लखलख चंदेरी
माझ्या आठवणीतल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या हे मी आणि माझी छोटी भावंड यांचं मिळून एक गुळपीठ आहे. आम्ही तिघी बहिणी. मोठी बहिण माझ्या पेक्षा सहा वर्षांनी मोठी, छोटी बहिण अंकिता माझ्याहून दोन वर्षांनी लहान. दीदीच्या आणि आमच्या वयात बरंच अंतर, त्यामुळे आम्ही खेळत्या वयाचे होई पर्यंत तिचं अभ्यासाचं वय सुरु झालं होतं. तिचं विश्व आमच्या पेक्षा वेगळं होतं. ती आमच्यात खेळायला वगैरे कधी नसे. शिवाय तिला खेळण्यापेक्षा स्कॉलरशिप परिक्षेत राज्यात पहिले येणे, निबंध, भाषण स्पर्धात दणकुन यश मिळवणे, मोत्यासारखं सुंदर अक्षर काढणं अशा अघोरी गोष्टी करायला आवडे. याच्या अगदी उलट मी आणि अंकिता.!!
विशेष
मिसळपाव