: खासगी
दोन एक वर्षांच्या अंतराने वार्मिंग अप करण्यासाठी कुठला ट्रेक निवडावा याचा विचार करत असताना २७ ला संध्याकाळी तिकोना वर शिक्कामोर्तब झाले.
आतिश नाईक आणि सिद्धेश कदम (५-६ वर्षाच्या अंतराने ट्रेक) २७ला रात्री साडे अकरा वाजता माझ्या कामोठे इथल्या घरी पोहोचले. दोघे दिवसभर काम करून आल्याने मध्यरात्री प्रवास करण्याऐवजी थोडी विश्रांती घेऊन पहाटे लवकर निघावं असं ठरलं.
मिसळपाव