उनाड भटकंती : मढेघाट
इतरत्र पूर्वप्रकाशित ...
"रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन
भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन"
रेडिओवर किशोर चिंब करत गात होता. तसं पाहायला गेलं तर गाण्यात अपेक्षित असलेली 'अगन' लागण्याची (आणि लागलीच तरी दाखवण्याची) आता फारशी संधी उरलेली नाहीये. पण हा पावसाळा तसा कोरडाच गेलेला होता. सद्ध्या ट्रेक्स तर पूर्णपणे बंदच झालेले आहेत. या वर्षी फारसे कुठे आऊटींगलाही जाणे झालेले नव्हते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर कुठेतरी उंडगायला जावून पावसात मनसोक्त भिजायची 'अगन' मात्र मनात लागलेली होती. नुकताच आजारातून उठलेलो असल्यामुळे बाहेर कुठे जायला मिळेल याची शक्यता नव्हती.
मिसळपाव
