नमस्कार मंडळी!आपल्याला सजावटीसाठी आणि भेट देण्यासाठी नेहेमीच काहीतरी नविन हवे असते.अशावेळेस काही घरीच स्वतः बनवलेले असले तर आनंद वाढतो. अशाच एका वाढदिवसानिमित्त भेट देण्यासाठी बनवला कागदी गुलाबांचा पुष्पगुच्छ.
कागदी फुलांसाठी लागणारे साहित्यः डुप्लेक्स पेपर(रंग-मी लाल आणि पिवळा घेतलाय)
तयार हिरवी कागदी पाने (गुलाबाची मिळतात)
२२ नं.जाड तार(घेताना हाताने सहज वळवता येतीये ना हे पहाणे)
हिरवी टेप
पांढरा दोरा
फेव्हिकॉल
कॄती: प्रथम एखाद्या जाड कागदावर फुलाच्या पाकळीचा व पुष्पाधाराचा आकार कापुन घ्यावा.कापलेला आकार डुप्लेक्स कागदावर उभ्या रेषेत ठेवून कापा. डूप्लेक्स कागदाची योग्य मापाची घडी घातल्यास एकावेळेस जास्त पाकळ्या कापता येतील.एका फुलासाठी साधारण १२ पाकळ्या आणि एक पुष्पाधार लागतो.
वर चित्रात दाखवल्याप्रमाणे पाकळ्या(साधारण ५सें.मी.उंच,खालचा बेस१.३ सेंमी आणि वर गोलाच्या इथे ४.३ आहे)
घेतल्या.त्यातील एक पाकळी गोलाकार फिरवा.परत दूसरी पाकळी पहिल्या पाकळीवर फिरवून दोर्याने बांधा.
नंतर २२ नं.ची लवचिक तार घेउन पाकळीच्या खालील भागास गुंडाळणे.
फूलाचा देठ जाड होण्यासाठी त्या तारभोवती अजून एक तार गुंडाळा. या पाकळ्यांवर २ पाकळ्या घेउन समान अंतरावर बांधा.
यापुढे तीन पाकळ्या बांधा.नंतर उरलेल्या ५ पाकळ्या बांधा.
हिरवा डूप्लेक्स पेपर घेउन जो पुष्पाधार पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे(साधारण४,५ सेमी.रुंद आणि ३.५सेमी.उंच)
कापला आहे त्याला फेव्हिकॉल लावून फुलाच्या खालील भागास चिकटवून घेणे.
पुष्पाधाराच्या खालून ते देठाच्याशेवटपर्यंत हिरवी टेप लावा.तयार पान फूलाला गुंडाळा गुलाब तयार.
या तयार फूलांची हवी तशी रचना करून सजावट वा गुच्छ तयार करता येइल.
लहान मुलांना वाढदिवसाला भेट देण्यासाठी चॉकलेट आणि फुलांचा गुच्छ!
विशेष
वाचने
15461
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह
सुंदर व कल्पक पुष्परचना.
मस्तं!
अप्रतिम ! खरंच कला आहे तुझ्या
तुझ्या लिहिण्याने सोपे वाटले
+१ मागे एकदा मी ड्च गुलाब
In reply to तुझ्या लिहिण्याने सोपे वाटले by अजया
सुंदर !
किती ती कला !!आणि किती तो
सुरेख.
मस्तच!!
खूप ंमस्त
सुरेख कलाकृती
वाह!!
सही!!
किती सुंदर आहेत डच गुलाब
सुरेख झालेत गुलाब :)
अहाहा ! सुंदर !
+१
आईग्ग! किती मस्त वाटतय बघायला
हे मला या जन्मात जमेलसे वाटत
मस्त
सुंदर!
खूपच सुरेख!
वाव. किती सुंदर दिसतायत ती
छानचं अगदी. सवड झाली की नक्की
मधली काही चित्रे दिसत नाहीत.
मस्तं! छान सोप्पं काम
मस्तं! छान सोप्पं काम
वाह
सुंदर!